Lokmat Sakhi >Beauty > तुरटी आणि दह्याचं मिश्रण लावल्यास त्वचेला मिळतील हे ४ फायदे, सोपा आणि सुंदर उपाय

तुरटी आणि दह्याचं मिश्रण लावल्यास त्वचेला मिळतील हे ४ फायदे, सोपा आणि सुंदर उपाय

Benefits Of Curd And Alum: दही आणि तुरटीचं मिश्रण लावल्यानं त्वचेला काय फायदे मिळतात आणि कोणत्या समस्या दूर होतात हे जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:41 IST2025-06-18T15:21:39+5:302025-06-18T19:41:40+5:30

Benefits Of Curd And Alum: दही आणि तुरटीचं मिश्रण लावल्यानं त्वचेला काय फायदे मिळतात आणि कोणत्या समस्या दूर होतात हे जाणून घेऊ.

Benefits of applying alum with curd on skin | तुरटी आणि दह्याचं मिश्रण लावल्यास त्वचेला मिळतील हे ४ फायदे, सोपा आणि सुंदर उपाय

तुरटी आणि दह्याचं मिश्रण लावल्यास त्वचेला मिळतील हे ४ फायदे, सोपा आणि सुंदर उपाय

Benefits Of Curd And Alum: त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर कऱण्यासाठी तुरटीचा वापर तुम्ही अनेकदा केला असेलच. दही सुद्धा त्वचेसाठी फायदेशीर असतं. पण तुम्ही कधी या दोन्ही गोष्टी एकत्र करून त्वचेवर लावल्या तर तुम्हाला एकापेक्षा जास्त फायदे मिळू शकतात. दही आणि तुरटीच्या मिश्रणानं त्वचा हेल्दी आणि ग्लोईंग होते. दह्यानं तव्चा मॉइश्चराइज आणि हायड्रेटेड राहते. तर तुरटीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात. दही आणि तुरटीचं मिश्रण लावल्यानं त्वचेला काय फायदे मिळतात आणि कोणत्या समस्या दूर होतात हे जाणून घेऊ.

डाग होतील दूर

दह्यामध्ये तुरटी मिक्स करून लावल्यास त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत मिळते. दह्यात लॅक्टिक अ‍ॅसिड असतं, जे त्वचेवरील डाग आणि पिगमेंटेशन कमी करतं. तेच तुरटीनं त्वचेचा रंग आणखी सुधारतो. 

पिंपल्स होतील दूर

चेहऱ्यावर तुरटी दह्याचं मिश्रण लावल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात. या मिश्रणात अ‍ॅंटी-बॅक्टेरीअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात, जे त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट करतात. ज्यामुळे पिंपल्स आणि पुरळ दूर होते.

सुरकुत्या आणि फाइन लाइन्स कमी होतात

दही आणि तुरटीचं मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या आणि फाइन लाइन्स कमी करण्यास मदत मिळते. दह्यातील लॅक्टिव अ‍ॅसिड स्किनमध्ये कोलेजन बूस्ट करतं. तेच तुरटीमुळे त्वचा टाइट होते. या मिश्रणाच्या नियमित वापर केला तर त्वचा तरूण आणि ग्लोईंग दिसते.

त्वचा उजळते

दही आणि तुरटीचं मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळते. दह्यानं त्वचा हायड्रेट आणि मॉइश्चराइज राहते. तेच तुरटीमुळे डेड स्किन सेल्स आणि मळ निघून जातो. तसेच चेहरा मुलायम आणि चमकदार राहतो.

Web Title: Benefits of applying alum with curd on skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.