lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावरचे नकोसे केस काढण्यासाठी प्रियांका चोप्राच्या आईचा गव्हाचे पीठ फेसपॅक; प्रियांकाचाही आवडता

चेहऱ्यावरचे नकोसे केस काढण्यासाठी प्रियांका चोप्राच्या आईचा गव्हाचे पीठ फेसपॅक; प्रियांकाचाही आवडता

काही ना काही कारणांवरुन सतत चर्चेत असलेली प्रियांका चोप्रा शेअर करतीये तिच्या ब्यूटी ट्रीक्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 01:43 PM2021-11-24T13:43:20+5:302021-11-24T13:55:39+5:30

काही ना काही कारणांवरुन सतत चर्चेत असलेली प्रियांका चोप्रा शेअर करतीये तिच्या ब्यूटी ट्रीक्स...

Priyanka Chopra's mother's wheat flour face pack to remove unwanted facial hair; Priyanka's favorite too | चेहऱ्यावरचे नकोसे केस काढण्यासाठी प्रियांका चोप्राच्या आईचा गव्हाचे पीठ फेसपॅक; प्रियांकाचाही आवडता

चेहऱ्यावरचे नकोसे केस काढण्यासाठी प्रियांका चोप्राच्या आईचा गव्हाचे पीठ फेसपॅक; प्रियांकाचाही आवडता

Highlightsप्रसिद्ध अभिनेत्रीही आईने सांगितलेली ब्यूटी सिक्रेटस करते फॉलो चेहऱ्यावर केस असतील तर ते घालवण्यासाठी तुम्हीही हे उटणं करुन लावून बघा..

कधी चेहऱ्यावर खूप मुरुम तर कधी डाग, कधी चेहरा कोरडा पडण्याची समस्या तर कधी तेलकट. चेहऱ्यावर केस किंवा लव असण्याची समस्याही हल्ली वाढताना दिसत आहे. या समस्या सामान्य मुलींनाच त्रास देतात असे नाही तर बॉलिवूड अभिनेत्रींनाही या समस्या सतावू शकतात. मग यासाठी कधी ब्यूटी पार्लरचे उपाय किंवा कधी थेट त्वचारोगतज्ज्ञांकडे जाऊन लेझर किंवा इतर ट्रिटमेंट घेण्याचा पर्याय स्वीकारला जातो. पण मिस वर्ल्ड किताब पटकावलेली प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा असे काहीही न करता फेस हेअर घालवण्यासाठी चक्क आपल्या आईने सांगितलेले उटणे चेहऱ्याला लावणे पसंत करते. 

(Image : Google)
(Image : Google)

आता ही ‘देसी गर्ल’ इतकी मोठी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असताना असा घरगुती उपाय कसा काय करते, तर त्याबाबत प्रियांका सांगते, मला केमिकल ट्रीटमेंटस करायला विशेष आवडत नाही. त्यापेक्षा मला घरगुती उपाय जास्त आवडतात. त्यामुळे आईने सांगितलेल्या गोष्टी मी सौंदर्याच्या बाबतीत फॉलो करते. आईची म्हणजेच मधू चोप्रा यांची होममेड सिक्रेटस कायमच चांगली असतात. प्रियांकाची त्वचा मूळातच नितळ आहे, ही त्वचा आणखी चांगली ग्लोइंग करण्यासाठी ती आईने सांगितलेले घरगुती उपाय वापरते. आता चेहऱ्यावरील केसाची समस्या उद्भवण्याची अनेक कारणे असतात. हार्मोनल इम्बॅलन्स, व्यायामाचा अभाव, आनुवंशिकता किंवा काही औषधांचा परिणाम यांमुळे ही समस्या उद्भवू शकते.

तर चेहऱ्यावरील केस निघावेत यासाठी प्रियांका घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने केलेलं उटणं वापरते. आता हे उटणं ती कसं बनवते पाहूया...

१. २ चमचे गव्हाचं पीठ
२.  चिमूटभर हळद 
३. अर्धा चमचा लिंबाचा रस
४. १ चमचा दही
५. गुलाब पाण्याचे काही थेंब
 
हे सगळे एकत्र करुन घ्या. आठवड्यातून २ वेळा हा मास्क चेहऱ्याला लावा, पूर्ण वाळेपर्यंत तसाच ठेवा. वाळल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हातावर काही थेंब खोबरेल तेल घ्या आणि ओल्या चेहऱ्यावरच हाताने एकसारखे सगळीकडे लावा. हे तेल चेहऱ्यात चांगले मुरु द्या. या पॅकमुळे चेहऱ्यावरील केस निघण्यास तर मदत होईलच पण नंतर तेल लावल्याने चेहऱ्याला ओढल्यासारखेही वाटणार नाही.

प्रियांकाने नुकतेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटचे नाव बदलले, त्यावरुन सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले होते. अमेरिकन पॉपस्टार निक जोनासबरोबर लग्न केल्यानंतर प्रियांकाने आपले नाव प्रियांका चोप्रा जोनास असे केले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी तिने हे नाव बदलत पुन्हा प्रियांका चोप्रा असे केले. त्यामुळे प्रियांका आणि निक यांच्या नात्यात दरार आला का अशा चर्चांना उधाण आले होते. परंतु यावेळीही नेहमीप्रमाणे तिची आई मधु चोप्रा तिच्या मदतीला धावून आली आणि असे काहीही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रियांका आणि निक यांनी नुकतेच दिवाळी पार्टी सेलिब्रेशन केले होते. त्यावेळचे काही फोटो आणि व्हिडियोही सर्वांसमोर आले होते. त्यामुळे त्या दोघांमध्ये असे काहीही झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.    
 

Web Title: Priyanka Chopra's mother's wheat flour face pack to remove unwanted facial hair; Priyanka's favorite too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.