Lokmat Sakhi >Beauty > Dawn आणि Dusk स्किन केअर रुटीन म्हणजे नेमकं काय? ते करावं की.... तज्ज्ञ सांगतात..

Dawn आणि Dusk स्किन केअर रुटीन म्हणजे नेमकं काय? ते करावं की.... तज्ज्ञ सांगतात..

Skin Care Routine for glowing skin: सकाळी आणि रात्रीचं स्किन केअर रुटीन कसं असावं आणि त्वचेसोबतच (skin) आरोग्यासाठीही सकाळचा आणि रात्रीचा आहार (diet for skin) कसा असावा, याविषयी वाचा तज्ज्ञांचा सल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 02:45 PM2022-05-20T14:45:38+5:302022-05-20T14:46:34+5:30

Skin Care Routine for glowing skin: सकाळी आणि रात्रीचं स्किन केअर रुटीन कसं असावं आणि त्वचेसोबतच (skin) आरोग्यासाठीही सकाळचा आणि रात्रीचा आहार (diet for skin) कसा असावा, याविषयी वाचा तज्ज्ञांचा सल्ला 

What is Dawn and Dusk skin care routine and nutrition, important for glowing and healthy skin? | Dawn आणि Dusk स्किन केअर रुटीन म्हणजे नेमकं काय? ते करावं की.... तज्ज्ञ सांगतात..

Dawn आणि Dusk स्किन केअर रुटीन म्हणजे नेमकं काय? ते करावं की.... तज्ज्ञ सांगतात..

Highlightsआजकाल स्किन केअर रुटीनबाबत Dawn आणि Dusk हे शब्द नेहमीच ऐकायला येतात. याचा नेमका अर्थ काय आणि त्वचेसाठी आपला सकाळ- संध्याकाळचा आहार कसा असावा?

नितळ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा कोणाला नको असते.. पण अशी त्वचा मिळविण्यासाठी त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. सकाळ आणि संध्याकाळचं स्किन केअर रुटीन तर पाळावं लागतंच पण त्यासोबतच आपण कसा आणि किती आहार घेतो, व्यायाम करतो की नाही, या काही गोष्टीही अतिशय महत्त्वाच्या ठरतात. आजकाल स्किन केअर रुटीनबाबत Dawn आणि Dusk हे शब्द नेहमीच ऐकायला येतात. याचा नेमका अर्थ काय आणि त्वचेसाठी आपला सकाळ- संध्याकाळचा आहार कसा असावा, याविषयीची माहिती सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पुजा माखिजा (Nutritionist Pooja Makhija) यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे शेअर (instagram share) केली आहे.

 

Dawn आणि Dusk म्हणजे काय?
- सौंदर्य जगतात स्किन केअर रुटीनबाबत हे शब्द वापरले जातात. पण या नेमक्या काय संकल्पना आहेत, याविषयीची माहिती सौंदर्यतज्ज्ञ डॉ. रश्मी शेट्टी यांनी दिली आहे. Dawn स्किन केअर म्हणजे दररोज सकाळी उठल्यानंतर आणि Dusk स्किन केअर म्हणजे रात्री झोपण्यापुर्वी त्वचेची काळजी कशी घ्यावी, याविषयीचे काही नियम. 
- Dawn स्किन केअर रुटीन अंतर्गत दररोज सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चेहरा धुवावा. रात्रभर आपल्या त्वचेतून अनेक प्रकारचे स्त्राव, टॉक्झिन्स बाहेर पडलेले असतात. ते स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर चेहरा धुवावा. यानंतर कोणत्याही ऑईल बेस क्रिमने किंवा एखाद्या तेलाने चेहऱ्याला मसाज करावा. त्वचेत होणारं रक्ताभिसरण वेगवान करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. 


- Dusk स्किन केअर रुटीन अंतर्गत तुम्ही संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यानंतर चेहरा धुणं गरजेचं आहे. त्यानंतर चेहऱ्याला व्हिटॅमिन सी असणारं सिरम लावावं. रात्री झोपण्यापुर्वी पुन्हा एकदा चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवावा आणि जे मॉईश्चरायझर त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी उपयुक्त ठरेल, ते लावावे. अशा पद्धतीने जर त्वचेची दररोजच काळजी घेतली तर नक्कीच त्वचेचे सौंदर्य अधिक वाढणार यात वाद नाही. 

 

सकाळ आणि संध्याकाळचा आहार कसा असावा (diet for glowing skin)
सकाळची सुरुवात

- ग्लासभर पाणी आणि त्यात एखादा चमचा सब्जा, हे पेय पिऊन दिवसाची सुरुवात करणं अतिशय उत्तम. कारण सब्जा शरीराला थंडावा देतो शिवाय ॲसिडीटी, अपचन असे त्रासही सब्जा पाणी प्यायल्याने कमी होतात.
- त्यानंतर ५ भिजवलेले आणि सालं काढलेले बदाम खावेत. कारण त्यातून प्रोटीन्स, फायबर आणि शरीरासाठी पोषक असणारे फॅट्स मोठ्या प्रमाणात मिळतात. 
सायंकाळचा आहार
दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यात मोठा गॅप असतो. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी काहीतरी प्रोटीन स्नॅक्स खायला हवा. जेणेकरून तुमची भुकही भागेल आणि मग रात्रीच्यावेळी होणारं ओव्हरइटींगही टाळले जाईल. 

 

Web Title: What is Dawn and Dusk skin care routine and nutrition, important for glowing and healthy skin?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.