Lokmat Sakhi >Food > खमंग-खुसखुशीत आणि किंचित गोडसर दुधातली दशमी, घ्या रेसिपी- प्रवासातला पारंपरिक पौष्टिक नाश्ता

खमंग-खुसखुशीत आणि किंचित गोडसर दुधातली दशमी, घ्या रेसिपी- प्रवासातला पारंपरिक पौष्टिक नाश्ता

Dudhatali Dashami Recipe In Marathi: दुधातली दशमी हा महाराष्ट्रातला एक पारंपरिक पदार्थ असून हा पदार्थ प्रवासात न्यायला खूप चांगला मानला जातो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2025 19:17 IST2025-06-21T14:08:00+5:302025-06-21T19:17:30+5:30

Dudhatali Dashami Recipe In Marathi: दुधातली दशमी हा महाराष्ट्रातला एक पारंपरिक पदार्थ असून हा पदार्थ प्रवासात न्यायला खूप चांगला मानला जातो.

dudhatali dashami recipe in Marathi, how to make dashmi roti?, traditional marathi food | खमंग-खुसखुशीत आणि किंचित गोडसर दुधातली दशमी, घ्या रेसिपी- प्रवासातला पारंपरिक पौष्टिक नाश्ता

खमंग-खुसखुशीत आणि किंचित गोडसर दुधातली दशमी, घ्या रेसिपी- प्रवासातला पारंपरिक पौष्टिक नाश्ता

Highlightsखमंग भाजलेल्या गरमागरम दशमीला छान साजूक तूप लावावे आणि ती चटणी, लोणचं, पिठलं यासोबत खावी. लहान मुलांनाही किंचित गोड लागणारा हा प्रकार खूप आवडेल. 

बदलत्या काळानुसार काही पारंपरिक पदार्थ आता मागे पडत चालले आहेत. हल्ली हॉटेल्सचे जेवढे प्रस्थ वाढले आहे, तेवढे पुर्वी नसायचे. त्यामुळे प्रवासाला निघालेल्या व्यक्तीचे खाण्याचे हाल होऊ नये म्हणून त्याच्यासोबत हमखास दुधातली दशमी दिली जायची. ही दशमी ८ ते १० दिवस चांगली टिकते. शिवाय ती तुम्ही लोणचं, चटणी अशा कोरड्या पदार्थांसोबत खाऊ शकता. गरमागरम दशमी तर एवढी चवदार लागते की तिच्यासाेबत इतर दुसरा कोणताच पदार्थ तोंडी लावण्याची गरज पडत नाही (Dudhatali Dashami Recipe In Marathi). अगदी नुसतीही तुम्ही ती खाऊ शकता (how to make dashmi roti?). ही चवदार, पारंपरिक आणि पौष्टिक दशमी कशी करायची ते पाहूया..(traditional marathi food)

 

दुधातली दशमी कशी करावी?

साहित्य 

१ वाटी कणिक

२ चमचे पिठीसाखर

सर्दी झाल्यावर प्लास्टिकच्या स्टीमरमधून वाफ घेता? डॉक्टरांनी दिली धोक्याची सूचना, वाफ घ्यायचीच तर...

१ ते दिड चमचा तूप

किंचित मीठ आणि १ टीस्पून ओवा

कृती

दशमी करण्यासाठी एका भांड्यामध्ये कणिक घ्या. त्यामध्ये पिठीसाखर, मीठ, ओवा घालून सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या. 

 

यानंतर एक छोट्या कढईमध्ये तूप घ्या आणि ते गरम करून घ्या. तुपाच्याऐवजी तेलही वापरू शकता. आता गरम झालेले तूप कणिकेमध्ये घाला आणि हातानेच कणिक व्यवस्थित हलवून घ्या. तूप सगळ्या कणकेला व्यवस्थित लागायला हवे. यानंतर त्यामध्ये हळूहळू दूध घालून कणिक मळून घ्या.

फक्त १० रुपये खर्च करा, पिवळट दात पांढरेशुभ्र होऊन चमकतील, दाढ दुखणंही थांबेल

नेहमी पोळ्या करताना जशी कणिक भिजवतो, त्यापेक्षा थोडी घट्ट कणिक भिजवावी. भिजवलेली कणिक १० ते १५ मिनिटे झाकून ठेवावी. त्यानंतर कणकेचा एक गोळा घेऊन तो लाटावा.

 

पोळी करताना आपण ती थोडी लाटून दुमडतो. तशा पद्धतीने दशमी करताना तिची घडी घालू नये. फुलका लाटतो, त्याप्रमाणे लाटावी.

जीन्स घेतल्यावर लगेचच 'हे' काम करा, रंग कधीच फिका पडणार नाही- वर्षांनुवर्षे नव्यासारखी राहील

दशमी पोळीपेक्षा थोडी जाडसर करावी आणि मध्यम आचेवर खमंग भाजावी. या खमंग भाजलेल्या गरमागरम दशमीला छान साजूक तूप लावावे आणि ती चटणी, लोणचं, पिठलं यासोबत खावी. लहान मुलांनाही किंचित गोड लागणारा हा प्रकार खूप आवडेल. 


 

Web Title: dudhatali dashami recipe in Marathi, how to make dashmi roti?, traditional marathi food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.