Lokmat Sakhi >Fitness > वजन कमी होत नाहीये? मग पादहस्तासन, वीरभद्रासन आणि हलासन करा!

वजन कमी होत नाहीये? मग पादहस्तासन, वीरभद्रासन आणि हलासन करा!

वजन कमी करण्यासाठी म्हणून योगविद्येमधे पादहस्तासन, वीरभद्रासन, हलासन, भुजंगासन आणि सूर्यनमस्कार यांना अधिक महत्त्व दिलेलं आहे. ही पाच आसनं शास्त्रशुध्दपध्दतीने नियमित केली तर हमखास वजन कमी होतं असं तज्ज्ञ सांगतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 01:51 PM2021-06-21T13:51:43+5:302021-06-21T13:56:47+5:30

वजन कमी करण्यासाठी म्हणून योगविद्येमधे पादहस्तासन, वीरभद्रासन, हलासन, भुजंगासन आणि सूर्यनमस्कार यांना अधिक महत्त्व दिलेलं आहे. ही पाच आसनं शास्त्रशुध्दपध्दतीने नियमित केली तर हमखास वजन कमी होतं असं तज्ज्ञ सांगतात.

Not losing weight? Then do Padahastasana, Veerabhadrasana and Halasana! | वजन कमी होत नाहीये? मग पादहस्तासन, वीरभद्रासन आणि हलासन करा!

वजन कमी होत नाहीये? मग पादहस्तासन, वीरभद्रासन आणि हलासन करा!

Highlights पोटाची चरबी कमी करण्यासाठी पादहस्तासन हे आसन खूप फायदेशीर असतं. वीरभद्रासन हे आसन योगसाधनेत मोहकता आणतं.हलासन करताना पोटावर दाब पडून पोट कमी होतं आणि चेहेरा तेजस्वी दिसतो.

 
सध्याच्या आपल्या धावपळीच्या जीवनशैलीचा महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे वजन वाढणं. खाणं-पिणं आणि व्यायाम या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुलक्र्ष होत असल्यानं वजन वाढतं. वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रित ठेवण्यासाठी योगासनाशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. वजन कमी करण्यासाठी म्हणून योगविद्येमधे पाच आसनांना अधिक महत्त्व दिलेलं आहे. ही पाच आसनं शास्त्रशुध्दपध्दतीने नियमित केली तर हमखास वजन कमी होतं असं तज्ज्ञ सांगतात.

वजन कमी करणारी योगासनं

पादहस्तासन

 पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे आसन खूप फायदेशीर असतं. हे आसन केल्यनं पोटची चरबी कमी होण्यासोबतच हदयाशी निगडित आजारसुध्दा यामुळे दूर होतात. एक महिना नियमितपणे पादहस्तासन केल्यास पोटाची चरबी नाहिती होते. तसेच पोटाशी निगडित अपचन, पोट फुगणं, समस्या यापासून सुटका होते. पादहस्तासन केल्यानं शरीरास लवचिकता येते आणि थकवा दूर होऊन एकाग्रता वाढते.
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर सरळ एका रेषेत उभं राहवं. यानंत्र ह्ळुह्ळु खाली झुकत दोन्ही हातांच्या बोटांनी पायाला हात लावण्याचा प्रयत्न करावा. काही सेकंद याच स्थितीत राहावं. अपेक्षित परिणामांसाठी दिवसभरात हे आसन पाच ते सात वेळा करावं.

वीरभद्रासन

वीरभद्र नावाच्या आक्रमक योध्दाचे नाव या आसनाला दिले गेले आहे. वीरभद्रासन म्हण्जजे वीर, शूर, योध्दा. भद्रा म्हणजे शुध्द आणि आसन म्हणजे शरीराची स्थिती.
वीरभद्रासन हे एक अत्यंत डौलदार आणि लालित्यपूर्ण आसन आहे. हे आसन योगसाधनेत मोहकता आणते. या आसनाने हात पाय आणि पाठीच्या स्नायूंना बळकटी येते आणि ते सुडौल बनतात. शरीर संतुलित राहते आणि काम करण्याची क्षमता वाढते. बैठे काम करणार्‍यांसाठी हे आसन फायदेशीर ठरतं.
वीरभद्रासन करताना सरळ उभं राहावं. दोन्ही पायात चार ते साडेचार फुटाचं अंतर असू द्यावं. उजवा पाय 90 अंश बाहेरच्या बाजूस वळवावा आणि डावा पाय 15 अंशात ठेवावा. दोन्ही हात उचलून खांद्याच्या रेषेत आणावे. हाताचे तळवे वरच्या दिशेस ताणावेत. श्वास सोडत उजव्या गुडघ्यातून वाकावं आणि उजवीकडे वळून पाहावं. आसनात स्थिर होताच हात आणखी वरच्या दिशेनं ताणा. कंबर आणखी थोडी खाली दाबण्याचा प्रयत्न करा. कंबर खाली दाबताना श्वासोच्छवास चालूच ठेवा. काही सेकंद याच स्थितीत राहिल्यानंतर श्वास घेत सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली आणा. हेच आसन नंतर डाव्या बाजूसही करा. म्हणजे डावा पाय 90 अंश बाहेरच्या बाजूस वळवा आणि उजवा पाय 15 अंशात ठेवावा.

हलासन

 

हे आसन करताना शरीराचा आकार हल म्हणजेच नांगराप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला हलासन असं म्हणतात. हलासनामुळे शरीरात नवचैतन्य निर्माण होतं. या आसनात पाठीच्या कण्याला भरपूर व्यायाम मिळतो. हलासनाचा नियमित सराव करणार्‍या व्यक्ती चपळ, स्फूर्तीशील असतात. या आसनानं पोटावर दाब पडून पोट कमी होतं आणि चेहेरा तेजस्वी दिसतो.
हलासन करताना आधी जमिनीवर पाठी टेकवून झोपावं. दोन्ही हात शरीराला समांतर ठेवावेत आणि हाताचे तळवे जमिनीला टेकवावेत. आता श्वास घेत हळूहळू दोन्ही पाय सोबत वर उचलावेत. श्वास घेण्याची क्रिया आणि पाय वर उचलण्याची क्रिया सोबतच व्हायला हवी. ही क्रिया करताना गुडघ्यात पाय वाकणार नाहीत याची काळजी घ्यावी. ही क्रिया करतान हात आणि पाठ जमिनीला टेकलेले हवेत. पाय नव्वद अंशाच्या कोनात आल्यावर श्वास सोडत पाय डोक्याकडे न्यावेत. डोक्याकडे आलेले पाय हळूह्ळू जमिनीला टेकवावेत. जमिनीला पायाचे अंगठे टेकतात. सुरुवातीला हे एकदम जमत नाही. पण सरावानं चांगलं जमतं. ही क्रिया करताना पाय एकमेकांना जुळलेले ठेवावेत. शेवटच्या स्थितीत हनुवटी गळ्यास चिकटणे आवश्यक आहे. य स्थितीत आठ ते दहा सेकंद राहावं. नंतर हळूहळू पाय 90 अंशात पुन्हा सरळ आणून शरीरला झटका न देता पाय जमिनीवर ठेवावेत.

भुजंगासन

भुजंग म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उगारलेल्या फण्यासारखा दिसतो. या आसनाच्या नियमित सरावानं पोटाची चरबी कमी होते. छाती, खांदे, मान आणि मस्तकाचा भाग सुदृढ व मजबूत बनतो. पाठीचे दुखणे आणि विकार नष्ट होतात. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात. या आसनाच्या नियमित सरावानं स्रीयांचे बीजाशय आणि गर्भाशय कार्यक्षम आणि सुदृढ बनते.
भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याची आसनपध्दती आहे. आधी जमिनीवर पालथे झोपावे. हनुवटी छातीला टेकलेली आणि कपाळ जमिनीला टेकलेलं असावं. शरीर हलकं करावं. हाताचे पंजे छातीजवळ आणावेत. नंतर हाताच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग अजिबात हलू देऊ नये. या आसनानं पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्थित ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर व्यव्स्थित ताण पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरायचा असतो. आठ ते दह सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर हळूहळू श्वास सोडत पूर्वस्थितीत यावं. हे आसन चार ते पाच वेळा करावं.

 

सूर्य नमस्कार

सूर्य नमस्कार अर्थात सूर्याला वंदन . सूर्य नमस्कारात 12 योग मुद्रांचा समावेश असतो. या बारा योग मुद्रांमधे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना लक्ष्य केलं जातं. सूर्य नमस्कारानं संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. नियमित सूर्य नमस्कार केल्यानं वजन कमी होतं, शरीर निरोगी राहातं. शरीर लवचिक ठेवण्यासाठी नियमित 12 सूर्यनमस्कार घालावेत असं तज्ज्ञ म्हणतात.

Web Title: Not losing weight? Then do Padahastasana, Veerabhadrasana and Halasana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.