Lokmat Sakhi >Beauty > नारळाचं तेल आता ‘असं’ करा घरी झटपट, शुद्ध तेल हवं असेल तर एवढं करायलाच हवं!

नारळाचं तेल आता ‘असं’ करा घरी झटपट, शुद्ध तेल हवं असेल तर एवढं करायलाच हवं!

Make coconut oil now at home, if you want pure oil, this is what you need to do! : घरीच करा विकतपेक्षा शुद्ध नारळाचे तेल. अगदी सोपे. केसांसाठी ठरेल उपयुक्त.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2025 08:50 IST2025-05-16T08:45:50+5:302025-05-16T08:50:02+5:30

Make coconut oil now at home, if you want pure oil, this is what you need to do! : घरीच करा विकतपेक्षा शुद्ध नारळाचे तेल. अगदी सोपे. केसांसाठी ठरेल उपयुक्त.

Make coconut oil now at home, if you want pure oil, this is what you need to do! | नारळाचं तेल आता ‘असं’ करा घरी झटपट, शुद्ध तेल हवं असेल तर एवढं करायलाच हवं!

नारळाचं तेल आता ‘असं’ करा घरी झटपट, शुद्ध तेल हवं असेल तर एवढं करायलाच हवं!

केसांच्या वाढीसाठी तेलाची गरज असते. केसांना पोषण तेलामुळेच मिळते. तेल लावले नाही तर केस सुके दिसतात कोरडे पडतात. कोंडा होतो वाढही खुंटते.(Make coconut oil now at home, if you want pure oil, this is what you need to do!) केसांसाठी अनेक प्रकारची तेल आता उपलब्ध आहेत मात्र पारंपारिक नारळाचे तेल केसांसाठी सर्वांत उत्तम आहे. मात्र विकतच्या नारळ तेलातही आजकाल रसायने असतात. तेल शुद्ध नसते. नारळाचे शुद्ध तेल घरी करणे अगदी सोपे आहे. फक्त नारळ आणि पाणी हे दोन पदार्थ वापरुन नारळाचे तेल करता येते. पाहा कसे कराल.  

कृती
१. छान ताजा नारळ घ्यायचा. नारळ फोडून नीट तपासून घ्यायचा. (Make coconut oil now at home, if you want pure oil, this is what you need to do!)चांगला गोड रसाळ नारळच वापरा. नारळाची कवटी काढून टाकायची आणि नारळाचे पातळ तुकडे करायचे. जाडे तुकडे करु नका. पातळच करा. नारळाचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. त्यात पाणी घालायचे आणि नारळाचे दूध काढून घ्यायचे. व्यवस्थित वाटून घ्या. नारळाचा पूर्ण भुगा होऊ द्यायचा. 

२. एका खोलगट भांड्याला कॉटनचा फडका बांधून घ्यायचा. त्यावर वाटलेला नारळ टाकायचा. फडक्याची दोन्ही टोकं जोडायची आणि व्यवस्थित पिळून नारळाचे दूध काढून घ्यायचे. पुन्हा एकदा चोथा मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा. त्यात थोडे पाणी घालायचे. छान वाटायचे. मग परत एकदा कापडातून पिळून घ्यायचे. चोथा साठवून वापरुही शकता. मात्र त्यातील रस काढल्यावर नारळाला चव उरत नाही.  

३. आता नारळाचे दूध आठ ते नऊ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवायचे. नऊ तासांनी नारळाच्या दुधावर एक थर जमा झाला असेल आणि पाणी खाली उरले असेल. अलगद हाताने दुधाचा थर काढून घ्यायचा. पाणी वापरायचे नाही. घट्ट् झालेला नारळाचा भाग एका कढईत घ्यायचा आणि मंद आचेवर गॅस चालू ठेवायचा. हळूहळू दूध उकळायला लागेल. काही मिनिटांनी दुधाला तेल सुटायला लागेल. तेल आणि नारळाचे तुकडे वेगळे व्हायला लागतील. ते वेगळे झाल्यावर अलगद हाताने तेल काढून घ्यायचे. नारळाचा उरलेला भाग पुन्हा एकदा गरम करायचा त्याला पुन्हा तेल सुटेल मग ते तेल साठवून ठेवायचे.          

Web Title: Make coconut oil now at home, if you want pure oil, this is what you need to do!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.