Join us
Daily Top 2Weekly Top 5

महागड्या पार्लरला करा बाय- बॉलिवूड सेलिब्रिटीच्या रुपाचं रहस्य एक चमचा तूप! तजेलदार त्वचेसाठी करतात ‘हा’ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2025 13:57 IST

ghee for glowing skin: Bollywood beauty secrets: skin glow home remedy: चमचाभर तूप रोज सकाळी खाल्ल्याने वजन तर कमी होईलच तसेच चेहरा देखील चमकेल.

आपल्यापैकी अनेकजण सुंदर, चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी काहींना काही करत असतो. महागडी क्रीम, सिरम, फेशियल ट्रीटमेंट अशा किती तरी गोष्टी वापरुनही आपल्या त्वचेला काही रुप येत नाही.(ghee for glowing skin) बॉलिवूड सेलिब्रेटींची तुकतुकीत त्वचा पाहून आपल्याला देखील अगदी तशीच त्वचा हवी असते. अनेकदा क्रिती सनॉन, आलिया भट्टच्या तुकतुकीत चेहऱ्याचे रहस्य विचारले जाते.(Bollywood beauty secrets) बॉलीवूड सेलिब्रिटींचा फिटनेस हा बऱ्याचदा चर्चेचा विषय असतो. प्रत्येकाला ते काय खातात आणि कोणते डाएट फॉलो करतात हे जाणून घ्यायचे असते. जान्हवी कपूर, शिल्पा शेट्टी आणि कृती सेनन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी त्यांच्या दिवसाची सुरुवात चमचाभर तूपाने करतात.(skin glow home remedy)पोषणतज्ज्ञ शिखा गुप्ता म्हणतात की या छोट्याशा सवयीचा आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो. सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी एक चमचाभर तूप खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात. तूप खायचं म्हटलं की अनेकांना वजन वाढेल की काय अशी भीती वाटू लागते.(ghee benefits for face) पण तूप वजन वाढीसाठी नसून वजन कमी करण्यासह आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. चमचाभर तूप रोज सकाळी खाल्ल्याने वजन तर कमी होईलच तसेच चेहरा देखील चमकेल.(desi skincare routine)

तिशीतच केस पिकू लागले- केसगळतीने हैराण? लावा आयुर्वेदिक हेअर मास्क, होतील काळेभोर- कोंडाही कमी

पोषणतज्ज्ञ म्हणतात बहुतेक लोक दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. पण आपले हार्मोन्स, कोर्टिसोलची पातळी आणि आतड्यांचे कार्य कॅफिनचा एका घोटामुळे पुन्हा सक्रिय होतात. त्यासाठी शरीराला दिवसभर ऊर्जा मिळावी, मूड आणि पचन नीट व्हावे यासाठी सकाळी एक चमचा तुपाने सुरुवात करायला हवी. 

सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने आपल्या आतड्याचे आरोग्य फायदेशीर राहते. हे आपल्या पोटाभोवती आवरण तयार करते. यामुळे पोट फुगणे, आम्लता कमी करणे आणि पचन सुधारते. ते इन्सुलिन स्थिर राहते. ज्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते. हे तणाव संप्रेरक कॉर्टिसोलची पातळी देखील स्थिर करते. ज्यामुळे चिंता कमी होते. 

तुपात भरपूर व्हिटॅमिन ए, ड, ई, के असते. ही सगळी व्हिटॅमिन्स त्वचेला आतून पोषण देतात. आपल्या शरीरातील सूज, कोरडेपणा आणि बारीक सुरकुत्या कमी करण्यासाठी तूप उत्तम काम करतं. नियमित तूप खाल्ल्याने त्वचा आतून मऊ, टवटवीत आणि हायड्रेटेड होते. त्यामुळे महागडी क्रीमही कधी कधी जे करू शकत नाहीत ते तूप सहज करतं.

क्रिती सनॉन, आलिया भट्ट यांनी अनेक मुलाखतीत सांगितले आहे की त्या सकाळी कोमट पाण्यासोबत एक चमचा तूप घेतात.तर शिल्पा शेट्टी देखील तिच्या आयुर्वेदिक दिनचर्येत तुपाचा नियमित वापर करते. कधी जेवणात, तर कधी रिकाम्या पोटी. त्यांचं म्हणणं एकच, त्वचा सुंदर दिसायची असेल तर शरीर आतून पोषक असणे आवश्यक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bollywood celebrity beauty secret: A spoonful of ghee for glowing skin!

Web Summary : Bollywood celebrities like Shilpa Shetty start their day with ghee for radiant skin. Nutritionists say ghee improves digestion, reduces bloating, and hydrates skin from within. It contains vitamins A, D, E, and K, fighting dryness and wrinkles for a natural glow.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजीसेलिब्रिटी