Lokmat Sakhi >Fitness > शिर्षासन करणं सोपं नाहीच, पण ते शिकून घ्या... ताकदच नाही सौंदर्यही वाढते, पहा फायदे..

शिर्षासन करणं सोपं नाहीच, पण ते शिकून घ्या... ताकदच नाही सौंदर्यही वाढते, पहा फायदे..

शिर्षासन योगासनातलां महत्त्वाचं आसन. गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द दिशेनं कराव्या लागणार्‍या या आसनात शरीर निरोगी आणि मन शांत करण्याची ताकद आहे. हे आसन करायला अवघड वाटत असलं तरी त्याचे फायदे मात्र अनेक आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 05:31 PM2021-06-17T17:31:57+5:302021-06-18T14:14:04+5:30

शिर्षासन योगासनातलां महत्त्वाचं आसन. गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द दिशेनं कराव्या लागणार्‍या या आसनात शरीर निरोगी आणि मन शांत करण्याची ताकद आहे. हे आसन करायला अवघड वाटत असलं तरी त्याचे फायदे मात्र अनेक आहेत.

It is not easy to do shirshasana, but learn it .. It not only strengthens but also enhances beauty, see the benefits | शिर्षासन करणं सोपं नाहीच, पण ते शिकून घ्या... ताकदच नाही सौंदर्यही वाढते, पहा फायदे..

शिर्षासन करणं सोपं नाहीच, पण ते शिकून घ्या... ताकदच नाही सौंदर्यही वाढते, पहा फायदे..

Highlightsनजर चांगली करण्यासाठी शिर्षासन नित्यनेमानं करावं.आपले खांदे आणि हातही बळकट करायचे असतील तर शिर्षासन योग्य पर्याय आहे.मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी शिर्षासन हे उत्तम आसन आहे.

 योगासन हा आरोग्यासाठी उत्तम व्यायाम मानला जातो. कारण योगासनानं शरीराचं संतुलन, ताकद आणि लवचिकता वाढते. योगासनातल्या प्रत्येक आसनाचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र स्थान आणि महत्त्व आहे. शिर्षासन हे देखील योगासनातलं एक महत्त्वाचं आसन. शिर्षासनाला योगासनातला राजा म्हटलं जातं. या आसनाचे फायदे जाणून घेतल्यास आपल्यालाही त्याची खात्री पटेल.

शिर्षासन कसं करावं

 आधी दोन्ही पाय दुमडुन वज्रासनात बसावं. दोन्ही हात समोर ठेवून एकमेकांमधे अडकवून जमिनीवर ठेवावे. बोटांमधे असलेल्या जागेमधे डोकं ठेवून त्या बोटांमधे व्यवस्थित ठेवा. नंतर पाय उचलण्याचा प्रयत्न करावा. पहिल्या प्रयत्नात पाय वर करता येत नाही. त्यासाठी लक्ष केंदित करावं लागतं. लक्ष केंदित केल्यावर पाय वर नेता येतात. पाय सरळ वर घेऊन अशा आसनात अर्धा मिनिट राहावं. श्वास सुरु ठेवावा. हे आसन करताना मानेची हालचाल करु नये. यामुळे दुखापतीची शक्यता असते. हे आसन करताना भिंतीचा आधार घेतला तरी चालतो.

शिर्षासन करण्याचे फायदे

1 नजर सुधारते- नजर चांगली राहाण्यासाठी डोळ्यांना रक्त पुरवठा व्यवस्थित होणं गरजेचं आहे. शिर्षासनामुळे डोळ्यांच्या आजूबाजूला असलेल्या सर्व नसांना रक्त पुरवठा होऊन त्या अधिक चांगल्या पध्दतीने काम करतात. नजर चांगली करण्यासाठी शिर्षासन नित्यनेमानं करावं.
2 खांदे आणि हात बळकट होतात- आपल्या शरीराचा भार आपले दोन पाय उचलतात. पण आपले खांदे आणि हातही बळकट करायचे असतील तर शिर्षासन योग्य पर्याय आहे. शिर्षासनात संतुलनाला महत्त्व असतं. हे संतुलन खांदे, हात आणि श्वसन अर्थात छातीवर अवलंबून असतं. हे आसन करताना सर्व अवयवांची मदत होते.
3 पचन सुधारते- शिर्षासनाचा पचनक्रियेवर परिणाम होतो. शरीरातील पाचक रसाला सक्रीय करुन शरीराची पचनक्रिया सुरळीत करण्याचं काम या आसनामुळे होतं.बध्दकोष्ठतेचा त्रासही या आसनानं जातो.
4 स्नायु बळकट होतात- शरीराच्या हालचालीसाठी हाडं जितके महत्त्वाचे तितकेच स्नायूदेखील. स्नायू बळकट नसतील तर शरीराला थकवा येतो. तो येऊ नये म्हणून शिर्षासन करावं. शिर्षासन करताना स्नायुंना आराम मिळतो तसेच बळकटीही मिळते.
5 लक्ष केंद्रित होतं- शिर्षासन हे अगदी जपून आणि बारकाईनं करावं लागतं. इतर आसनांपेक्षा हे आसन करायला कठीण असतं. त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. हे आसन करताना मन शांत असणं अत्यंत गरजेचं असतं. मनातले सगळे विचार काढून टाकावे लागतात. अशा प्रकारे शिर्षासन करताना मन शांत होऊअलक्ष केंद्रित करण्याचं कौशल्य साध्य होतं.
6 मानसिक आरोग्य सुधारतं- शिर्षासन करताना मेंदूला व्यवस्थित रक्त पुरवठा होतो. त्यामुळे मनातली अस्वस्थता कमी होते. मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी शिर्षासन हे उत्तम आसन आहे.
7 झोप सुधारते- हल्ली अनेकांना निद्रानाशाची समस्या जाणवते. योगसाधनेतून झोपेसंदर्भातील तक्रारी दूर होतात. शिर्षासनामुळे रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे शरीराला आल्हाद मिळतो. त्यामुळे रात्री शांत झोप लागण्यास मदत होते.
8 लैंगिक समस्या दूर होतात- आपल्या जगण्यातल्या रोजच्या ताणतणावाचा थेट परिणाम लैंगिक आरोग्य आणि जोडीदारासोबतच्या लैंगिक संबंधावर होतो. या समस्या नीट हाताळल्या गेल्या नाही तर किचकट होतात. शिर्षासनामुळे लैंगिक तक्रारी कमी होण्यास मदत मिळते. शिर्षासनातून शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. आणि या ऊर्जेतून लैंगिक संबंध सुधारतात.
9 काम करण्याची प्रेरणा मिळते- शिर्षासन हे शरीर आणि मनावरचा ताण कमी करतं. या आसनातून मानसिक शांती मिळते, शारीरिक व्याधी कमी होतात. ताणतणाव निवळतात. नित्य नेमानं शिर्षासन केल्यास शरीर आणि मनात बदल होतात. ऊर्जा आणि उमेद वाढल्याने काम करण्याची , नव्या गोष्टी शिकण्याची प्रेरणा मिळते.

महिलांसाठी फायदेशीर

  • शिर्षासन हे महिलांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आसन आहे. महिला एकाच वेळी अनेक ताणांचा सामना करतात. या आसनामुळे मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठी होत असल्यानं मेंदू शांत होतो. ताणाचं व्यवस्थापन करायला जमतं. त्
  • शिर्षासनानं केस चांगले होतात. डोक्याला रक्तपुरवठा होत असल्यानं केसांच्या मुळाशी असलेला रक्तप्रवाह सुधारतो त्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहातं.
  • शिर्षासन करताना चेहेर्‍याचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे चेहेर्‍याची त्वचा तजेलदार होते. चेहेर्‍यावा सुरकुत्या पडत नाही.
  •  शिर्षासनाचे फायदे दिसण्यासाठी ते किमान पाच मिनिटं तरी करावं. सुरुवात 30 सेकंदांनी करावी. पण नंतर जमायला लागल्यावर ते पाच मिनिटं तरी करावं.
  •  शिर्षासन हे अवघड आसन आहे. गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द दिशेनं हे आसन करतो त्यामुळे शरीराचा तोल सांभाळण जमायला हवं. त्यासाठी हे आसन आधी तज्ज्ञांकडुन नीट शिकून सुरुवातीला त्यांच्या मार्गदर्शनाखाली करावं.
  • पण हे आसन गरोदर महिलांनी करु नये. मासिक पाळीदरम्यान हे आसन करु नये.

- प्रज्ञा पाटील
(योगाचार्य, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर)

Web Title: It is not easy to do shirshasana, but learn it .. It not only strengthens but also enhances beauty, see the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yogaयोग