Lokmat Sakhi >Beauty > नेहमीच तरूण, उत्साही रहायचंय ना? मग हे ४ पदार्थ तुमच्या आहारात असायलाच हवेत 

नेहमीच तरूण, उत्साही रहायचंय ना? मग हे ४ पदार्थ तुमच्या आहारात असायलाच हवेत 

Beauty tips: आपल्या सभोवती असणाऱ्या काही जणांच्या चेहऱ्यावर नेहमीच ग्लो दिसून येतो. चेहऱ्यावरची चमक कायम राहण्यासाठी ही मंडळी नेमकं काय करतात, असा प्रश्न पडला असेल तर हे घ्या त्याचं उत्तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 07:26 PM2022-01-19T19:26:25+5:302022-01-19T19:27:00+5:30

Beauty tips: आपल्या सभोवती असणाऱ्या काही जणांच्या चेहऱ्यावर नेहमीच ग्लो दिसून येतो. चेहऱ्यावरची चमक कायम राहण्यासाठी ही मंडळी नेमकं काय करतात, असा प्रश्न पडला असेल तर हे घ्या त्याचं उत्तर...

Must have these 4 food items in your diet to rejuvenate your skin, secret for glowing skin  | नेहमीच तरूण, उत्साही रहायचंय ना? मग हे ४ पदार्थ तुमच्या आहारात असायलाच हवेत 

नेहमीच तरूण, उत्साही रहायचंय ना? मग हे ४ पदार्थ तुमच्या आहारात असायलाच हवेत 

Highlightsथोडा बदल आहारात करा आणि फ्रेश, चमकदार, तजेलदार त्वचा मिळवा. 

चेहरा कायम चमकदार, तजेलदार दिसण्यासाठी प्रत्येकीची धडपड चालू असते. या बाबतीत महिला किंवा तरूणीच पुढे आहेत, असं अजिबात नाही. महिलांप्रमाणेच पुरुषांचीही हीच इच्छा असते. यासाठी मग आपण चेहऱ्याला वेगवेगळे क्रिम, लेप लावतो. पण त्याचा परिणाम तेवढ्यापुरताच असतो. क्रिमचा किंवा लेपचा प्रभाव संपला की चेहरा पुन्हा पहिल्यासारखाच दिसू लागतो. म्हणूनच तर थोडा बदल आहारात करा आणि फ्रेश, चमकदार, तजेलदार त्वचा मिळवा. 

 

आहारात नियमितपणे असायलाच हवेत हे पदार्थ
१. संत्री आणि लिंबूवर्गीय फळं

संत्री, मोसंबी आणि लिंबू या पैकी काहीतरी तुमच्या आहारात नियमितपणे असायलाच हवं.. संत्र्यामध्ये, लिंबामध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी, शरीर आतून डिटॉक्स करण्यासाठी संत्री, मोसंबी, लिंबू यांचा खूप चांगला उपयोग होतो. या फळांमुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते. त्यामुळे ही फळे तर खावीतच पण शक्य झाल्यास कोमट पाणी आणि लिंबू असेही दररोज सकाळी प्यावे. 

 

२. पालक
पालकामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि लोह खूप जास्त प्रमाणात असते. तसेच पालकात ॲण्टी ऑक्सिडंट्सही खूप अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे पालक नियमितपणे खाल्ल्यास त्वचा तर तरूण राहतेच, शिवाय कॅन्सर होण्याचा धोकाही कमी होतो. 

 

३. टोमॅटो
सॅलर, सूप किंवा कोशिंबीरीच्या माध्यमातून दररोज काही प्रमाणात तरी टोमॅटो आपल्या पोटात जायलाच हवा. टोमॅटोमध्ये देखील खूप जास्त प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे टोमॅटो त्वचेसाठी आणि शरीरासाठी खूपच जास्त उपयुक्त आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी योग्य प्रमाणात आहे. त्यामुळे त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी टोमॅटो खायलाच हवा.. 

 

४. सफरचंद
दररोज एक सफरचंद खाणं हे आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतं. सफरचंद खाण्याचे फायदेही आपण नेहमीच ऐकत असतो. त्यामुळे आहारात नियमितपणे सफरचंद खाण्यास सुरुवात करा. सफरचंदामध्ये व्हिटॅमिन ए, ॲण्टी ऑक्सिडंट्स, फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी सफरचंद उपयुक्त ठरतं. त्वचा हायड्रेटेड असेल तर आपोआपच त्वचेवर अकाली सुरकुत्या येणं बंद होतं.

 

Web Title: Must have these 4 food items in your diet to rejuvenate your skin, secret for glowing skin 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.