lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > Hair Care Tips : दाट आणि लांबसडक केसांसाठी टाळायलाच हव्यात ५ चुका; केस होतील सिल्की आणि शायनी

Hair Care Tips : दाट आणि लांबसडक केसांसाठी टाळायलाच हव्यात ५ चुका; केस होतील सिल्की आणि शायनी

Hair Care Tips : काही नेमक्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपलेही केस लांबसडक आणि दाट दिसू शकतात, त्यासाठी काय टाळायचे पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 11:39 AM2022-05-19T11:39:53+5:302022-05-19T11:43:00+5:30

Hair Care Tips : काही नेमक्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपलेही केस लांबसडक आणि दाट दिसू शकतात, त्यासाठी काय टाळायचे पाहूया...

Hair Care Tips: 5 Mistakes To Avoid For Thick And Long Hair; The hair will be silky and shiny | Hair Care Tips : दाट आणि लांबसडक केसांसाठी टाळायलाच हव्यात ५ चुका; केस होतील सिल्की आणि शायनी

Hair Care Tips : दाट आणि लांबसडक केसांसाठी टाळायलाच हव्यात ५ चुका; केस होतील सिल्की आणि शायनी

Highlights खूप जास्त गरजेचे असेल तरच केमिकल ट्रीटमेंट घ्या अन्यथा केसांना पोत खराब होण्याची शक्यता असते. गरम पाण्यामुळे केस जास्त कोरडे आणि रखरखीत होतात. म्हणून केस गार किंवा कोमट पाण्याने धुवायला हवेत.

आपले केस लांब आणि दाट, काळेभोर असावेत असे आपल्या प्रत्येकीलाच वाटते. केस छान दिसले तर आपण सुंदर दिसतो असा आपला समज असतो आणि तो काही प्रमाणात खराही आहे. केस वाढत नसतील, खूप गळत असतील किंवा सतत कोंडा होत असेल आणि पांढरे होत असतील तर मात्र आपल्याला चिंता वाटायला लागते. मग तेल लावल्याने केसांचे पोषण होते म्हणून आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आवर्जून केसांची तेलाने चंपी करतो. इतकेच नाही तर आपल्या केसांना सूट होणारा चांगला शाम्पू कोणता याचा शोध घेतो (Hair Care Tips). कधी काही घरगुती उपाय करुन पाहतो तर कधी पार्लरमधील महागड्या ट्रीटमेंटस घेतो. पण काही नेमक्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपलेही केस लांबसडक आणि दाट दिसू शकतात, त्यासाठी काय टाळायचे पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. केसांची मुळांकडे दुर्लक्ष 

आपल्याला सतत कोंडा होणे, डोक्यात खाज येणे, केसांच्या खालची त्वचा खूप कोरडी किंवा खूप तेलकट होणे अशा समस्या असू शकतात. या गोष्टींमुळे आपल्या केसांच्या वाढीवर आणि केस गळतीवर परिणाम होत असतो. मात्र यावर वेळीच उपाययोजना केल्यास केसांची मूळे आणि पर्यायाने केस चांगले राहण्यास मदत होते. 

२. उत्पादनांची निवड 

आपल्या केसांसाठी त्यांना सूट होतील अशी उत्पादने निवडणे अतिशय महत्त्वाचे आहे. यामध्ये तेल, शाम्पू, कंडिशनर, सीरम अशा सर्व गोष्टींचा समावेश होतो. केसांचा पोत लक्षात घेऊन या उत्पादनांची निवड करायला हवी तर केस आहेत त्याहून अधिक चांगले दिसण्यास मदत होईल.

३. स्टायलिंग टूल्सचा वापर

अनेकदा आपण एखाद्या समारंभाला जाताना केस सेट करण्यासाठी स्टायलिंग टूल्सचा वापर करतो. पण या टूल्समुळे केस खराब होण्याची शक्यता असते. स्ट्रेटनर, केसांना कर्ल करण्यासाठी वापरण्यात येणारे टूल्स किंवा अगदी ब्लो ड्रायर यांमुळे केस खराब होऊ शकतात. 

(Image : Google)
(Image : Google)

४. गरम पाण्याचा वापर

केसांतील नैसर्गिक मॉईश्चर टिकून राहावे यासाठी केस गरम पाण्याने धुणे टाळावे. आपण सगळेच बहुतांश वेळा गरम पाण्याने आंघोळ करतो त्याचप्रमाणे गरम पाण्याने केस धुतो. मात्र त्यामुळे केसांचा पोत खराब होण्याची शक्यता असते हे लक्षात घ्यायला हवे. गरम पाण्यामुळे केस जास्त कोरडे आणि रखरखीत होतात. म्हणून केस गार किंवा कोमट पाण्याने धुवायला हवेत.

५. केमिकल ट्रीटमेंटस 

आपले केस सुंदर दिसावेत यासाठी अनेक जणी     केस सतत रंगवतात, स्ट्रेटनिंग किंवा रिबाऊंडनिंग, केरेटीन यांसारख्या ट्रीटमेंटस घेतात. मात्र यामुळे केसांचे जास्त प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे खूप जास्त गरजेचे असेल तरच अशा ट्रीटमेंट घ्या अन्यथा त्यामुळे केसांना पोत खराब होण्याची शक्यता असते. 


 

Web Title: Hair Care Tips: 5 Mistakes To Avoid For Thick And Long Hair; The hair will be silky and shiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.