Lokmat Sakhi >Beauty > स्ट्रेसचा आणि केस गळण्याचा काय संबंध? असं म्हणून दुर्लक्ष कराल तर पस्तावाल!

स्ट्रेसचा आणि केस गळण्याचा काय संबंध? असं म्हणून दुर्लक्ष कराल तर पस्तावाल!

आपल्या मेंदूला विश्रांतीच नाही. काय महत्वाचं काय गरजेचं नाही हे तो कसं ठरवणार? असा अस्थिर मेंदू आपल्याला तरी कशी शांत झोप येऊ देईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 05:24 PM2021-04-05T17:24:25+5:302021-04-05T17:28:57+5:30

आपल्या मेंदूला विश्रांतीच नाही. काय महत्वाचं काय गरजेचं नाही हे तो कसं ठरवणार? असा अस्थिर मेंदू आपल्याला तरी कशी शांत झोप येऊ देईल?

stress and hair loss can be related, treat it. | स्ट्रेसचा आणि केस गळण्याचा काय संबंध? असं म्हणून दुर्लक्ष कराल तर पस्तावाल!

स्ट्रेसचा आणि केस गळण्याचा काय संबंध? असं म्हणून दुर्लक्ष कराल तर पस्तावाल!

Highlights ताण फार वाटला तर मानसिक उपचार तज्ज्ञाचाही सल्ला घ्यायला हवा.

निशांत महाजन

स्ट्रेस येतोच. आताशा तर खूप येतो. आपण ठरवलं की, जे होईल  ते होईल, आपण विचार करुन काय होणार तरी ताण येतोच. कधी आपल्याला कळतही नाही सतका ताण आपल्या सूप्त मनातवर असतो.  त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.  चेहऱ्यावर, त्वचेवर, त्याचे परिणाम  सहज दिसतात. त्वचा कोरडी झालेली असते.  
पण असं होतं खरं. चेहरा ओढलेला, ताणलेला दिसतो.  डोक्याची स्कीन खूपच टाइट आहे, केसात कोंडा आहे, पित्त-स्ट्रेस आहे का असे प्रश्न विचारले जातातच आपल्याला. 

आपण म्हणतो असं काही नाही, कारण आपल्याला स्ट्रेस आला आहे याची जाणीवही आपल्याला नसते. पण अशावेळी आपली त्वचाच तशी सूचना देण्याचं काम करू लागते. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर केसातला डँड्रफ. केसात डँड्रफ होणं हे देखील आपल्याला असणार्या टेन्शनचं तणावाचं प्रतिबिंबच.
पण स्ट्रेस म्हणजे नेमकं काय?
स्ट्रेस आला असं आपण म्हणतो तेव्हा नेमकं काय झालेलं असतं, जेव्हा आपल्या अपेक्षा  पूर्ण होत नाही,  कोणत्याही बाह्य कारणांमुळे शरीर, मन, भावना, विचार यांच्यातील समतोल कमी होतो किंवा ढासळू लागतो,
त्याचा ताण येतो. काही गोष्टी तर आपल्या हातातच नसतात, पण त्यांचा ताण येतो.
आपण परफेक्ट असावं, आपलं सगळं उत्तमच असावं, मशीन इतक्या वेगाने काम व्हावं अशा आपल्या स्वत:कडून अपेक्षा असतात. किंवा इतरांच्या तशा अपेक्षांना आपण  बळीही पडतो.
आपण मागे पडू अशी भीती आपल्याला छळते.
त्यात हातातल्या सोशल मीडीयापासून सर्व माध्यमातून प्रमाणात माहितीचा मारा होतो की आपल्या मेंदूला
विश्रांतीच नाही. काय महत्वाचं काय गरजेचं नाही हे तो कसं ठरवणार? असा अस्थिर मेंदू आपल्याला तरी कशी शांत झोप येऊ देईल?
त्यातून ताण वाढतच जातो. आपण इतरांकडे पाहून आपले सुखदु:ख ठरवतो. सतत तागडं हातात घेऊन सुख मोजतो. मग ताण येणारच. त्यामुळे आपली त्वचा म्हातारी दिसणारच. आणि पुढे शरीरावर त्याचा परिणामही होणारच.
यासंदर्भात त्वचाउपचार तज्ज्ञ  डॉ. निलेश गोरे  सांगतात, ‘डार्क सर्कल, चेहऱ्यावर पिंपल्स ही आम तक्रार आहे. त्यात क्रेस गळणं, खूप गळणं, खूप कोंडा, वजन वाढणं, त्वचेवर काळे डाग किंवा त्वचा काळवंडणं
ही सारी लक्षणं आपल्याला सांगतात, की ताण कुठं आहे पहा. आहार पहा, व्यायाम आहे की नाही तपासा. मात्र आपण वरवर गोष्टी करुन त्याकडे दुर्लक्ष करतो.  पुरेशी झोप नसणं, पाणी न पिणं, काही हालचाल नाही नुसते विचार करणं हे सारंही मग ताणाला आणि पुढे त्वचा विकारांना आमंत्रण देतं. त्यामुळे आहारात अँटी आक्सिडंट्स
फळांचा, विविध भाज्यांचा समावेश करावा. केळींचे सेवन उपयुक्त ठरू शकते. केळं खाल्ल्याने मेंदूतील सेंराटोनिन हार्मोन सक्रिय होते. हे हार्मोन काही काळ नैराश्य कमी करण्यास मदत करते.   ताण फार वाटला तर मानसिक उपचार तज्ज्ञाचाही सल्ला घ्यायला हवा.
 

Web Title: stress and hair loss can be related, treat it.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.