Do you know how to give a CPR? | सीपीआर कसा द्यायचा माहिती आहे का?
सीपीआर कसा द्यायचा माहिती आहे का?

सीपीआर म्हणजे काय 

हृदयगती बंद पडलेल्या म्हणजेच कार्डियाक अरेस्ट आलेल्या व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत जे प्रथमोपचार केले जातात त्याला सीपीआर (Cardiopulmonary Resuscitation) असे म्हणतात.

सीपीआर ही एक साधीसोपी क्रिया असून, त्यासाठी तुम्ही डॉक्टर किंवा वैद्यकीय ज्ञान असलेली व्यक्तीच असले पाहिजे असं  नाही.

सीपीआर कसा द्यावा?

एखादी व्यक्ती निपचीत पडलेली आढळल्यास..
 

1) प्रतिसाद पाहा आणि मदत मागवा : संबंधित व्यक्तीच्या दोन्ही खांद्यावर थाप मारून तिला उठविण्याचा प्रयत्न करा आणि प्रतिसाद मिळतो का ते पाहा. श्वासोच्छ्वास चालू आहे की नाही ते पाहा आणि काहीच प्रतिसाद नसल्यास त्वरित मदतीसाठी हाक मारा किंवा 108 क्रमांकावर फोन करायला सांगा. 
2) चेस्ट कॉम्प्रेशन्स : वेळ न दवडता छातीच्या हाडावर दोन्ही हातांनी दाब अर्थात चेस्ट कॉम्प्रेशन द्यायला सुरुवात करा. 
मिनिटाला 100 ते 120 या दराने चेस्ट कॉम्प्रेशन्स द्या. चेस्ट कॉम्प्रेशन्स देताना छाती किमान पाच ते सहा सेंटिमीटर दाबली जाईल ते पाहा. दोघेजण असल्यास प्रत्येक दीड ते दोन मिनिटांनी अदलाबदल करा. या प्रक्रियेत खंड पडू देऊ नका.  प्रतिसाद मिळेपर्यंत चेस्ट कॉम्प्रशन्स सुरू ठेवा. प्रतिसाद मिळाल्यास चेस्ट कॉम्प्रेशन्स थांबवा.
3) लवकरात लवकर ट्रान्सफर करा : वैद्यकीय मदत मिळाली की लवकरात लवकर संबंधित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यास सहकार्य करा. 


Web Title: Do you know how to give a CPR?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.