Lokmat Sakhi >Fitness > चाळिशीनंतर अचानक का सुटतं महिलांचं पोट? तज्ज्ञ सांगतात २ कारणं..

चाळिशीनंतर अचानक का सुटतं महिलांचं पोट? तज्ज्ञ सांगतात २ कारणं..

Fitness tips: व्यायाम, डाएट या सगळ्या गोष्टी नियमितपणे सुरू असतात. पण तरीही अनेक जणींनी तिशी- पस्तिशी ओलांडली की त्याचं पोट सुटू लागतं (Belly fat).. असं का होतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 07:00 PM2022-01-18T19:00:02+5:302022-01-18T19:03:47+5:30

Fitness tips: व्यायाम, डाएट या सगळ्या गोष्टी नियमितपणे सुरू असतात. पण तरीही अनेक जणींनी तिशी- पस्तिशी ओलांडली की त्याचं पोट सुटू लागतं (Belly fat).. असं का होतं?

Why belly fat increases after the age of 40 in women? | चाळिशीनंतर अचानक का सुटतं महिलांचं पोट? तज्ज्ञ सांगतात २ कारणं..

चाळिशीनंतर अचानक का सुटतं महिलांचं पोट? तज्ज्ञ सांगतात २ कारणं..

Highlights वाढत्या वयासोबत हा अनुभव मात्र बहुतांश मैत्रिणी घेत असतात. आपल्या लाईफस्टाईल प्रमाणेच शरीरात होणारे काही हार्मोनल बदल पोटाचा घेर (Belly fat) वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात.

पस्तिशीची किंवा चाळीशीच्या आत बाहेरची एखादी महिला आणि तिचं पोट अगदी स्लिम ट्रिम... असं चित्र दिसणं खूपच दुर्मिळ आहे. आहार किंवा व्यायाम, आपलं रुटीन यात कुठेही खूप मोठा बदल झालेला नसतो.. पण तरीही आपल्या पोटाचा घेर मात्र वाढूच लागला आहे, असं अनेक जणींना जाणवतं... यातही स्पेशली ओटीपोटाचा भाग जरा जास्तच मोठा होत आहे, असं वाटतं... नेमकं असं का होत आहे हे कळत नाही.. पण वाढत्या वयासोबत हा अनुभव मात्र बहुतांश मैत्रिणी घेत असतात. म्हणूनच तर बहुसंख्य मैत्रिणींच्या या प्रश्नाचं उत्तर देत आहेत काही तज्ज्ञ अभ्यासक.

 

अमेरिकेच्या University of Missouri येथील विक्टोरिया विएरा पॉटर यांनी न्यूयॉर्क टाईम्सला याविषयी एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्या असं म्हणतात की आपल्या लाईफस्टाईल प्रमाणेच शरीरात होणारे काही हार्मोनल बदल पोटाचा घेर (Belly fat) वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. आहारात जर थोडा फार बदल केला आणि नियमित व्यायाम केला तर पोटावरची ही चरबी कमी होईल, असं वाटल्याने अनेक महिला मग हेवी वर्कआऊट आणि हेवी डाएटिंग सुरु करतात. पण प्रत्येकवेळी ते फायदेशीरच ठरेल असं काही नाही. 

 

ही आहेत पोटाचा आकार वाढण्याची कारणं...(reasons to increase belly fat)
१. चाळिशीनंतर महिलांच्या मेनोपॉजला (Menopause) सुरुवात होते. त्यामुळे एस्ट्रोजन या हार्मोनच्या पातळीत खूप मोठा बदल होऊ लागतो. हार्मोनमध्ये होणारा हा बदल शरीराच्या आकारावरही परिणाम करतो. त्यामुळे महिलांच्या ओटीपोटावर तसेच कंबर, मांडी, हिप्स या भागात चरबी साठण्याचे प्रमाण वाढू लागते.  तसेच मुड स्विंग वाढण्याचे प्रमाणही वाढते.
२. या काळात बहुसंख्य महिलांची मासिक पाळी अनियमित झालेली असते. किंवा पाळीमध्ये होणाऱ्या रक्तस्त्रावाचे प्रमाण बदललेले असते. याचा परिणाम अनेक जणींच्या पचन संस्थेवर, चयापचय क्रियेवर होतो. त्याचा परिणामही पोटाचा घेर वाढण्यावर होतो. 

 

कसा कमी करायचा पोटाचा घेर (how to reduce belly fat)
- पोटाचा घेर कमी करण्यासाठीचा एक उपाय म्हणजे आपण दिवसभरात जेवढ्या कॅलरी शरीरात घेतो, त्याच्या अर्ध्या कॅलरीज बर्न केल्या पाहिजेत. अर्थात तुमचा कॅलरी इनटेक खूप जास्त असेल, तरच हा उपाय करावा अन्यथा करू नये.
- आठवड्यातून तीन दिवस तरी ४५ ते ५० मिनिटे वॉकींग केलं पाहिजे. चालण्याचा व्यायाम नियमित केला, तर पोटावरची चरबी कमी होऊ शकते.
- नियमित सुर्यनमस्कार केल्यामुळे पोटाचा घेर कमी होतो.
- पुशअप्स आणि प्लँक वर्कआऊट याचाही चांगला परिणाम दिसून येतो.
- नियमित योगासने पोटाचा घेर कमी करण्यासाठी मदत करतात. 

 

Web Title: Why belly fat increases after the age of 40 in women?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.