सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यासोबतच हवेतला गारवाही वाढलेला आहे. त्यामुळे ऐन लग्नसमारंभात आपण आकर्षक, सुंदर दिसावं यासाठी त्वचेची काळजी घेणं आतापासूनच सुरू करा. कारण हिवाळ्यात त्वचेला खूप जपावं लागतं. आता लग्न स्वत:चं असो किंवा दुसऱ्यांचं असो.. जेव्हा अशा खास समारंभांना आपण जातो, तेव्हा थोडा- फार मेकअप हमखास करतोच.. पण तो मेकअप आपल्या चेहऱ्यावर तेव्हाच शोभून दिसतो जेव्हा चेहरा स्वच्छ, नितळ, चमकदार असतो. त्वचेमध्ये असा बदल घडवून आणण्यासाठी पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा..(Skin Care Tips For Korean Glass Skin Glow)
कोरियन ग्लास स्किन ग्लो मिळविण्यासाठी उपाय
सध्या तर कोरियन ग्लास स्किनचा जबरदस्त ट्रेण्ड आहे. तशी त्वचा तुम्हाला मिळवायची असेल तर १ चमचा जवस पुरेसं आहे. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया..
हा उपाय करण्यासाठी १ ते २ चमचे जवस घ्या. ते मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पावडर करा. तुम्ही जास्त जवस घेऊन अशी पावडर घरात करून ठेवली तरी चालते. ही पावडर एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवल्यास महिनाभर खराब होत नाही.
आता एका पातेल्यात अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवा. त्यामध्ये १ चमचा जवस पावडर घाला. पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की त्यामध्ये १ चमचा तांदळाचं पीठ घाला. तांदळाचं पीठ आणि जवस पावडर वारंवार हलवत राहा. हळूहळू पाणी थोडं घट्ट व्हायला लागेल. त्यावेळी गॅस बंद करा.
साखरपुडा स्पेशल : साखरेचा पुडा पॅक करण्यासाठी खास डेकोरेशन आयडिया, साखरपुडा पाहताच नवरी खुश..
आता हे पाणी गाळणीने गाळून घ्या. त्यानंतर ते कोमट झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला लावा. साधारण २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चरायजर नक्की लावा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. चेहऱ्यावर लगेचच खूप छान चमक जाणवेल.
