Lokmat Sakhi >Fitness > शिल्पा शेट्टीसारखी परफेक्ट फिगर हवी, घ्या तिचाच हा फॅट बर्न फॉर्म्युला!

शिल्पा शेट्टीसारखी परफेक्ट फिगर हवी, घ्या तिचाच हा फॅट बर्न फॉर्म्युला!

शिल्पा शेट्टी म्हणजे बॉलीवूडची फिटनेस क्वीन. तिने नुकताच तिचा एक फिटनेस फॉर्म्युला सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिने शरीरावरचे अतिरिक्त फॅट बर्न करण्यासाठी एक जबरदस्त व्यायाम सांगितला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 05:56 PM2021-10-26T17:56:57+5:302021-10-26T17:58:12+5:30

शिल्पा शेट्टी म्हणजे बॉलीवूडची फिटनेस क्वीन. तिने नुकताच तिचा एक फिटनेस फॉर्म्युला सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिने शरीरावरचे अतिरिक्त फॅट बर्न करण्यासाठी एक जबरदस्त व्यायाम सांगितला आहे.

Want a perfect figure like Shilpa Shetty, take this fat burning formula! | शिल्पा शेट्टीसारखी परफेक्ट फिगर हवी, घ्या तिचाच हा फॅट बर्न फॉर्म्युला!

शिल्पा शेट्टीसारखी परफेक्ट फिगर हवी, घ्या तिचाच हा फॅट बर्न फॉर्म्युला!

Highlightsचरबी कमी होण्यासोबतच असा व्यायाम करण्याचे अनेक फायदेही शिल्पाने सांगितले आहेत.

अभिनेत्री आहे म्हटल्यानंतर स्वत:च्या फिटनेसबाबत जागरूक असणे ओघाने आलेच. त्यामुळे बाॅलीवूडच्या जवळपास सगळ्याच अभिनेत्री त्यांच्या फिटनेसबाबत अतिशय जागरूक असतात, हे तर आपण जाणताेच. यापैकी काही अभिनेत्रीं ज्या त्यांच्या आरोग्याबाबत खूपच जास्त दक्ष असतात, अशांपैकी एक म्हणजे बॉलीवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी. फिटनेस आणि योगा हे शिल्पाचे पॅशन आहे. त्यामुळेच ती तिच्या चाहत्यांना देखील कायम फिटनेसबाबत अलर्ट ठेवण्याचं काम करत असते. 

 

शिल्पा शेट्टी सोशल मिडियावर अतिशय ॲक्टीव्ह आहे. ती दर सोमवारी तिच्या चाहत्यांसाठी एक फिटनेस मंत्र देत असते. यामध्ये ती कधी व्यायामाचा एखादा प्रकार सांगते तर कधी एखादे योगासन करून दाखवत असते. तिने सांगितलेला व्यायाम किंवा योगा कोणी, कसा आणि कितीवेळ करावा, असा व्यायाम केल्यामुळे शरीराला काय फायदा होतो या सगळ्या गोष्टी तिने यामध्ये नमूद केलेल्या असतात. असेच एक फिटनेस मोटीव्हेशन शिल्पाने नुकतेच दिले आहे. यामध्ये ती चक्क २० किलो वजन उचलून squat हा व्यायाम प्रकार करत आहे.

 

चक्क २० किलो वजन हातात पकडून असा व्यायाम करणं म्हणजे खरोखरीच चेष्टेची गोष्ट नाही. जर तुमचे शरीर आधीपासूनच यासाठी तयार असेल, म्हणजेच तुमचा फिटनेस उत्तम असून तुम्ही नियमितपणे व्यायाम करत असाल, तरच तुम्हाला २० किलो वजनासह squat करता येतील. शिल्पा सांगते शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. चरबी कमी होण्यासोबतच असा व्यायाम करण्याचे अनेक फायदेही शिल्पाने सांगितले आहेत. यामध्ये शिल्पाने २० किलो वजन छातीच्या लेव्हलला हातात पकडले आहे आणि ती हे वजन पकडून गुडघ्यात सरळ खाली वाकणे, पुन्हा उभे राहणे असा व्यायाम सातत्याने करत आहे. 

 

ही पोस्ट शेअर करताना शिल्पाने लिहिले आहे की २० किलो वजनासह squat व्यायाम करणे ही अवघड गोष्ट आहे. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करताना त्यात तुमचं सगळं मन गुंतवता, तेव्हा ती गोष्टी तुम्ही साध्य करू शकता. मी आज जो व्यायाम करते आहे, तो करताना मलादेखील प्रयत्न करावा लागला आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर आज मी तो यशस्वीपणे करू शकते आहे. असा व्यायाम केल्यामुळे तुमच्या मांड्या, पाय, गुडघे आणि कंबर या भागांना बळकटी मिळते.  

squat व्यायाम करण्याचे फायदे 
- फॅट बर्नर व्यायाम म्हणून स्क्वॅट व्यायाम ओळखला जातो.
- शरीरावरची चरबी अधिक वेगात कमी करायची असेल तर squat नियमितपणे करावे. केवळ कंबरच नव्हे तर पोटावरची आणि मांड्यांवरची चरबी कमी करण्यासाठी squat उपयुक्त ठरतात.
- चयापयच क्रिया सुधारण्यासाठी हा व्यायामप्रकार उपयुक्त ठरतो.
- शरीरातील हार्मोन्सचे संतूलन चांगले राखले जाते.


- बॉडी टोन सुधारण्यासाठी हा व्यायाम उत्तम मानला जातो. 
- पाठीच्या मजबूतीसाठी देखील स्क्वॅट्स केले पाहिजे. 
- ताणतणाव कमी करण्यासाठी उत्तम व्यायामप्रकार.
- पचनसंस्थेचे दोष दुर करण्यासाठी नियमितपणे स्क्वॅट्स केले पाहिजे, असं तज्ज्ञ सांगतात. 
 

Web Title: Want a perfect figure like Shilpa Shetty, take this fat burning formula!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.