Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > ओपन पोर्समुळे चेहरा तर विद्रूप दिसतोच, रोज करा ५ गोष्टी-ओपनसोर्सवर प्रभावी इलाज

ओपन पोर्समुळे चेहरा तर विद्रूप दिसतोच, रोज करा ५ गोष्टी-ओपनसोर्सवर प्रभावी इलाज

Open pores make the face look ugly, do 5 things every day - effective treatment for open pores : त्वचेवरील ओपन पोर्स होतील कमी. वेळीच करा हे उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2025 14:30 IST2025-11-14T14:28:42+5:302025-11-14T14:30:04+5:30

Open pores make the face look ugly, do 5 things every day - effective treatment for open pores : त्वचेवरील ओपन पोर्स होतील कमी. वेळीच करा हे उपाय.

Open pores make the face look ugly, do 5 things every day - effective treatment for open pores | ओपन पोर्समुळे चेहरा तर विद्रूप दिसतोच, रोज करा ५ गोष्टी-ओपनसोर्सवर प्रभावी इलाज

ओपन पोर्समुळे चेहरा तर विद्रूप दिसतोच, रोज करा ५ गोष्टी-ओपनसोर्सवर प्रभावी इलाज

आजकाल ओपन पोर्सची समस्या सर्व वयोगटांमध्ये दिसून येते. चेहऱ्यावर दिसणारे हे उघडे रोमछिद्र केवळ सौंदर्यावर परिणाम करतात असे नाही, तर त्वचेच्या आरोग्यावरही थेट परिणाम करतात. त्वचेच्या पृष्ठभागावर जास्त प्रमाणात तेलनिर्मिती झाल्यास किंवा त्वचा योग्यरीत्या स्वच्छ न ठेवल्यास पोर्स मोठे होऊ लागतात. (Open pores make the face look ugly, do 5 things every day - effective treatment for open pores)प्रदूषण, वातावरणातील धूळ, जास्त सूर्यप्रकाश, हार्मोनल बदल, चुकीची क्रीम्स वापरणे, मेकअपची स्वच्छता न ठेवणे आणि वयानुसार त्वचेचा पोत बदलतो. लवचिकता कमी होते. ही काही प्रमुख कारणे ओपन पोर्स वाढण्यामागे जबाबदार मानली जातात.

ओपन पोर्स दिसायला जरी लहानसा सौंदर्यासंबंधी विषय वाटत असला तरी त्याचा त्वचेवर मोठा परिणाम होत असतो. मोठ्या रोमछिद्रांमध्ये धूळ, बॅक्टेरिया आणि तेल सहज अडकते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स अशा जंतुसंसर्गजन्य समस्या वाढू शकतात. दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास त्वचा राठ, असमान दिसते आणि त्वचेचे नैसर्गिक संरक्षण कमकुवत होते. म्हणजेच ही समस्या सौंदर्याच्या पलीकडे जाऊन त्वचेच्या आरोग्याशी थेट जोडलेली आहे.

ओपन पोर्स कमी करण्यासाठी घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरु शकतात. बर्फाचे छोटे क्यूब्स हलक्या हाताने चेहऱ्यावर फिरवल्यास त्वचा घट्ट होते आणि पोर्स तात्पुरते संकुचित होतात. गुलाबपाणी, काकडीचा रस किंवा अलोव्हेरा जेल लावल्यास त्वचा शांत होते आणि पोर्स क्लीन राहतात. बेसन, दही आणि चिमूटभर हळद यांचा हलका पॅक आठवड्यातून एकदा लावल्यास त्वचेवरील तेलकटपणा कमी होतो. तसेच टी ट्री वॉटर किंवा ग्रीन टी टोनर वापरल्यास बॅक्टेरिया कमी होऊन त्वचा स्वच्छ राहते.

काळजीच्या दृष्टीने काही गोष्टी नक्की करायला हव्यात. चेहरा दिवसातून दोनदा सौम्य फेसवॉशने धुणे, अतितेलकट क्रीम्स टाळणे, सनस्क्रीन नियमित लावणे, आणि मेकअप नीट साफ करणे. आहारात पुरेसे पाणी, फळे, हिरव्या भाज्या ठेवणे आणि झोपेची वेळ नियमित ठेवणे याचाही फायदा होतो. त्वचा जितकी हायड्रेटेड आणि स्वच्छ असेल तितकी पोर्स नैसर्गिकरित्या लहान दिसतात.

Web Title : खुले रोमछिद्रों का प्रभावी इलाज और बेदाग त्वचा पाएं।

Web Summary : खुले रोमछिद्र त्वचा के स्वास्थ्य को प्रभावित करते हैं। नियमित रूप से सफाई करें, तैलीय क्रीमों से बचें, सनस्क्रीन का उपयोग करें। बर्फ, गुलाब जल, एलोवेरा और बेसन पैक जैसे घरेलू उपचार मदद करते हैं। जलयोजन और उचित नींद जरूरी हैं।

Web Title : Effective ways to treat open pores and achieve flawless skin.

Web Summary : Open pores affect skin health. Cleanse regularly, avoid oily creams, use sunscreen. Home remedies like ice, rose water, aloe vera, and besan packs help. Hydration and proper sleep are key.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.