Lokmat Sakhi >Beauty > उन्हाळ्यात घामाने छातीखाली खाज येतेय? या उपायांनी मिळेल आराम

उन्हाळ्यात घामाने छातीखाली खाज येतेय? या उपायांनी मिळेल आराम

Easy home remedies : अनेक घरांमध्ये जागा कमी असल्यानं अंग व्यवस्थित न सुकवता कपडे घातले जातात. त्यामुळे त्वचेचे आजार वाढू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 03:26 PM2021-05-18T15:26:51+5:302021-05-18T16:10:09+5:30

Easy home remedies : अनेक घरांमध्ये जागा कमी असल्यानं अंग व्यवस्थित न सुकवता कपडे घातले जातात. त्यामुळे त्वचेचे आजार वाढू शकतात.

Easy home remedies for rashes and etching under breast | उन्हाळ्यात घामाने छातीखाली खाज येतेय? या उपायांनी मिळेल आराम

उन्हाळ्यात घामाने छातीखाली खाज येतेय? या उपायांनी मिळेल आराम

Highlights रॅशेजपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. जेणेकरून त्वचेचे आजार वाढू न देता तुम्ही स्वतःची काळजी  घेऊ शकता.

उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्यांनाच  खूप घाम येतो. घरोघरच्या महिलांना फक्त बाहेरच नाही तर घरीसुद्धा राब राब राबून आपलं काम पूर्ण करावं लागतं.  अशा स्थितीत सतत घाम येऊन अंगावर  घामोळ्या, पुळ्या, एलर्जीची समस्या उद्भवते. तीव्र खाजेमुळे जळजळ, त्वचेवर लालसरपणा येणं अशी लक्षणं दिसून येतात. खासकरून छातीच्या खाली, मांड्यांमध्ये, काखेत रॅशेत जास्त प्रमाणात येण्याची शक्यता असते.

अनेक घरांमध्ये जागा कमी असल्यानं अंग व्यवस्थित न सुकवता कपडे घातले जातात. त्यामुळे त्वचेचे आजार वाढू शकतात. आज आम्ही तुम्हाला रॅशेजपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. जेणेकरून त्वचेचे आजार वाढू न देता तुम्ही स्वतःची काळजी  घेऊ शकता.

छातीखाली रॅशेज येण्याची कारणं

छातीच्या खालच्या भागात किंवा मानेवर रॅशेज येण्याची अनेक कारणं असू शकतात. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे घाम येणं. उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील उष्णता वाढते, खूप घाम येतो परिणामी इन्फेक्शन, एलर्जी, ऑटोइम्यून विकारांचा धोका वाढतो. काही घरगुती उपायांनी तुम्ही त्वचेच्या आजारांना लांब ठेवू शकता. 

कोरफड

कोरफडीत अनेक एंटीएन्फ्लेमेटरी गुण असतात.  छातीजवळ आलेला लालसरपणा, खाज आणि सूज कमी करण्यासाठी हे उपयुक्त ठरते. त्वचेवर कोरफड वापरण्यासाठी एक पान घ्या, स्वच्छ धुवून त्यावरचं जेल काढून घ्या. हे जेल सूज आणि खाज आलेल्या ठिकाणी लावा. साधारण अर्धा तास तसंच सुकू द्या आणि मग स्वच्छ पाण्याने धुवा  दिवसातून दोन ते तीनेवळा हा प्रयोग केल्यानं समस्या दूर होण्यास मदत होईल.

व्हिनेगर

अॅप्पल साईड व्हिनेगरमध्ये अँटिमायक्रोबियल गुण असतात, जे काही बॅक्टेरियांविरुद्ध प्रभावी ठरतात. तुमच्या छातीच्या खाली जर इन्फेक्शनमुळे रॅशेज आले असतील तर हा उपाय योग्य आहे. अर्धा कप पाण्यात एक ते दोन मोठे चमचे व्हिनेगर मिक्स करा. योग्य मिक्स केल्यानंतर त्यात कापसाचा बोळा भिजवा. हे मिश्रण तुम्ही रॅशेस आलेल्या ठिकाणी लावा आणि सुकू द्या. काही वेळानंतर स्वच्छ पाण्याने धुवा, रोज या उपायाचा वापर केल्यानं तुम्हाला फरक दिसून येईल.

हळद

प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात हळदीचा मोठ्या प्रमाणात केला जातो. हळदीत करक्युमिन असते यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुण असल्याने छातीच्या खाली असणारे रॅश काढून टाकण्यास मदत मिळते. कोणतीही जखम झाल्यानंतर हळदीचा वापर केल्यानं लवकर आराम मिळतो. रॅशेजवर हळदीचा वापर करण्यासाठी पाण्याचे काही थेंब दोन चमचे हळद पावडरमध्ये मिक्स करून त्याची जाड पेस्ट करून घ्या ही पेस्ट तुम्ही त्वचेवर रॅशेज आलेल्या ठिकाणी लावा.  ही पेस्ट सुकल्यानंतर स्वच्छ धुवून टाका. याचा वापर तुम्ही दिवसातून दोनवेळा करू शकता. 

नारळाचं तेल

नारळाच्या तेलामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुण असतात त्यामुळे अनेक कारणांसाठी घरगुती वापरासाठी नारळाच्या तेलाचा वापर केला जातो.  नारळाच्या तेलामध्ये अँटिमायक्रोबियल गुण असल्याने त्वचेवर आलेली खाज, व्रण घालविण्यासाठी मदत मिळते. नारळाचं तेल आपल्या हातावर घेऊन चोळा. त्यानंतर खाज आलेल्या त्वचेवर लावा. सुकल्याननंतर धुवून टाका. आठवड्यातून चार ते पाचवेळा हा प्रयोग केल्यानं फरक दिसून येईल.

अशी घ्या काळजी

१) छातीच्या खाली घाम जमा होऊ नये म्हणून जास्त घट्ट ब्रा घालू नका

२) उन्हाळ्यात सुती कपडे घालण्याचा प्रयत्न करा.

३) अंघोळ केल्यानंतर अंग व्यवस्थित पुसून मगच कपडे घाला.

४) जास्त घाम येत असेल तर ब्रा लाईनर घाला.

५)  खाज येत असेल तरी खाजवणं टाळा.

६) रिंग वर्म किंवा फंगल इंन्फेक्शनचे चट्टे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा

Web Title: Easy home remedies for rashes and etching under breast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.