Lokmat Sakhi >Fitness > कौतुकास्पद! भिंतीचा आधार घेत २ मिनिटांहून अधिक वेळ बसली; दिव्यांग महिलेची विक्रमाला गवसणी

कौतुकास्पद! भिंतीचा आधार घेत २ मिनिटांहून अधिक वेळ बसली; दिव्यांग महिलेची विक्रमाला गवसणी

Dubai women breaks record : पायांना मजबूती देण्यासाठी केला जातो. बरेचजण असा व्यायाम प्रकार ३० सेकेंदही करू शकत नाहीत. पण एका अपंग तरूणींना याच व्यायाम प्रकारात विक्रम रचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 02:28 PM2021-06-10T14:28:30+5:302021-06-10T14:49:36+5:30

Dubai women breaks record : पायांना मजबूती देण्यासाठी केला जातो. बरेचजण असा व्यायाम प्रकार ३० सेकेंदही करू शकत नाहीत. पण एका अपंग तरूणींना याच व्यायाम प्रकारात विक्रम रचला आहे.

Dubai women breaks record : Dubai women breaks record for longest static wall sit | कौतुकास्पद! भिंतीचा आधार घेत २ मिनिटांहून अधिक वेळ बसली; दिव्यांग महिलेची विक्रमाला गवसणी

कौतुकास्पद! भिंतीचा आधार घेत २ मिनिटांहून अधिक वेळ बसली; दिव्यांग महिलेची विक्रमाला गवसणी

Highlights''मी वयाच्या १५ व्या वर्षी  बोन कॅन्सरमुळे पाय गमावला.  २०१३ मध्ये पुन्हा एकदा अपघातात मागच्या भागाला इजा झाली. त्यानंतर मला उभं राहता येणंही शक्य नव्हतं. म्हणून डॉक्टरांनी शरीरात दोन स्कू फिट करत कसबसं माझ्या शरीराला आधार दिला.''

फॅट बर्न होण्यासाठी वेगवेगळे व्यायाम प्रकार लोकांकडून केले जातात. त्यातीलच एक म्हणजे static wall sit.  हा व्यायाम प्रकार अगदी सामान्य असून स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, पायांना मजबूती देण्यासाठी केला जातो. बरेचजण असा व्यायाम प्रकार ३० सेकेंदही करू शकत नाहीत. पण एका अपंग तरूणींना याच व्यायाम प्रकारात विक्रम रचला आहे.

दुबईमधील रहिवासी असलेल्या डेरिन बार्बरने २ मिनिट २४ सेकंद या स्थितीत राहून विक्रम रचला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या प्रभावी पराक्रमासह, फिटनेस आणि जीवनशैली प्रशिक्षकाने (Samson's chair/static wall sit (female) - LA1) सॅमसनची चेअर / स्थिर वॉल सिट - एलए 1 चा या व्यायामात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 

डेरिनचा  एक पाय गुडघ्यांपर्यंतच लांब असून तिनं कृत्रिम पायांचा आधार घेतला आहे. तिचा हा विक्रम गिनीज वर्ल्ड इम्प्रिमेंट रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आला आहे. ज्यात शारीरिक, बौद्धिक आणि व्हिज्युअल कमकुवज असलेल्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. ४ जूनला ती या स्पर्धेत सहभागी झाली होती. हा रेकॉर्ड मोडणं तिच्यासाठी खूप मोठं यश होतं. कारण  याच महिन्यात  १९९३ मध्ये तिनं पहिल्यांदा आपला पाय गमवाला त्यानंतर २८ वर्षांनी याच महिन्यात तिच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. 

डेरिनं हा  विक्रम केल्यानंतर सांगितले की, ''मी वयाच्या १५ व्या वर्षी  बोन कॅन्सरमुळे पाय गमावला.  २०१३ मध्ये पुन्हा एकदा अपघातात मागच्या भागाला इजा झाली. त्यानंतर मला उभं राहता येणंही शक्य नव्हतं. म्हणून डॉक्टरांनी शरीरात दोन स्कू फिट करत कसबसं माझ्या शरीराला आधार दिला.'' नंतर स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्या बरं करण्याच्या प्रयत्नात तीनं जीमला जायला सुरूवात केली. नंतर तिला हळूहळू फिटनेस आणि स्पोट्सची आवड निर्माण झाली.

डेरिननं पुढे सांगितलं की, '' २०१३ मध्ये माझ्या अपघातानंतर मी जिममध्ये जाण्यास सुरवात केली. या कालावधीत मला माझी क्षमता कळली, आव्हानांवर मी कितपत मात करू शकते, किती पुढे जाऊ शकते हे मला याच कालावधीत कळलं.'' डॅरीनला कॅनेडियन अ‍ॅथलीट आणि कर्करोग संशोधन कार्यकर्ते टेरी फॉक्स यांनी प्रेरित केले होते, ज्यांना त्यांचा एक पाय  गमवावा लागला होता.

 "त्याच्या कथेने मला सर्व सोशल मीडिया नेटवर्क्सवर सार्वजनिक प्रोफाइल सुरू करण्यास आणि जीवन आणि तंदुरुस्तीच्या प्रवासानं लोकांना प्रेरित करण्यासाठी  विशेषत: क्रीडा क्षेत्रातील अपंगांच्या समावेशाबद्दल जागरूकता वाढविण्यास प्रेरित केले. अपंग लोक कसे अडथळ्यांची पर्वा न करता यशस्वी होऊ शकतात हे शिकवले." असंही ती म्हणाली. डॅरिनला आपली २ मुलं आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करतात. सध्या ते वैयक्तिक लक्ष्य गाठण्यासाठी  कठोर परिश्रम करण्याची योजना आखत आहेत.

Web Title: Dubai women breaks record : Dubai women breaks record for longest static wall sit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.