Lokmat Sakhi >Food > Tutti Frutti Recipe: मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी आता झटपट करा घरीच, टरबुजाच्या सालाचा बघा खास वापर 

Tutti Frutti Recipe: मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी आता झटपट करा घरीच, टरबुजाच्या सालाचा बघा खास वापर 

Tutti Frutti Recipe: आईस्क्रिम, केक यामध्ये दिसणारी आणि जवळपास सगळ्याच लहान मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी घरच्याघरी करणं अगदीच सोपं आहे.. बघा ही खास रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 03:40 PM2022-05-14T15:40:07+5:302022-05-14T15:40:30+5:30

Tutti Frutti Recipe: आईस्क्रिम, केक यामध्ये दिसणारी आणि जवळपास सगळ्याच लहान मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी घरच्याघरी करणं अगदीच सोपं आहे.. बघा ही खास रेसिपी

Food And Recipe: How to make tutti frutti from water melon | Tutti Frutti Recipe: मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी आता झटपट करा घरीच, टरबुजाच्या सालाचा बघा खास वापर 

Tutti Frutti Recipe: मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी आता झटपट करा घरीच, टरबुजाच्या सालाचा बघा खास वापर 

Highlightsटरबुजाच्या पांढऱ्या भागाचा वापर करून कशा पद्धतीने टुटीफ्रुटी करायची, त्याची ही एक सोपी रेसिपी.

वेगवेगळ्या रंगाची आणि चवीला गोड असणारी टुटीफ्रुटी म्हणजे बच्चे कंपनीचा अगदी आवडीचा पदार्थ. आईस्क्रिम, बिस्किटे, केक, वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आणि मिल्कशेक यांची चव खुलविण्यासाठी आणि त्यावर गार्निशिंग करण्यासाठी टुटीफ्रुटीचा हमखास वापर केला जातो. लहान मुलांमध्ये अतिशय फेमस असणारा हा पदार्थ घरच्याघरी अगदी सहज बनविता येतो..(How to make tutti frutti at home)

 

उन्हाळ्यात सगळीकडे टरबूज भरपूर प्रमाणात मिळतात. आणि ते ही अगदी स्वस्त किमतीत. टरबूजाचा लाल भाग आपण खाऊन टाकतो आणि पांढरा, हिरवा भाग मात्र फेकून देतो. वास्तविक पाहता कचरा म्हणून आपण हा भाग टाकून देत असलो, तरी तो अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच पचनाचे अनेक त्रास टाळण्यासाठी टरबुजाचा पांढरा भाग (white part of water melon) अतिशय उपयुक्त असतो. त्याच पांढऱ्या भागाचा वापर करून कशा पद्धतीने टुटीफ्रुटी करायची त्याची ही एक सोपी रेसिपी. (easy recipe of making tutti frutti)

 

कशी करायची टुटीफ्रुटी?
१. यासाठी सगळ्यात आधी टरबुजाची हिरवी साल काढून टाका. तसेच पांढऱ्या भागावर टरबुजाचा काही लालसर भाग राहिला असेल तर तो देखील काढून घ्या.
२. पांढऱ्या फोडींचे आता छोटेछोटे चौकाेनी तुकडे करा.
३. एका कढईत पाणी तापायला ठेवा. पाणी गरम झालं की त्यात हे चिरलेले तुकडे टाका आणि मध्यम गॅसवर ते थोडे शिजवून घ्या. टरबुजाच्या फोडींचा रंग बदलला आणि त्या पारदर्शक झाल्यासारख्या दिसल्या की गॅस बंद करावा.
४. आता सगळे तुकडे पाण्यातून काढून घ्या, त्यातून पाणी निथळून टाका. या पाण्याचा उपयोग तुम्हाला कणिक भिजविण्यासाठी, पुऱ्या करण्यासाठी करता येईल.


५. आता दुसऱ्या कढईत एक वाटी साखर आणि तेवढंच पाणी घ्या. साखर वितळून त्याचा पाक झाला की त्यात पाण्यात शिजवलेले टरबुजाचे तुकडे टाका. फोडींचा आकार जेव्हा बारीक होईल, पाक जेव्हा अर्धा होईल तेव्हा गॅस बंद करा.
६. आता या सगळ्या फोडी साखरेच्या पाकासकट वेगवेगळ्या वाट्यांमध्ये टाका. तुमच्याकडचा खाण्याचा वेगवेगळा रंग वेगवेगळ्या वाटीत टाका. १० मिनिटांनंतर रंग व्यवस्थित लागला की फोडी पाकातून काढून घ्या आणि एका चाळणीवर पसरून ठेवा. ७ ते ८ तास सावलीत वाळू द्या. मुलांना आवडेल अशी चवदार, गोड टुटीफ्रुटी खाण्यासाठी असेल तयार. 


 

Web Title: Food And Recipe: How to make tutti frutti from water melon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.