Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > नाश्त्यासाठी एकदम मस्त पदार्थ म्हणजे डोसा - डोस्याचे अनेक प्रकार त्यापैकी एक म्हणजे बटाटा - कांदा डोसा , पाहा रेसिपी

नाश्त्यासाठी एकदम मस्त पदार्थ म्हणजे डोसा - डोस्याचे अनेक प्रकार त्यापैकी एक म्हणजे बटाटा - कांदा डोसा , पाहा रेसिपी

Dosa is a great breakfast dish - there are many types of dosa, one of which is potato - onion dosa, see the recipe : लहान मुलांसाठी करा असा डोसा. चवीला मस्त आणि करायला सोपा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2025 14:28 IST2025-12-02T14:26:11+5:302025-12-02T14:28:06+5:30

Dosa is a great breakfast dish - there are many types of dosa, one of which is potato - onion dosa, see the recipe : लहान मुलांसाठी करा असा डोसा. चवीला मस्त आणि करायला सोपा.

Dosa is a great breakfast dish - there are many types of dosa, one of which is potato - onion dosa, see the recipe | नाश्त्यासाठी एकदम मस्त पदार्थ म्हणजे डोसा - डोस्याचे अनेक प्रकार त्यापैकी एक म्हणजे बटाटा - कांदा डोसा , पाहा रेसिपी

नाश्त्यासाठी एकदम मस्त पदार्थ म्हणजे डोसा - डोस्याचे अनेक प्रकार त्यापैकी एक म्हणजे बटाटा - कांदा डोसा , पाहा रेसिपी

लहान मुलांना पिझ्झा आवडतो. मात्र तो अत्यंत अनहेल्दी असल्याने देणे टाळायलाच हवे. त्याऐवजी मुलांसाठी असा डोसा तयार करा जो दिसतो पिझ्यासारखा आणि चवीला लागतो एकदमच भारी. तसेच त्यात अनहेल्दी काही नाही. (Dosa is a great breakfast dish - there are many types of dosa, one of which is potato - onion dosa, see the recipe)आपल्या रोजच्या आहारातील पदार्थ वापरुन करायचा. कांदा - बटाटा घालून करा मसालेदार डोसा. नाश्त्यासाठी
नक्की करा. 

साहित्य 
बटाटा, कांदा, तांदूळ, उडदाची डाळ, पाणी, मेथीचे दाणे, मीठ, तेल, लाल तिखट, कोथिंबीर, हळद

कृती
१. डोसा बॅटरसाठी दोन वाटी तांदूळ, एक वाटी उडदाची डाळ, चमचाभर मेथीचे दाणे भिजत ठेवायचे. रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी ते मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्या. नंतर त्यात चमचाभर तेल घालायचे. तसेच बॅटर फेटून घ्यायचे. छान मऊ असे तयार होते. 

२. बटाटा उकडून घ्यायचा. उकडून झाल्यावर सोलून घ्यायचा आणि मग कुस्करायचा. त्यात चमचाभर मीठ घालायचे. तसेच त्यात लाल तिखट घालायचे. हळद घालायची. एकजीव करायचे आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची. 

३. कांदा सोलून घ्यायचा आणि कांद्याचे गोलाकार तुकडे करायचे. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. त्यावर कांद्याचे तुकडे लावायचे. त्यामध्ये बटाट्याचे सारण भरायचे. एका बाजूने परतून झाल्यावर दुसऱ्या बाजूनेही परतायचे. त्यावर डोश्याचे पीठ लावायचे. गोलाकार पसरवायचे. सेट झाले  आणि एका बाजूने परतले गेले की उलथायचे आणि दुसरी बाजूही परतायची. 

४. दोन्ही बाजू छान परतून झाल्यावर त्यावर कोथिंबीर घाला. तसेच आवडत असेल तर तूपही घालू शकता. गरमागरम डोसा चटणीसोबत खा. चवीला वेगळा लागतो.  

Web Title : आलू-प्याज डोसा: बच्चों के लिए एक स्वादिष्ट और सेहतमंद नाश्ता रेसिपी।

Web Summary : आलू और प्याज से बच्चों के लिए एक स्वस्थ, पिज्जा जैसा डोसा बनाएं। बैटर तैयार करें, प्याज के छल्ले में मसालेदार आलू भरें, डोसा बैटर से ढकें और सुनहरा होने तक पकाएं। चटनी के साथ गरमागरम परोसें।

Web Title : Potato-onion dosa: A delicious and healthy breakfast recipe for kids.

Web Summary : Make a healthy, pizza-like dosa for kids with potato and onion. Prepare a batter, stuff onion rings with spiced potato, cover with dosa batter, and cook until golden. Serve hot with chutney.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.