Retro Walk Benefits in Winter : जसं प्रवासात मागे वळून पाहिल्यावर दिशा स्पष्ट दिसते, तसंच हिवाळ्यात उलटं चालणे म्हणजेच रेट्रो वॉकिंग आपल्या शरीर आणि मेंदूसाठी कमालीचं फायदेशीर ठरू शकतं. थोडावेळ उलटं चालले तर आपल्याला सकाळी नवी ऊर्जा मिळूे शकते. हिवाळा आला की शरीर सुस्त होतं, डोकं जड वाटतं आणि सांधे अकडू लागतात. या दिवसांमध्ये डायबिटीस, BP, हृदयविकार आणि थायरॉईड असलेल्या रुग्णांची समस्या अधिक वाढते. कारण थंडीमध्ये शारीरिक हालचाल खूप कमी होते. पण हिवाळ्यात जास्त सक्रिय राहणे आवश्यक असतं.
सकाळी २० ते ३० मिनिटं चालणं हृदय, मेंदू आणि फुफ्फुसांसाठी "मॉर्निंग टॉनिक" सारखं काम करतं. यासोबतच रेट्रो वॉकिंग विसरू नका, कारण ही थंडीतील अशी चालण्याची अशी फायदेशीर पद्धत आहे, जी कॅलरी जाळते, गुडघ्याच्या दुखण्यापासून आराम देते आणि मेंदूला सक्रिय ठेवते. या दिवसात सूर्यप्रकाशातून व्हिटामिन-D घेणे विशेष गरजेचं असतं. त्यामुळे पार्कमध्ये थोडा वेळ रेट्रो वॉक नक्की करा.
रेट्रो वॉक कसा करायचा?
यात काही फार वेगळं करावं लागत नाही. थोडा वेळ उलट्या पावलांनी चालायचं. रेट्रो वॉकला तुम्ही रिव्हर्स वॉक असंही म्हणू शकता. यात पाय पुढे न जाता मागे जातात. यामुळे सांधेदुखी, लवचिकता आणि बॉडी बॅलन्स सुधारतो. मेंदूसाठीही मागे चालणं एक उत्तम व्यायाम मानला जातो. रिपोर्ट्सनुसार फक्त १०–१५ मिनिटांचा रेट्रो वॉक हे ३० मिनिटांच्या सामान्य वॉकइतके फायदे देतो.
रेट्रो वॉकचे फायदे
- उलट चालताना मेंदू आणि स्नायूंचं कनेक्शन मजबूत होतं, कारण थोडीशी चूक झाली तरी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे मेंदू अधिक सक्रिय राहतो.
- रेट्रो वॉकिंगला ऑस्टिओआर्थ्रायटिससाठी फायदेशीर मानलं गेलं आहे.
- शरीराची फ्लेक्सिबिलिटी वाढते.
- उलटं चालताना जास्त मेहनत लागते, त्यामुळे वजन लवकर कमी होतं.
- ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होते आणि झोपेतही सुधारणा होते.
- विचार करण्याची क्षमता, एकाग्रता आणि समज वाढते.
रेट्रो वॉक करताना काळजी
- डायबिटीस असलेले लोक उघड्या पायांनी चालू नये.
- हृदयविकार असलेल्यांनी वॉक करण्यापूर्वी हलका वॉर्म-अप करावा.
- थायरॉईड असलेल्या लोकांनी सुस्तीशी लढण्यासाठी दररोज जोमानं चालणं गरजेचं आहे.
- सुरुवात हळू आणि कमी वेळेसाठी करा. मध्येच मागे वळून बघत चला. मागे कोणी नसलेली, सुरक्षित आणि मोकळी जागा निवडा.
थंडीत फिट आणि सक्रिय राहण्यासाठी थोडीशी उन्ह, थोडासा वॉक आणि थोडीशी काळजी एवढंच पुरेसं आहे.
