Lokmat Sakhi >Beauty > त्वचेवर स्क्रबिंग करण्याचे हे फायदे, नियमित स्क्रब कराल तर नेहमीच १० वर्षांनी दिसाल लहान

त्वचेवर स्क्रबिंग करण्याचे हे फायदे, नियमित स्क्रब कराल तर नेहमीच १० वर्षांनी दिसाल लहान

Benefits of body scrubbing : शरीराच्या स्क्रबिंगमुळे त्वचेतील मृत पेशी जातात आणि त्वचा एक्सफोलाइज होते, ज्यामुळे त्वचेचा रंगही स्पष्ट होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 01:20 PM2021-06-18T13:20:29+5:302021-06-18T14:12:01+5:30

Benefits of body scrubbing : शरीराच्या स्क्रबिंगमुळे त्वचेतील मृत पेशी जातात आणि त्वचा एक्सफोलाइज होते, ज्यामुळे त्वचेचा रंगही स्पष्ट होतो.

Benefits of body scrubbing the skin : You will always look younger after 10 years | त्वचेवर स्क्रबिंग करण्याचे हे फायदे, नियमित स्क्रब कराल तर नेहमीच १० वर्षांनी दिसाल लहान

त्वचेवर स्क्रबिंग करण्याचे हे फायदे, नियमित स्क्रब कराल तर नेहमीच १० वर्षांनी दिसाल लहान

Highlightsनियमित शरीराच्या स्क्रबिंगमुळे आपल्या त्वचेचे पीएच पातळी संतुलित होते. तेलकट त्वचा असेल तर ती चिकटपणा दूर करण्यास मदत करते. कारण स्क्रब केल्यामुळे आपल्या त्वचेच्या आत उपस्थित असलेल्या त्वचेच्या पेशी आवश्यक प्रमाणात तेलाचे प्रमाण तयार करतात.बॉडी स्क्रब आपल्या त्वचेवर वाढणार्‍या सूक्ष्म केसांपासून आपल्याला सुटका देते. त्वचेच्या आत केसांची जास्त वाढ होण्याच्या समस्येवर नियमित स्क्रबिंगनं मात केली जाऊ शकते.

चेहर्याचे सौंदर्य राखण्याबरोबरच शरीराच्या त्वचेची काळजी घेणेही आवश्यक आहे. यासाठी आठवड्यातून एकदा बॉडी स्क्रब करणं फायद्याचं ठरतं. यासाठी तुम्हाला बाजारातून महाग स्क्रब आणण्याची आवश्यक नाही. आपण सोप्या पद्धतीने घरच्याघरी देखील स्क्रब बनवू शकता किंवा बाजारातून आणू शकता. घरच्याघरी स्क्रब तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त कोणत्याही वस्तूंची गरज लागणार नाही. चला तर मग  स्क्रबिंगमुळे त्वचेला कोणते फायदे मिळतात जाणून घेऊया.

त्वचेला चमक येते

स्क्रबिंगमुळे त्वचेचे सौंदर्य अनेक पटीने वाढते. त्वचेला एक्सफोलीएट केल्याने त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. त्वचेला बाहेर काढण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे स्क्रबिंग. स्क्रबिंगमुळे त्वचेवरील ब्लॅकहेड्स आणि डाग दूर होतात आणि छिद्रांमध्ये जमा होणारी घाण साफ होते. ज्यामुळे आपल्या शरीराची त्वचा खूपच गुळगुळीत आणि एक समान दिसते.

त्वचेच्या मृत पेशी निघून जातात

मृत पेशी आपल्या त्वचेच्या वरच्या थरावर जमा होतात. त्वचेवर घाण असणं  आणि आवश्यक ओलावा नसल्यामुळे ते छिद्रांमध्ये साचतात. तसेच, त्वचेच्या पेशी मृत होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी आपल्या सर्वांच्या शरीरात सदैव चालू असते. या मृत पेशी काढून टाकल्याने आतून स्वच्छ आणि नवीन त्वचा बाहेर येते. त्यांना काढून टाकण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्क्रबिंग. शरीराच्या स्क्रबिंगमुळे त्वचेतील मृत पेशी जातात आणि त्वचा एक्सफोलाइज होते, ज्यामुळे त्वचेचा रंगही स्पष्ट होतो.

एक्ने कमी होतात

शरीराच्या स्क्रबिंगमध्ये चेहरा देखील येतो. सहसा लोक तोंडावरील पुळ्या आणि मुरुमांची तक्रार करतात. परंतु बर्‍याच लोकांमध्ये ते त्वचेच्या मागच्या बाजूला आणि खांद्यावर देखील मुरूमं असतात. स्क्रबिंग दरम्यान मालिश केल्याने त्वचेत रक्ताभिसरण ठीक राहिल. जर आपण स्क्रब करणार असाल तर प्रथम कोमट पाण्याने आंघोळ करा. यामुळे शरीराचे छिद्र खुले होतात, ज्यामुळे स्क्रब करताना सर्व घाण दूर निघून जाण्यास मदत होईल. 

त्वचेवरील तेज वाढतं

स्क्रब केल्याने आपली त्वचा खूपच गुळगुळीत होते, ज्यामुळे त्वचेला चमक येते. स्क्रब केल्याने आपल्या त्वचेतील घाण, तेल, घाम दूर होतो. स्क्रबमध्ये उपस्थित मॉइश्चरायझिंग घटक यामुळे हायड्रेट होतात, त्वचेवर एक वेगळी चमक राहते. हे आपल्याला दीर्घकाळ तरूण दिसण्यास देखील मदत करते.

नको असलेले केस निघून जाण्यास मदत होते

बॉडी स्क्रब आपल्या त्वचेवर वाढणार्‍या सूक्ष्म केसांपासून आपल्याला सुटका देते. त्वचेच्या आत केसांची जास्त वाढ होण्याच्या समस्येवर नियमित स्क्रबिंगनं मात केली जाऊ शकते. हे आपले केस follicles साफ करते जे ingrown केसांची समस्या कमी करण्यात मदत करते.

पीएच लेव्हल नियंत्रणात राहते

नियमित शरीराच्या स्क्रबिंगमुळे आपल्या त्वचेचे पीएच पातळी संतुलित होते. तेलकट त्वचा असेल तर ती चिकटपणा दूर करण्यास मदत करते. कारण स्क्रब केल्यामुळे आपल्या त्वचेच्या आत उपस्थित असलेल्या त्वचेच्या पेशी आवश्यक प्रमाणात तेलाचे प्रमाण तयार करतात. आपल्या शरीराच्या गरजेनुसार आपण कोणत्या प्रकारचे स्क्रब वापरत आहात यावर देखील हे अवलंबून असते. घरगुती कॉफी-साखर आणि नारळाचे बॉडी स्क्रब सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सर्वोत्तम आहे.

Web Title: Benefits of body scrubbing the skin : You will always look younger after 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.