Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > घरीच तयार करा मस्त लिपबाम - करायला अगदी सोपा, विकतचा महागडा जा विसरून..

घरीच तयार करा मस्त लिपबाम - करायला अगदी सोपा, विकतचा महागडा जा विसरून..

Make a great lip balm at home - very easy to make, forget about the expensive ones : विकतचा लिपबाम नको घरीच करा या पद्धतीने.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2025 10:52 IST2025-12-07T10:51:14+5:302025-12-07T10:52:26+5:30

Make a great lip balm at home - very easy to make, forget about the expensive ones : विकतचा लिपबाम नको घरीच करा या पद्धतीने.

Make a great lip balm at home - very easy to make, forget about the expensive ones | घरीच तयार करा मस्त लिपबाम - करायला अगदी सोपा, विकतचा महागडा जा विसरून..

घरीच तयार करा मस्त लिपबाम - करायला अगदी सोपा, विकतचा महागडा जा विसरून..

ओठ कोरडे पडणे, फाटणे किंवा सतत त्वचा निघणे ही आजच्या हवामानातील सामान्य समस्या झाली आहे. बाजारात अनेक लिपबाम्स उपलब्ध असले तरी त्यातील केमिकल्स, सुगंधी पदार्थ किंवा घटक काही वेळा ओठांना सुट होत नाहीत. त्यामुळे ओठांसाठी काहीतरी शुद्ध, नैसर्गिक आणि घरचा उपाय शोधणाऱ्यांना एक सोपा, सुंदर पर्याय उपलब्ध आहे घरीच लिपबाम करता येतो. (Make a great lip balm at home - very easy to make, forget about the expensive ones)आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या गोष्टींनी हा लिपबाम केवळ तयारच होत नाही तर ओठांना अतिशय खोलवर पोषण देतो.

घरी केलेला लिपबाम यातील सर्वाधिक महत्त्वाचे घटक म्हणजे तूप आणि नारळ तेल. तूप हे ओठांना मऊपणा देतं, तर नारळ तेल ओठांवरील कोरडेपणा दूर करून क्रॅक्स भरून काढण्यास मदत करतं. या दोन्हींच्या मिश्रणात मध घातल्यावर हा लिपबाम आणखीनच फायद्याचा होतो. मधातील नैसर्गिक हिलिंग गुणधर्म ओठांवरील जखमा, सुज कमी करण्यासाठी फायद्याचा ठरतो. लिपबामला थोडा घट्टपणा हवा असेल, बीजवॅक्स  वापरता येते. मात्र ते नसलं तरीही हा लिपबाम उत्तम तयार होतो.

हा लिपबाम तयार करण्याची प्रक्रिया देखील अत्यंत सोपी आहे. एका छोट्या वाडग्यात तूप आणि नारळ तेल घेऊन ते खूप हलक्या आचेवर गरम करायचे. मिश्रण वितळू लागले की त्यात मध घालून नीट ढवळायचे. जर मेण वापरणार असाल तर ते आधी वितळवून या मिश्रणात मिसळायचे. नंतर हे गरम मिश्रण एका लहान डबीत ओतून १५–२० मिनिटे सेट होऊ द्यायचे. इतकंच. थंड झाल्यावर लिपबाम तयार! 

एकदा केला की हा लिपबाम ३० ते ४५ दिवस सहज टिकतो. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात कोणतेही कृत्रिम रंग, सुगंध किंवा जड केमिकल्स नसतात. त्यामुळे तो त्वचेवर अतिशय सौम्यपणे काम करतो. रात्री झोपण्यापूर्वी किंवा दिवसातून दोन-तीन वेळा हा लिपबाम लावला की ओठांवर विलक्षण मऊपणा जाणवतो. सतत फाटणारे, रक्ताळणारे ओठ चांगले राहतील. 

या मूलभूत लिपबाममध्ये हवे असल्यास थोडा बदल करून वेगवेगळे सुंदर प्रकारही तयार करता येतात. उदाहरणार्थ, हलका गुलाबी रंग हवा असेल तर थोडासा बीटाचा रस मिश्रणात मिसळावा. कोरफड जेल घातल्यास लिपबामाला अतिरिक्त हिलिंग गुणधर्म मिळतात. तर व्हॅनिला किंवा गुलाबपाणी काही थेंब घातल्यास लिपबामाला हलका सुगंध येतो आणि लावतानाच ताजेतवाने वाटते.

Web Title: Make a great lip balm at home - very easy to make, forget about the expensive ones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.