Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओठ खूपच फाटलेत? जावेद हबीब सांगतात बेंबीत 'हे' तेल लावा; मऊ-गुलाबी होतील ओठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:56 IST

रात्री झोपण्यापूर्वी २ ते ३ थेंब तेल बेंबीत सोडा आणि हलक्या हातानं १ मिनिट मसाज करा.

थंडीच्या दिवसांत ओठ फाटणे ही एक सामान्य समस्या आहेत. महिलांसह पुरूषांचेही ओठ थंडीच्या दिवसांत फाटतात. अनेकदा लिप बाम, लिप ग्लोज लावूनही ओठ मऊ होत नाहीत. अनेकांना ओठांना भेगा पडतात आणि रक्तस्त्रावसुद्धा होतो. प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी फाटलेल्या ओठांवर एक अगदी सोपा आणि पारंपारीक उपाय सुचवला आहे तो म्हणजे बेंबीमध्ये तेल लावणं. (Habib Says Apply Coconut Oil Or Mustard Oil in Belly Button To Get Soft Lips) जावेद हबीब यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून हा पारंपारीक उपाय पुन्हा चर्चेत आणला आहे.

जावेद हबीब काय सांगतात?

त्यांच्यामते ओठ फाटणे हे केवळ त्वचेचे आरोग्य नाही तर शरीरातील अंतर्गत ड्रायनेसचे लक्षण आहे. यावर नाभीत तेल घालण्याचा उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतो.  आयुर्वेदात नाभी बस्ती या उपचारांना विशेष महत्व दिले  गेले आहे. नाभी शरीराच केंद्रस्थान मानली जाते. जिथे अनेक नसा एकत्र येतात. बेंबीद्वारे शरीराच्या वेगवेगळ्या भागांना पोषण पुरवले जाते. जावेद हबीब सांगतात की रात्री झोपण्यापूर्वी बेंबीत काही थेंब तेल लावल्यास त्याचे अनेक फायदे होतात. नाभीत तेल घातल्यानं शरीराच्या आतून ओलावा शोषून घेण्यास मदत होते. ज्यामुळ ओठांचा आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.नियमितपणे हा उपाय केल्यास ओठ मऊ, गुलाबी राहण्यास मदत होते. 

यासाठी कोणते तेल वापरावे?

या उपायासाठी विविध तेलं वापरले जातात. पण जावेद हबीब शुद्ध मोहोरीचे तेल किंवा खोबरेल तेल वापरण्याचा सल्ला देतात. हा उपाय फक्त फाटलेल्या ओठांसाठीच नाहीतर पचनक्रिया सुधारण्यासाठीसुद्धा उत्तम आहे.

हे तेल कसे लावावे?

रात्री झोपण्यापूर्वी २ ते ३ थेंब तेल बेंबीत सोडा आणि हलक्या हातानं १ मिनिट मसाज करा. या उपायानं शरीराला आराम मिळेल. जावेद हबीब यांच्या या सोप्या सल्लामुळे महागड्या कॉस्मेटीक उपायांच्या ऐवजी हा पारंपारीक भारतीय उपाय आता सौंदर्य आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या लोकांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jawed Habib's remedy for chapped lips: Apply oil in navel.

Web Summary : Suffering from chapped lips? Hair expert Jawed Habib suggests applying coconut or mustard oil in your navel before bed. This Ayurvedic remedy hydrates from within, resulting in soft, pink lips and improved digestion.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी