lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > Skin Allergy : घामामुळे येणारे हिप्स, मांड्यांवरचे फोड त्रासदायक ठरताहेत? डॉक्टरांनी दिलेल्या उपायांनी घ्या काळजी

Skin Allergy : घामामुळे येणारे हिप्स, मांड्यांवरचे फोड त्रासदायक ठरताहेत? डॉक्टरांनी दिलेल्या उपायांनी घ्या काळजी

Skin Allergy : हे टाळण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या. बॅक्टेरियांचा संसर्गास दूर करण्यासाठी रात्रीही हळद घातलेलं दूध प्यावे. कोरफड जेल सकाळी घेतले जाऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 12:13 PM2021-07-22T12:13:42+5:302021-07-22T12:26:24+5:30

Skin Allergy : हे टाळण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या. बॅक्टेरियांचा संसर्गास दूर करण्यासाठी रात्रीही हळद घातलेलं दूध प्यावे. कोरफड जेल सकाळी घेतले जाऊ शकते.

Skin Allergy : Hip and thigh boils home remedies | Skin Allergy : घामामुळे येणारे हिप्स, मांड्यांवरचे फोड त्रासदायक ठरताहेत? डॉक्टरांनी दिलेल्या उपायांनी घ्या काळजी

Skin Allergy : घामामुळे येणारे हिप्स, मांड्यांवरचे फोड त्रासदायक ठरताहेत? डॉक्टरांनी दिलेल्या उपायांनी घ्या काळजी

Highlightsजोपर्यंत पुळ्या या वेदनारहित आहेत. तुम्हाला ताप, अस्वस्थता जाणवत नसेल तेव्हा घरगुती उपायांचा अवलंब करून पुळ्यांच्या समस्येला कमी करता येऊ शकतं. हळदीचे एंटीसेप्टीक आणि एंटी इन्फेमेटरी गुणधर्म आपल्या मांड्या आणि मागच्या मागावरील पुळ्या ठीक करण्यास फायदेशीर ठरतात.

हिप्स आणि मांड्याच्या आतल्या भागावर आलेल्या पुळ्या अनेकदा त्रासदायक ठरतात. सुज येणं,  पुळ्यांमध्ये पस, पाणी जमा होणं अशा समस्या येऊ शकतात. मांड्यांच्या आतल्या भागावर आलेल्या पुळ्या घामामुळे येण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यात वातावरणात आद्रता जास्त असल्यानं ही समस्या वाढते.  डॉक्‍टर मोहन कार्की यांनी एका बेवसाईडशी बोलताना  याबाबत अधिक माहिती दिली आहे.  ते होलिस्टिक हेल्थकेअर फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. 

डॉक्टर काय सांगतात

या समस्येपासून बचावासाठी आपल्याला दोन, तीन गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. सुरक्षेच्या नियमांचे पालन करायला हवे. जर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टिम चांगली नाहीये किंवा शरीरात हाइड्रेशनची कमतरता आहे. पोट व्यवस्थित साफ होत नाहीये तर शरीरातील टॉक्सिन्सची लेव्हल वाढते. परिणामी इन्फेक्शन वाढण्याची शक्यता जास्त असते. पुळ्यांची समस्या इन्फेक्शनमुळे वाढत जाते. अनेकदा शरीरातून जास्त प्रमाणात उष्णता बाहेर येत असल्यामुळे असं होतं. त्यासाठी कारणांबाबत माहिती असणं गरजेचं आहे. 

पुळ्यांपासून बचावासाठी नैसर्गिक उपाय

हे टाळण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या. बॅक्टेरियांचा संसर्गास दूर करण्यासाठी रात्रीही हळद घातलेलं दूध प्यावे. कोरफड जेल सकाळी घेतले जाऊ शकते. फोडांची समस्या असल्यास सुरुवातीला बर्फाचा वापर केल्याने म्हणजे त्रास कमी होण्यास मदत होते. जर ही समस्या अधिक वाढली असेल तर आपण संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी हळदीचा वापर करू शकता.

पोट साफ ठेवा

ही समस्या टाळण्यासाठी पोट साफ असणं फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही रात्री त्रिफळा घ्यावा. आपल्या आहारात फायबरचे प्रमाण वाढवा. आपल्या आहारात कोशिंबीरी आणि उकडलेल्या भाज्यांचा समावेश करा. असे केल्याने शरीर त्याची डीटॉक्स प्रक्रिया योग्य प्रकारे करण्यास सक्षम राहिल. तसेच स्वच्छतेचीही पूर्ण काळजी घ्या. उन्हाळ्यात स्वत: ला स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा अंघोळ करा. जर या सर्व नियमांचे पालन केले गेले तर  पोट व्यवस्थित साफ राहिल. परिणामी पुळ्या येण्याची समस्या कमी होईल.  जोपर्यंत पुळ्या या वेदनारहित आहेत. तुम्हाला ताप, अस्वस्थता जाणवत नसेल तेव्हा घरगुती उपायांचा अवलंब करून पुळ्यांच्या समस्येला कमी करता येऊ शकतं. संक्रमण वाढतंय असं वाटत असेल तर  मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. 

हळद

हळदीचे एंटीसेप्टीक आणि एंटी इन्फेमेटरी गुणधर्म आपल्या मांड्या आणि मागच्या मागावरील पुळ्या ठीक करण्यास फायदेशीर ठरतात. हल्दीतील करक्यूमिन वेदनांपासून आराम देण्यास फायद्याचे ठरते. त्यासाठी  हळदीची पावडर आणि पाणी मिसळून एक घट्ट पेस्ट तयार करा. कमीत कमी २० ते ३० मिनिटांसाठी हे मिश्रण असंच ठेवून द्या. दिवसातून दोन ते तीनवेळा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल. 

कडुलिंब

नैसर्गिक एंटीसेप्टिक आणि  एंटीबॅक्‍टीरियल गुणांमुळे कडुलिंब आरोग्याच्या समस्यांसाठी फायद्याचे ठरते. हिप्स आणि इतर थाईसवरच्या  पुळ्यांसाठी कडुलिंब एक प्रभावी उपाय आहे.  त्यासाठी मुठभर कडुलिंबाची पानं धुवून त्याची पेस्ट तयार करून घ्या. आपण त्यात हळदीची पावडर मिसळू शकता. ही पेस्ट प्रभावित जागेवर लावा. आणि  ३० मिनिटांनी सुकल्यानंतर धुवून टाका. दिवसातून दोन ते तीनवेळा हा प्रयोग केल्यास आराम मिळेल. 

Web Title: Skin Allergy : Hip and thigh boils home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.