Lokmat Sakhi >Fitness > हॉट शमा सिकंदरचं फेवरिट कुर्मासन!- या आसनाचे 7 फायदे; ते ही झटपट!

हॉट शमा सिकंदरचं फेवरिट कुर्मासन!- या आसनाचे 7 फायदे; ते ही झटपट!

शमा सिकंदरनं नुकताच इन्स्टाग्रामवर कुर्मासन घालत आपल्या फॉलोअर्सना नमस्कार केला आहे. हे आसन करायला शरीरात खूप लवचिकतेची गरज असते. शमानं हे आसन अवघड असलं तरी पाठ, मांड्या, पोटर्‍या यांचा चांगला व्यायाम होत असल्याचं ती सांगते. हे आसन करायला अवघड आहे. पण या आसनामुळे शरीराच्या महत्त्वाच्या स्नायुंना व्यायाम मिळून ते मजबूत होतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 03:03 PM2021-11-30T15:03:42+5:302021-11-30T15:12:26+5:30

शमा सिकंदरनं नुकताच इन्स्टाग्रामवर कुर्मासन घालत आपल्या फॉलोअर्सना नमस्कार केला आहे. हे आसन करायला शरीरात खूप लवचिकतेची गरज असते. शमानं हे आसन अवघड असलं तरी पाठ, मांड्या, पोटर्‍या यांचा चांगला व्यायाम होत असल्याचं ती सांगते. हे आसन करायला अवघड आहे. पण या आसनामुळे शरीराच्या महत्त्वाच्या स्नायुंना व्यायाम मिळून ते मजबूत होतात.

Hot Shama Sikandar's like to do Kurmasan! - 7 benefits of this asan! | हॉट शमा सिकंदरचं फेवरिट कुर्मासन!- या आसनाचे 7 फायदे; ते ही झटपट!

हॉट शमा सिकंदरचं फेवरिट कुर्मासन!- या आसनाचे 7 फायदे; ते ही झटपट!

Highlightsआसन घालताना शरीराचा आकार कासवासारखा होतो म्हणून त्याला कुर्मासन असं म्हणतात.  कुर्मासन घातल्याचा मुख्य परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो. यामुळे कोणत्याही कामातील एकाग्रता वाढते. या आसनामुळे पोटावरची चरबीही कमी होते.

सध्या टीव्हीवर मालिकांचं राज्य आहे. वेगवेगळ्या वाहिन्यांवरील मालिकांनी आपआपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. मालिकांमधील अभिनेत्रींचा लूक, साडी, ड्रेस याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष असतंच. बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही महिलांना टी.व्ही मालिकेतल्या नायिकांचं जास्त कौतुक वाटतं. कारण सरळ आहे, मालिका हा आज केवळ मनोरंजनाचं नाही तर जगण्यातील तणाव घालवून दोन घटका आनंद मिळवण्याचा मार्ग आहे. तर मालिकांमधून आनंद मिळवणार्‍या महिला प्रेक्षकांना शमा सिकंदर हे नाव , तिचा चेहरा चांगलाच जाना पहचाना भासेल. शमा सिकंदरच्या फिटनेसबद्दलच्या पोस्टना सर्वात जास्त प्रतिसाद मिळतो. तिचे फॅन्स, फॉलोअर्सना या पोस्टमधून फिटनेससाठी काय करावं याबाबतची प्रेरणा मिळते.

Image: Google

शमानं नुकताच इन्स्टाग्रामवर कुर्मासन घालत नमस्कार केला आहे. हे आसन करायला शरीरात खूप लवचिकतेची गरज असते. शमानं हे आसन अवघड असलं तरी पाठ, मांड्या, पोटर्‍या यांचा चांगला व्यायाम होत असल्याचं ती सांगते.

कुर्मासन करायला अवघड आहे. पण या आसनामुळे आखडलेले स्नायू मोकळे होतात. हे आसन केल्यावर भावनिक पातळीवरही खूप मुक्तता अनुभवण्या मिळते. पाठ, पोट, मांड्या हाता पायाचे स्नायू या सर्वांवर कुर्मासन हे एका उपायाप्रमाणे काम करतं. स्नायुंना ताकद देणारा, त्यांना मोकळेपणा देणारं कुर्मासन केल्यानं पाठीचे स्नायू मोकळे होतात.

Image: Google

शमा सिकंदरची पोस्ट वाचताना आणि तिचं कुर्मासनात वाकणारं शरीर बघून शमा ही केवळ प्रसिध्दीसाठी नाहीतर फिटनेससाठी व्यायाम करते हे दिसून येतं. शमाचं हे कुर्मासन बघून आपलंही शरीर एवढं वाकतं का हे बघण्याची इच्छा होईलच. तेव्हा कुर्मासनाचे फायदे लक्षात घेऊन कुर्मासन करण्याची योग्य पध्दत समजून घ्यावी. हे आसन पहिल्या झटक्यात जमत नाही. त्यासाठी थोडा सराव लागतो. सरावानं कुर्मासन घालणं सोयीचं जातं.

Image: Google

कसं करावं कुर्मासन?

कुर्म हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ कासव असा होतो. हे आसन घालताना शरीराचा आकार कासवासारखा होतो म्हणून त्याला कुर्मासन असं म्हणतात.

कुर्मासन करताना योगासनं करण्यासाठी जसं खाली बसतो, त्याप्रमाणे पाय पसरुन ताठ बसावं. शक्य होईल तेवढं अंतर दोन्ही पायात ठेवावं. पायांच्या टाचा जमिनीला घट्ट चिकटलेल्या हव्यात. आता कमरेतून खाली वाकत समोरच्या बाजूने झुकावं. कमरेतून समोर झुकल्यामुळे पाठीला वाक येत नाही. नंतर दोन्ही पाय गुडघ्यांमधे वाकवल्यामुळे पाठीला वाक येत नाही. नंतर दोन्ही पाय गुडघ्यांमधे थोडे वाकवून दोन्ही हात गुडघ्याच्या फटीतून बाहेर काढावेत. शरीर पुढे नेणे आणि आपले हात गुडघ्याच्या फटीतून बाहेर काढणं या दोन्ही क्रिया एकाचवेळी सुरु ठेवाव्या लागतात. आता आपले खांदे आणि हनुवटी जमिनीला लागेपर्यंत समोर वाकत राहावं. आणि दोन्ही हात मागच्या दिशेने सरळ लांबवावेत. या आसनाच्या शेवटच्या स्थितीत आपले खांदे आनि हनुवटी जमिनीला टेकलेली असते. पूर्ण कुर्मासनात बसल्यानंतर डोळे बंद करुन श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करावं.

Image: Google

कुर्मासन केल्यानं काय होतं?

1. रोज कुर्मासन घातल्यास आपली एकाग्रता वाढते.
2. या आसनामुळे मन स्थिरावून आपल्या मनाला शांतता मिळते.
3. हे आसन करताना पाठीच्या मणक्यावर हलकासा ताण पडतो आणि तेथील रक्तप्रवाह सुधारतो.
4. हे आसन करताना आपल्या पोटावरसुध्दा हलकासा ताण पड्तो. त्यामुळे पोटामधील सर्व इंद्रियांचा व्यायाम होतो आणि पचन तंत्र सुधारण्यास मदत होते.
5. बध्दकोष्ठतेचा त्रास या आसनामुळे दूर होतो.
6. पोटावरची चरबी कमी होते.
7 . या आसनाचा नियमित सराव केल्यास हर्नियाचा त्रास थांबतो असं तज्ज्ञ म्हणतात.
8. कुर्मासन केल्यानं आपल्या शरीरातील जवळपास प्रत्येक सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो आणि ते मजूबत होतात.
9. या आसनाचा नियमित सराव केल्यास आपली श्वसनप्रणालीही सुधारते.

Web Title: Hot Shama Sikandar's like to do Kurmasan! - 7 benefits of this asan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.