lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > Skin Whitening Knee and Elbow : चेहरा गोरा अन् कोपर, मान, गुडघे काळे दिसतात? स्किन एक्सपर्ट्सनी सांगितले काळपटपणा दूर करण्याचे उपाय

Skin Whitening Knee and Elbow : चेहरा गोरा अन् कोपर, मान, गुडघे काळे दिसतात? स्किन एक्सपर्ट्सनी सांगितले काळपटपणा दूर करण्याचे उपाय

Skin Whitening Knee and Elbow : कोपर आणि गुडघ्यांचा काळपटपणा (पिग्मेंटेशन) दूर करण्यासाठी त्याने खूप सोप्या आणि घरगुती टिप्सही दिल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 02:49 PM2021-10-18T14:49:11+5:302021-10-18T15:22:25+5:30

Skin Whitening Knee and Elbow : कोपर आणि गुडघ्यांचा काळपटपणा (पिग्मेंटेशन) दूर करण्यासाठी त्याने खूप सोप्या आणि घरगुती टिप्सही दिल्या आहेत.

Skin Whitening Knee and Elbow : Blonde face, elbows, neck, knees look black? Skin experts say the solution to eliminate blackheads | Skin Whitening Knee and Elbow : चेहरा गोरा अन् कोपर, मान, गुडघे काळे दिसतात? स्किन एक्सपर्ट्सनी सांगितले काळपटपणा दूर करण्याचे उपाय

Skin Whitening Knee and Elbow : चेहरा गोरा अन् कोपर, मान, गुडघे काळे दिसतात? स्किन एक्सपर्ट्सनी सांगितले काळपटपणा दूर करण्याचे उपाय

कोपर आणि गुडघ्यावरील त्वचा शरीराच्या इतर भागांच्या त्वचेपेक्षा वेगळी असते. येथील त्वचा अधिक लवचिकता असते आणि त्वचेच्या पेशी अधिक मऊ असतात. जेणेकरून सांध्यांमध्ये लवचिकता राहील. परंतु अधिक मऊ असल्यामुळे पिग्मेंटेशनआणि खडबडीतपणा देखील त्वचेवर त्वरीत होतो. त्याचे कारण आणि निदान दोन्ही जाणून घेतल्याने तुम्ही तुमच्या कोपर आणि गुडघ्याची त्वचाही चमकवू शकता.

रश्मी शेट्टीरा एक सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ आहेत. सोशल मीडियावर त्यांचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. रश्मी अनेकदा  चाहत्यांसह त्वचेची काळजी आणि स्किन केअर टिप्स शेअर करतात. कोपर आणि गुडघ्यांचा काळपटपणा (पिग्मेंटेशन) दूर करण्यासाठी त्यांनी खूप सोप्या आणि घरगुती टिप्सही दिल्या आहेत.

१) कोपर आणि गुडघ्यांचा काळपटपणा

कोपर आणि गुडघा हे दोन्ही सांधे आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनात सगळ्यात जास्त झिजतात. म्हणून, उठताना, लॅपटॉप आणि टेबलवर काम करताना, कोपर घासलं जाऊ नये याची काळजी घ्या.  डॉ रश्मी म्हणतात की तिथलं पिग्मेंटेशन काढून टाकण्यासाठी घासू नका. त्याऐवजी, त्वचेवर स्क्रब वापरा.

२) अतिरिक्त हायड्रेशन

रश्मी म्हणतात की पिग्मेंटेशन झाल्यानंतर कोपर आणि गुडघ्यांच्या त्वचेला अतिरिक्त हायड्रेशनची आवश्यकता असते. म्हणूनच तुम्ही या भागासाठी क्रीम स्वरूपात मॉइश्चरायझर वापरावे. कोपर आणि गुडघ्यांच्या त्वचेवर  मॉइश्चरायझर आणि मलई लावावी जेणेकरून येथे पिग्मेंटेशनची समस्या उद्भवणार नाही, ती कोरडी आणि उग्र दिसत नाही. 

यासाठी, रश्मी यांनी काही घटक असलेले क्रीम आणि लोशन लावण्याची शिफारस केली आहे. त्या म्हणतात की झेलिक एसिड, ग्लाइकोलिक एसिड, रेटिन-ए आणि व्हिटॅमिन-सी असलेली क्रीम वापरा. कारण हे सर्व त्वचेतील रंगद्रव्याचा वेग नियंत्रित करतात आणि त्वचेचा रंग काळपट होण्यापासून रोखतात.

३) या गोष्टी विसरू नका

रश्मी म्हणतात की प्रत्येकाने शरीराच्या महत्वाच्या भागांवर सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. विशेषत: जर तुम्हाला पिग्मेंटेशनची समस्या असेल तर ती खूप महत्वाची ठरते.  उन्हात बाहेर पडण्याआधी सनस्क्रीन लावायलाच हवं. 

४) सप्लिमेंट्स फायदेशीर ठरतात

स्किन ब्राईट आणि स्किन हायड्रेट सारख्या उपायांबाबत डॉ रश्मी म्हणतात की, ते कोरडी त्वचा आणि पिग्मेंटेशन रोखण्यासाठी आणि  त्वचा मऊ आणि स्वच्छ बनवण्यासाठी खूप मदत करतात. याशिवाय ब्यूटी क्लिनिकमधील काही विशेष उपायांनी तुम्ही  ही समस्या टाळू शकता. 

Web Title: Skin Whitening Knee and Elbow : Blonde face, elbows, neck, knees look black? Skin experts say the solution to eliminate blackheads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.