lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > झूम मिटिंग्ज ते इन्स्टा क्लिक मेकअपची गरज काय, फक्त या ३ गोष्टी तुमचा LOOK बदलू शकतात. TRY IT..

झूम मिटिंग्ज ते इन्स्टा क्लिक मेकअपची गरज काय, फक्त या ३ गोष्टी तुमचा LOOK बदलू शकतात. TRY IT..

घरच्याघरी झूम मिटिंग्ज ते फेस टाइम ते इन्स्टा क्लिक सगळ्यांसाठी आपण तयारी असावं म्हणून ३ छोट्या गोष्टी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 05:28 PM2021-04-26T17:28:42+5:302021-04-26T17:35:19+5:30

घरच्याघरी झूम मिटिंग्ज ते फेस टाइम ते इन्स्टा क्लिक सगळ्यांसाठी आपण तयारी असावं म्हणून ३ छोट्या गोष्टी.

makeup, only these 3 things can change your LOOK. TRY IT .. | झूम मिटिंग्ज ते इन्स्टा क्लिक मेकअपची गरज काय, फक्त या ३ गोष्टी तुमचा LOOK बदलू शकतात. TRY IT..

झूम मिटिंग्ज ते इन्स्टा क्लिक मेकअपची गरज काय, फक्त या ३ गोष्टी तुमचा LOOK बदलू शकतात. TRY IT..

Highlightsऑनलाईन खरेदी करत असाल तर रिव्ह्यूज वाचा, व्हिडिओ पाहा. मगच खरेदी करा. 

सारीका पूरकर-गुजराथी

आता आपण घरातच आहोत. मेकअप करण्याची तशी काही गरज नाही. मात्र तरीही झूम मिटिंग, फेस टाइम ते स्वत:लाच बरं वाटावं म्हणून करायच्या काही गोष्टी म्हणून  आपण थोडं तरी प्रेझेण्टेबल रहाण्याचा प्रयत्न करतो. काहीजणी तर इन्स्टा आणि स्नॅपचॅट फोटोंसाठीही रेडी होत फोटो काढतात.  मात्र हे सारं करताना तुम्ही तीन चूका करताय का? किंवा या तीन गोष्टी जरी बदलल्या तरी तुमचा लूक बदलू शकतो आणि फार किंवा अजिबात मेकअप न करताही तुम्हाला छान प्रसन्न चेहरा देऊ शकतो. मुख्य म्हणजे आपल्याला जरा फील गुड वाटेल यासाठीही या तीन गोष्टी बदलून पहा.

 

१. काजळाऐवजी आयलायनर

काजळ लावण्याची परंपरा भारतात पूर्वीपासून आहे. काजळ लावले की डोळे टपोरे दिसतात, अशी एक धारणा आहे. परंतु, मेकअप करताना काजळाऐवजी तुम्ही न्यूड आयलायनर लावले तर डोळ्यांचे सौंदर्य आणखी खुलेल. डोळे टपोरे दिसावेत यासाठी व्हाईट आयलायनर किंवा न्यूड आय पेन्सिलचा वापर करा. डोळ्यांच्या वॉटरलाईनवरच हे लावा, बाहेर जाऊ देऊ नका. एवढं जरी केलं तरी तुमचे डोळे बोलके सुंदर दिसतील.

 

2. मेकअप लाईट

मेकअपवर करताना लाइट लावून मग करा. जे काही किरकोळ फाऊण्डेशन, लिपस्टिक लावाल तेव्हा ते प्रकाशझोतात कसे दिसतील हे पहा. मेकअप करताना, त्या आरशाला आजूबाजूला पांढरे व पिवळे लाईट्स असलेले तुम्ही पाहिले असतील. म्हणूनच  मेकअप मिररला एलईडी लाईट्स असतील याची दक्षता घ्या. ते नसतील तर खोलीतला दिवा लावून तरी मेकअप करा.

 

3.लिपस्टिकची पॅच टेस्ट 

जेव्हा जेव्हा लिपस्टिक खरेदी कराल,तेव्हा पॅच टेस्ट घ्या. कारण दोन व्यक्तींवर एकच रंग नेहमी सारखा दिसू शकत नाही. ऑनलाईन खरेदी करत असाल तर रिव्ह्यूज वाचा, व्हिडिओ पाहा. मगच खरेदी करा. ही टेस्ट केल्याशिवाय अंदाजपंचे लिपस्टिक लावू नका. ते वाईट दिसतं.

Web Title: makeup, only these 3 things can change your LOOK. TRY IT ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.