Lokmat Sakhi >Fitness > Milind Soman Fitness : एका मिनिटात ६० पुशअप्स अन् ३० सुर्यनमस्कार; ५५ वर्षीय मिलिंद सोमणनं सांगितलं रोज नाश्त्याला काय खातो

Milind Soman Fitness : एका मिनिटात ६० पुशअप्स अन् ३० सुर्यनमस्कार; ५५ वर्षीय मिलिंद सोमणनं सांगितलं रोज नाश्त्याला काय खातो

Milind Soman Fitness : तो म्हणाला की, ''या सर्व गोष्टी माझ्यासाठी अधिक चांगल्या आहेत. मला काजू खूप आवडतात, त्यामुळे खिचडीमध्ये काजू घालायला विसरत नाही.''

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 12:17 PM2021-08-29T12:17:17+5:302021-08-29T18:01:10+5:30

Milind Soman Fitness : तो म्हणाला की, ''या सर्व गोष्टी माझ्यासाठी अधिक चांगल्या आहेत. मला काजू खूप आवडतात, त्यामुळे खिचडीमध्ये काजू घालायला विसरत नाही.''

Milind Soman Fitness : Milind soman do 60 pushups in a minute and 30 times suryanamaskar eats 3 kg fruits every morning | Milind Soman Fitness : एका मिनिटात ६० पुशअप्स अन् ३० सुर्यनमस्कार; ५५ वर्षीय मिलिंद सोमणनं सांगितलं रोज नाश्त्याला काय खातो

Milind Soman Fitness : एका मिनिटात ६० पुशअप्स अन् ३० सुर्यनमस्कार; ५५ वर्षीय मिलिंद सोमणनं सांगितलं रोज नाश्त्याला काय खातो

Highlightsजीवनात धावणे खूप महत्वाचे आहे. तो म्हणाला की, ''अनेक लोक शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धावतात, पण मी आरोग्य आणि आनंदासाठी धावतो. मी हळू हळू धावतो, पण लांब अंतर पार करतो. अंतर पूर्ण करण्यास सहनशक्ती पुरेशी असणं माझ्यासाठी फार महत्वाची आहे.'' मिलिंद सोमन साखरेपासून दूर राहतो पण तूप, गूळ, केळी, आंबा खाणं सोडत नाही. या फळांमध्ये चांगल्या प्रमाणात साखर असते, कारण शरीर हे सर्व पदार्थ  ग्लायकोजेनमध्ये मोडतात.

(Image credit- Instagram) 

प्रसिद्ध अभनेता आणि सुपर मॉडेल मिलिंद सोमण अशा लोकांसाठी आदर्श आहे जे ५० नंतर स्वतःला म्हातारं समजतात. फिटनेसच्या बाबतीत मिलिंद सोमणचा हात कोणीही धरू शकत नाही.   मिलिंद आपला फिटनेस वर्कआऊट, रूटीन, डाएटमुळे नेहमीच चर्चेत असतो.  50 वर्षांनंतर, क्वचितच कोणी असे करण्याचा विचार करेल, परंतु सुप्रसिद्ध फिटनेस फ्रिक मिलिंद सोमणनं इन्स्टाग्रामवर त्याचा अद्भुत अनुभव शेअर केला आहे. त्यांच्या मते, अंतर 400 किमी किंवा 100 मीटर असले तरीही काही फरक पडत नाही, काही फरक पडत असेल तर तो फक्त प्रयत्न आहे. मी प्रयत्न केले आणि माझ्या ध्येय साध्य केले.

कमी इम्यूनिटी आणि तापातसुद्धा ५० किमीचे अंतर पार केले

एथलिट आयशा बिलमोरियाशी इंस्टाग्रामवर लाइव्ह संभाषणादरम्यान त्यानं सांगितले की, ''युनिटी एक चांगली संकल्पना आहे. जरी मी यासाठी कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही आणि मी आठवड्यात 30 किलोमीटर धावत होतो. धावताना कमी प्रतिकारशक्ती आणि ब्राँकायटिसच्या सौम्य लक्षणांमुळे मला 104 ताप आला होता, परंतु रिकव्हरी इतकी वेगानं झाली की मी 24 तासांच्या आत पुन्हा उठू शकलो आणि दिवसातून 50 किलोमीटर धावू शकलो. जर आपण नियमितपणे निरोगी जीवनशैलीचा स्वीकारली असाल तरच हे सर्व शक्य आहे.

अणवाणी पायांनी ४२० किलोमीटर धावला मिलिंद

धावण्याचे महत्व

जीवनात धावणे खूप महत्वाचे आहे. तो म्हणाला की, ''अनेक लोक शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धावतात, पण मी आरोग्य आणि आनंदासाठी धावतो. मी हळू हळू धावतो, पण लांब अंतर पार करतो. अंतर पूर्ण करण्यास सहनशक्ती पुरेशी असणं माझ्यासाठी फार महत्वाची आहे.'' 

मिलिंद सोमणचा वर्कआऊट प्लॅन

या लाइव्ह चॅटमध्ये त्याने आपल्या वर्कआउटचे सिक्रेटही शेअर केले. त्याने सांगितले की, ''फिटनेसचा अर्थ बायसेप्स किंवा ट्रायसेप्स मिळवणं नाही.  फिटनेस म्हणजे कधीही काहीही करण्यास सक्षम असणे. मी मायक्रो वर्कआउट करतो. एका वेळी 30 सेकंद ते 3 मिनिटांच्या दरम्यान. मी दररोज सुमारे 15-20 मिनिटे व्यायाम करतो आणि मला दररोज 30 सूर्यनमस्कार करायला 7 मिनिटे लागतात. मी एका मिनिटाला 60 पुशअप्स करतो आणि ६२ पुशअप्स मारण्याचा प्रयत्न करतो.'' 

आहार

मिलिंद सोमन साखरेपासून दूर राहतो पण तूप, गूळ, केळी, आंबा खाणं सोडत नाही. या फळांमध्ये चांगल्या प्रमाणात साखर असते, कारण शरीर हे सर्व पदार्थ  ग्लायकोजेनमध्ये मोडतात. जे शरीराला कार्य करण्यासाठी आवश्यक असते. तो म्हणाला की, ''या सर्व गोष्टी माझ्यासाठी अधिक चांगल्या आहेत. मला काजू खूप आवडतात, त्यामुळे खिचडीमध्ये काजू घालायला विसरत नाही.''

त्याचा आहार बघितल्यावर असे वाटते की तो आहारासाठी कठीण नियमांचे पालन करत नाही. त्यानं सांगितले की, '' मी जे काही खातो ते  कधीही मोजत नाही, किंवा मी कधीही कॅलरी मोजत नाही. मी माझ्या आयुष्यात कधीही कोणत्याही विशेष आहाराचे पालन केले नाही. मी जेवढे खाऊ शकतो तेवढेच खातो. मला 7-8 वर्षांपूर्वी चॉकलेटची चटक लागली होती. मी 1.25 किलो चॉकलेट खायचो. पण हळूहळू मी माझ्या आहारात साखरेपासून दूर राहायला सुरूवात केली.

मांसाहार टाळला. आता शाकाहारी जेवणाला माझे प्राधान्य आहे. मी फक्त चव बदलासाठी मांसाहार खातो. एखाद्याचा यावर विश्वास बसणार नाही, पण माझ्याकडे रोज सकाळी 3 किलो फळ येतात. 5-6 आंबे, 6 केळी माझ्या आहारात समाविष्ट आहेत.''
 

Web Title: Milind Soman Fitness : Milind soman do 60 pushups in a minute and 30 times suryanamaskar eats 3 kg fruits every morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.