काही जणींच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात. पिंपल्स येण्यामागे अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजे शरीरात होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलांमुळे पिंपल्स येतात. त्यामुळे आपला आहार, व्यायाम या गोष्टींकडे तर लक्ष दिलेच पाहिजे. त्यामुळे पिंपल्स येण्याचं प्रमाणही निश्चितच कमी होऊ शकतं. दुसरं म्हणजे त्वचेची काळजी घेण्यात आपण कमी पडलो तरीही त्यामुळे पिंपल्स येऊ शकतात. पिंपल्स येऊन गेले की त्यांचे काळसर डाग पुढे कित्येक दिवस आपल्या चेहऱ्यावर तसेच दिसतात. त्यामुळे सौंदर्यावर निश्चितच परिणाम होतो. म्हणूनच पिंपल्स आणि त्यांचे डाग या दोन्ही गोष्टी कमी करायच्या असतील तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा (how to get rid of pimples and its scars?). हा उपाय करण्यासाठी आपल्याला संत्र्याच्या साली लागणार आहेत.(use of orange peel for radiant glowing skin)
पिंपल्स आणि पिंपल्सचे डाग कमी करण्यासाठी उपाय
सध्या बाजारात भरपूर प्रमाणात संत्री मिळत आहेत. संत्रीमधून व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे या दिवसांत रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी संत्री खाणं खूप गरजेचं आहे. म्हूणनच या दिवसांत भरपूर संत्री खा आणि त्यांच्या सालीही जपून वापरा.
संत्रीच्या साली सावलीमध्ये कडक वाळवून घ्या. त्या वाळल्यानंतर त्यांची मिक्सरमधून फिरवून पावडर तयार करा. पावडरमध्ये थोडा ओलसरपणा जाणवला तर पुन्हा ती सावलीमध्ये वाळत घाला. आता संत्रीच्या सालींची पावडर एक चमचा घ्या.
त्यामध्ये १ चमचा मसूर डाळीची पावडर, १ चमचा तांदळाची पावडर आणि १ चमचा बेसन पीठ घाला. आता यामध्ये १ चमचा गुलाब जल आणि १ चमचा ॲलोव्हेरा जेल घाला. सगळं मिश्रण हलवून घ्या आणि चेहऱ्याला लावा.
१२ ते १५ मिनिटांनी लेप सुकायला लागल्यावर हलक्या हाताने चोळून धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चरायजर लावा. हा उपाय आठवड्यातून एकदा नियमितपणे केल्यास पिंपल्स, पिंपल्सचे डाग, चेहऱ्यावरच्या बारीक सुरकुत्या, ॲक्ने कमी होऊन त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.
