Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्याला लावा पपईच्या सालीचा 'हा' लेप! थंडीतही त्वचा होईल इतकी मऊ आणि चमकदार की पार्लरची गरज पडणार नाही...

चेहऱ्याला लावा पपईच्या सालीचा 'हा' लेप! थंडीतही त्वचा होईल इतकी मऊ आणि चमकदार की पार्लरची गरज पडणार नाही...

papaya peel face mask : papaya peel mask benefits : papaya peel for skin : papaya face mask for winter :पपई खाऊन सालं फेकून देतो पण याच सालींमध्ये त्वचेला चमकदार आणि मुलायम बनवण्याचे गुणधर्म दडलेले असतात....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2025 14:44 IST2025-12-02T14:35:12+5:302025-12-02T14:44:51+5:30

papaya peel face mask : papaya peel mask benefits : papaya peel for skin : papaya face mask for winter :पपई खाऊन सालं फेकून देतो पण याच सालींमध्ये त्वचेला चमकदार आणि मुलायम बनवण्याचे गुणधर्म दडलेले असतात....

papaya face mask for winter papaya peel mask benefits papaya peel for skin papaya peel face mask | चेहऱ्याला लावा पपईच्या सालीचा 'हा' लेप! थंडीतही त्वचा होईल इतकी मऊ आणि चमकदार की पार्लरची गरज पडणार नाही...

चेहऱ्याला लावा पपईच्या सालीचा 'हा' लेप! थंडीतही त्वचा होईल इतकी मऊ आणि चमकदार की पार्लरची गरज पडणार नाही...

हिवाळा सुरू झाला की, त्वचेच्या अनेक समस्या डोकं वर काढू लागतात. बाहेर कडाक्याची थंडी वाढली की त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. थंड वाऱ्यामुळे त्वचा कोरडी, रुक्ष आणि निस्तेज दिसू लागते. अनेकवेळा त्वचा काळवंडणे, पॅचेस आणि ग्लो कमी होणं यांसारख्या समस्यां दिसतात. थंडीच्या दिवसांत त्वचेची विशेष काळजी घेणे खूप आवश्यक असते. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेण्यासाठी, महागडी क्रिम्स किंवा ब्यूटी ट्रिटमेंट्स करण्याऐवजी, आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या एका नैसर्गिक आणि अत्यंत फायदेशीर उपायाचा वापर आपण करू शकतो ती म्हणजे पपईची साल!(papaya peel face mask).

पपईमध्ये असलेले नैसर्गिक एन्झाईम्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेसाठी वरदान ठरतात. आपण पपई खाऊन सालं फेकून देतो पण याच सालींमध्ये त्वचेला चमकदार आणि मुलायम बनवण्याचे गुणधर्म दडलेले असतात. या सालींचा वापर करून बनवलेला घरगुती फेसमास्क केवळ त्वचेचा कोरडेपणा दूर करत नाही, तर काळवंडलेली त्वचा उजळवून तिला नैसर्गिक चमक देतो. थंडीत (papaya face mask for winter) हरवलेला त्वचेचा ग्लो परत मिळवण्यासाठी पपईच्या सालींचा फेस मास्क कसा करायचा ते पाहूयात. 

पपईच्या सालींचा फेसमास्क थंडीत त्वचेसाठी वरदान... 

पपईच्या सालींचा फेसमास्क तयार करण्यासाठी २ ते ३ टेबलस्पून पपईच्या सालीचा लगदा, १ टेबलस्पून मध, ३ ते ४ टेबलस्पून कच्चे दूध, १ टेबलस्पून हळद आणि १ टेबलस्पून बेसन  ४ टेबलस्पून गुलाब पाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

पपईच्या सालीचा फेसपॅक कसा तयार करायचा ?

१. पपईच्या सालींना चांगल्या प्रकारे धुवून त्या मिक्सर ग्राइंडरमध्ये थोडे पाणी मिसळून एक जाडसर लगदा तयार करा.

२. एका वाटीमध्ये या पपईच्या सालीचा लगदा, मध आणि कच्चे दूध चांगले मिसळा.

३. या पेस्टमध्ये आवश्यकतेनुसार हळद, बेसन आणि गुलाब पाणी देखील मिसळा.

फेसमास्क वापरण्यासाठी तयार आहे. 

पांढऱ्या केसांना फक्त मेहेंदीच लावू नका, रोजच्या वापरातील ३ पदार्थ आहेत मेहेंदीपेक्षा बेस्ट - केस होतील काळेभोर... 

फेसमास्क त्वचेवर कसा लावावा ?  

१.  हा तयार फेसमास्क सगळ्यात आधी चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. डोळ्यांच्या आजूबाजूचा भाग सोडून लावा.

२. हा पॅक १५ ते २० मिनिटे सुकू द्या.

३. जेव्हा हा पॅक व्यवस्थित सुकेल, तेव्हा तुम्ही तो हलक्या हातांनी चोळून स्क्रबिंग करून धुवून टाका.

४. त्यानंतर आपला चेहरा आणि मान मऊ कपड्याने पुसून घ्या.

बुगडी झाली नवी! पाहा नीडल इअरकफचा नवा ट्रेंड, पारंपरिक कपड्यांवर दिसते सुपरग्लॅमरस....

पपईच्या सालीचा फेसपॅक लावण्याचे फायदे... 

१. पपईच्या सालीत असलेले पपेन एन्झाइम त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते. यामुळे चेहरा लगेच उजळ आणि फ्रेश दिसतो.
२. हिवाळ्यात कोरड्या झालेल्या त्वचेला पपईची साल नैसर्गिक मॉइश्चर देते. यामुळे त्वचा मऊ, हायड्रेटेड आणि मऊमुलायम दिसते.
३. पपईच्या सालीतील एन्झाइम्स त्वचेचा टोन समान करतात आणि काळे डाग कमी होण्यास मदत करतात.
४. पपईच्या सालीच्या फेसमास्कने मृत त्वचा सहज काढली जाते आणि त्वचेचे टेक्स्चर स्मूथ होते. 
५. पपईमध्ये एन्टी-एजिंग गुणधर्म असतात, जे त्वचेला मुलायम आणि डागरहित बनवतात, तसेच त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात.

Web Title : पपीते के छिलके का फेस पैक: सर्दियों में पाएं मुलायम, चमकदार त्वचा!

Web Summary : सर्दियों में रूखी त्वचा से छुटकारा पाएं पपीते के छिलके के फेस मास्क से! यह घरेलू उपाय त्वचा को निखारता है, काले धब्बे हटाता है और प्राकृतिक नमी प्रदान करता है, जिससे त्वचा मुलायम और चमकदार बनती है। इसके एंजाइम और एंटीऑक्सीडेंट त्वचा के लिए फायदेमंद हैं।

Web Title : Papaya peel face pack: Get soft, glowing skin this winter!

Web Summary : Combat winter dryness with a papaya peel face mask! This homemade remedy brightens skin, removes dark spots, and provides natural moisture, leaving skin soft and radiant. The enzymes and antioxidants are beneficial for the skin.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.