lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > आलिया भटसारखी फिगरच नाही तर फिटनेसही हवा, आलियाची ट्रेनर सांगते करा 3 आसनं

आलिया भटसारखी फिगरच नाही तर फिटनेसही हवा, आलियाची ट्रेनर सांगते करा 3 आसनं

फिगरबरोबरच ताकद वाढण्यासाठी करायला हवीत योगासनं, पाहा काय होतात फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 04:56 PM2022-05-09T16:56:17+5:302022-05-09T17:03:20+5:30

फिगरबरोबरच ताकद वाढण्यासाठी करायला हवीत योगासनं, पाहा काय होतात फायदे...

Not only figure like Alia Bhatt but also fitness, Alia's trainer says do 3 seats | आलिया भटसारखी फिगरच नाही तर फिटनेसही हवा, आलियाची ट्रेनर सांगते करा 3 आसनं

आलिया भटसारखी फिगरच नाही तर फिटनेसही हवा, आलियाची ट्रेनर सांगते करा 3 आसनं

Highlightsआपली ताकद कमी पडली की अपघातामुळे आपल्याला इजा होण्याचे प्रमाण वाढते, यासाठी शरीराची ताकद वाढणारी आसने करायला हवीत.प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींची योगा टीचर अनुष्का सांगते काही महत्त्वाच्या आसनांचे फायदे

आलिया भट ही तिचे सौंदर्य, अभिनय याबरोबरच फिटनेससाठीही ओळखली जाते. ती जितकी सुंदर दिसते तितकीच तिची फिगरही छान आहे. अभिनेत्रींचे सौंदर्य हे अनेकदा त्यांचा आहार, झोप, मानसिक ताणतणाव आणि व्यायाम यावरही अवलंबून असते. या बाबतीत आलिया विशेष काळजी घेत असल्याचे दिसते. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आलिया बरेचदा आपले घरातल्या घरात योगासने किंवा वेगवेगळे व्यायाम करताना दिसते. तिच्याकडून प्रेरणा घेऊन तिचे फॅन्सही काहीवेळा आपण व्यायाम करत असल्याचे कमेंटमध्ये सांगतात. चित्रपटसृष्टीत येण्याआधी आलिया खूप जास्त जाड होती, पण तिने बरेच कष्ट घेऊन आपली फिगर तयार केली असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. 

प्रसिद्ध योगा थेरपिस्ट अनुष्का परवानी सेलिब्रिटी योगा टिचर म्हणून प्रसिद्ध आहे. करीना कपूर, अनन्या पांडे आणि आलिया भट यांसारख्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींना ती नेहमी योगाचे धडे देत असते. नुकताच अनुष्का हिने एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यामध्ये तिने कोअर मसल ताकदवान करण्यासाठी कोणती आसने करायला हवीत याविषयी माहिती दिली आहे. कोअर मसल हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग असून दिवसभरातील विविध क्रिया करण्यासाठी तो स्ट्रॉंग असणे आवश्यक असते. शरीराचा संपूर्ण भार ज्या शरीराच्या मधल्या भागावर असतो. तो भाग फिट आणि हेल्दी असणे आवश्यक असून त्यासाठी कोणती ३ योगासने करायची याबाबत अनुष्का सांगते. सुरुवातीला हे आसन १५ ते २० सेकंद करुन नंतर त्याचा कालावधी ३ मिनीटांपर्यंत वाढवता येऊ शकतो.  

(Image : Google)
(Image : Google)

१. नौकासन

विविध समस्यांसाठी हे अतिशय उपयुक्त आसन असून ते करण्यासही सोपे आहे. पृष्ठभागावर बॅलन्स करुन पाय आणि हात जमिनीपासून वर उचलत एकमेकांना समांतर राहतील असे बघावेत. या आसनामुळे छातीचा भाग स्ट्राँग होण्यास मदत होतेच, त्याशिवाय कंबर, पाठ, पाय, खांदे यांचे स्नायू बळकट होण्यास या आसनाचा चांगला फायदा होतो. 

२. फोरआर्म स्टँड 

कोपरापर्यंत हात टेकवून पायाचे चवडे टेकवावेत. यामध्ये सगळा भार हा हातांवर येत असल्याने हात बळकट होण्यास मदत होते. यामुळे शरीराच्या मधल्या भागावरही चांगला ताण येतो आणि त्यामुळे शरीराची ताकद वाढण्यास मदत होते. तसेच या आसनामुळे मेटाब़ॉलिझम, लवचिकता सुधारण्यास मदत होते. इतकेच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही हे आसन फायदेशीर असते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. बकासन 

हाताच्या पंजांवर संपूर्ण शरीराचा भार घेणारे हे आसनही ताकद वाढविण्यासाठी उपयुक्त असते. यासाठी एकाग्रतेची आवश्यकता असून हे आसन सरावाने जमू लागते. खांदे, मनगट, पाठीचा वरचा भाग, पोटाचे स्नायू बळकट करण्यास या आसनाचा उपयोग होतो. त्यामुळे हातांची ताकद वाढवण्यासाठी हे आसन जरुर करायला हवे. 

Web Title: Not only figure like Alia Bhatt but also fitness, Alia's trainer says do 3 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.