खडेमीठाचा फेसपॅक लावलाय तुम्ही कधी? - ही घ्या खडे मीठाची सुंदर जादू, घरच्याघरी उत्तम फेसपॅक - Marathi News | sea salt is effective home remedy to cleanse and refresh the skin. effective! | Latest sakhi News at Lokmat.com
>ब्यूटी > खडेमीठाचा फेसपॅक लावलाय तुम्ही कधी? - ही घ्या खडे मीठाची सुंदर जादू, घरच्याघरी उत्तम फेसपॅक

खडेमीठाचा फेसपॅक लावलाय तुम्ही कधी? - ही घ्या खडे मीठाची सुंदर जादू, घरच्याघरी उत्तम फेसपॅक

त्वचेसाठी घरगुती उपाय करताना स्वयंपाकघरातील खडे मीठ हे खूप उपयोगी पडतं. खडे मीठात मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, सोडियम आणि पोटॅशिअम असतं. आपल्या त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आणि त्वचा कायम आर्द्र आणि ओलसर ठेवण्यासाठी खडे मीठाचा चांगला उपयोग होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 06:20 PM2021-05-14T18:20:13+5:302021-05-15T11:45:38+5:30

त्वचेसाठी घरगुती उपाय करताना स्वयंपाकघरातील खडे मीठ हे खूप उपयोगी पडतं. खडे मीठात मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, सोडियम आणि पोटॅशिअम असतं. आपल्या त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आणि त्वचा कायम आर्द्र आणि ओलसर ठेवण्यासाठी खडे मीठाचा चांगला उपयोग होतो.

sea salt is effective home remedy to cleanse and refresh the skin. effective! | खडेमीठाचा फेसपॅक लावलाय तुम्ही कधी? - ही घ्या खडे मीठाची सुंदर जादू, घरच्याघरी उत्तम फेसपॅक

खडेमीठाचा फेसपॅक लावलाय तुम्ही कधी? - ही घ्या खडे मीठाची सुंदर जादू, घरच्याघरी उत्तम फेसपॅक

Next
Highlights त्वचा काळवंडणे, चेहेऱ्यावर मृत त्वचा जमा होणे या समस्या सोडवण्यासाठी खडे मीठ आणि मधाचा स्क्रब तयार करुन तो चेहेऱ्यास लावावा.आपली त्वचा कायम थकलेली , निस्तेज दिसत असेल , डोळ्यांच्या खाली सूज येत असेल तर खडे मीठाचा वापर प्रभावी ठरु शकतो.चेहेरा ताजातवाना करण्यासाठी खडे मीठाच्या पाण्याचा स्प्रेसारखा उपयोग करता येतो.

आहार विहार, व्यायाम आणि सौंदर्य हे तीन घटक व्यक्तिमत्त्वासाठी खूप महत्त्वाचे असतात. या तीन घटकांबाबत तुम्ही काय करता यावरं बाह्य व्यक्तिमत्त्व ठरत असतं.  सौंदर्य वाढवण्यासाठी  बाजारात अनेक कॉस्मेटिक्स उपलब्ध आहेत. पण त्वचेची काळजी घेण्यासाठी रसायनयुक्त घटकांचा वापर हा एका टप्प्यावर त्वचेलाच नकोसा वाटतो. मग कितीही काहीही लावा. काहीच फरक दिसत नाही. तेव्हा दोष हा फक्त कॉस्मेटिक्सचा नसतो. तर मुख्य दोष हा आपला असतो कारण आपल्या त्वचेला काय हवं ते आपल्याला ओळखताच येत नाही. त्वचेचं नैसर्गिक घटकांनी पोषण झाल्यास त्वचा फुलते आणि उजळतेही. त्यामुळे घरात कितीही क्रीम्स असल्यातरी आपण स्वत:हून त्वचेसाठी नैसर्गिक घटकांना हाताशी धरुन उपाय करायला हवेत.
त्वचेसाठी घरगूती उपाय करताना स्वयंपाकघरातील खडे मीठ हे खूप उपयोगी पडतं. खडे मीठात मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, सोडियम आणि पोटॅशिअम असतं. आपल्या त्वचेचा पोत सूधारण्यासाठी आणि त्वचा कायम आर्द्र आणि ओलसर ठेवण्यासाठी खडे मीठाचा चांगला उपयोग होतो. पण खडे मीठाचा हा आणि एवढाच उपयोग नाही. ज्यांच्या त्वचेची रंध्र मोठी असतात , चेहेऱ्यावर मूरुम, पुटकुळ्या असतात त्या खडे मीठाच्या उपायानं बऱ्या होतात. खडे मीठात जीवाणूविरोधी लढणारे घटक असतात त्यामुळे खडे मीठाच्या उपायानं त्वचा स्वच्छ होते.


त्वचा स्वच्छ आणि चमकदार करण्यासाठी खडे मीठाचा उपयोग करण्याच्या पध्दती 

- खडे मीठ आणि मधाचा स्क्रब :- कोणत्याही प्रकारची त्वचा असू देत पण प्रत्येकालाच त्वचा काळवंडणे, चेहेऱ्यावर मृत त्वचा जमा होणे यासारख्य्या समस्यांना कायम सामोरं जावं लागतं. या समस्या सोडवण्यासाठी खडे मीठ आणि मधाचा स्क्रब तयार करुन तो चेहेऱ्यास लावावा. यासाठी एका वाटीत एक मोठा चमचा मध, आणि एक छोटा चमचा खडे मीठ घ्यावं. त्यात ५-६ थेंब लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण चांगलं एकत्र करावं. आणि चेहेऱ्याला हळुवार मसाज करत लावावं. हा मसाज पाच ते दहा मिनिटं करावा. नंतर गरम पाण्यानं चेहेरा धूवावा.

- खडे मीठ आणि तेलाचा स्क्रब:- त्वचा निस्तेज आणि खडबडीत असेल त्यांच्यासाठी खडे मीठ आणि तेलाचा स्क्रब उत्तम आहे. खडे मीठात सोडियमचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्याच्या वापरानं साहजिकच चेहेऱ्यास ओलावा मिळतो. खडे मीठाच्या सहाय्यानं चेहेरा मॉश्चराइज करण्यासाठी खडे मीठासोबत तेलाचा वापर करावा लागतो.

एका वाटीत एक छोटा चमचा खडे मीठ, एक छोटा चमचा ऑलिव्ह तेल आणि एक छोटा चमचा खोबरेल तेल घ्यावं. ते चांगलं एकत्र करुन घ्यावं. हे मिश्रण पाच मिनिटं हळुवार हातानं चेहेऱ्यावर घासावं. त्यानंतर सौम्य स्वरुपाच्या फेस वॉशनं चेहेरा स्वच्छ करावा.

- आंघोळीच्य पाण्यात खडे मीठ- आपली त्वचा कायम थकलेली , निस्तेज दिसत असेल , डोळ्यांच्या खाली सूज येत असेल तर खडे मीठाचा वापर प्रभावी ठरु शकतो. त्यासाठी खडे मीठ हे आंघोळीच्या पाण्यात घालून त्या पाण्यानं आंघोळ करावी. खडे मीठाच्या वापरानं रक्तप्रवाह सुधारतो.नसा मोकळ्या होतात.  आंघोळीच्या पाण्यात खडे मीठ घातल्यास हेच काम खडे मीठ त्वचेसाठी करतो. आणि त्यामुळे त्वचा ताजीतवानी दिसते.

- खडे मीठाच्या पाण्याचा स्प्रे- चेहेरा ताजातवाना करण्यासाठी खडे मीठाच्या पाण्याचा स्प्रेसारखा उपयोग करता येतो. यासाठी १०० मिलीमीटर गरम पाणी घ्यावी त्यात एक मोठा चमचा खडे मीठ घालावं. ते चांगलं विरघळवून घ्यावं. हे पाणी एका स्प्रे बाटलीत भरावं. हे पाणी थोड्या थोड्या वेळानं चेहेऱ्यावर स्प्रे करावं. त्यामुळे चेहेरा छान ताजातवाना होतो.

Web Title: sea salt is effective home remedy to cleanse and refresh the skin. effective!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.