Lokmat Sakhi >Beauty > Anushka sharma haircut : अनुष्कानं सांगितलं केस कापण्याचं कारण;  प्रेग्नंसीनंतर करावा लागला 'या' आजाराचा सामना

Anushka sharma haircut : अनुष्कानं सांगितलं केस कापण्याचं कारण;  प्रेग्नंसीनंतर करावा लागला 'या' आजाराचा सामना

Anushka sharma haircut :

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 12:00 PM2021-06-27T12:00:19+5:302021-06-27T12:06:15+5:30

Anushka sharma haircut :

Anushka sharma haircut : Anushka sharma is suffering from post baby hair fall appreciate a good haircut | Anushka sharma haircut : अनुष्कानं सांगितलं केस कापण्याचं कारण;  प्रेग्नंसीनंतर करावा लागला 'या' आजाराचा सामना

Anushka sharma haircut : अनुष्कानं सांगितलं केस कापण्याचं कारण;  प्रेग्नंसीनंतर करावा लागला 'या' आजाराचा सामना

बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या आपल्या बाळासह आनंदाचे क्षण घालवत आहे. सध्या ती आपला पती टिम इंडिया कॅप्टन विराट कोहली (Virat kohli) कोहोलीसह लंडनमध्ये राहत आहे. पण या दरम्यान अनुष्काला एक मोठी समस्या भेडसावत आहे. ही समस्या म्हणजे मुलीच्या जन्मानंतर हार्मोन बदलामुळे होणारी केस गळती. होय, अनुष्का शर्मा देखील तिच्या गळणार्‍या केसांमुळे त्रस्त आहे आणि ते टाळण्यासाठी तिने आपले केसही कापले आहेत. अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तीचे केस लहान दिसले आहेत. 

व्हायरल होतोय अनुष्काचा लूक

शुक्रवारी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुष्का शर्मा खूपच सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिनं आपलं  दुःख व्यक्त केलं आहे.  तिनं लिहिलं की,  बाळाला जन्म दिल्यानंतर केसांची गळती वाढल्यामुळे मी एक चांगला हेअरकट करून घेतला आणि तुम्ही सगळ्यांनी माझं कौतुक केलं. जॉर्ज नॉर्थवुड (George Northwood) यासाठी तुमचे धन्यवाद. तुम्ही खरंच खूप शानदार आहात. जॉर्ज नॉर्थवुडशी संपर्क करून देण्यासाठी सोनम कपूर (Soonam kapoor)  तुम्हालाही थॅक्स असं म्हटलं आहे. दरम्यान सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. पती विराट कोहोलीनंही लव्ह असा इमोजी शेअर केला आहे. सोनम कपूरनं लंडनमध्ये अनुष्काचे कापण्यासाठी मदत केली. हा हेअर कट पाहून तिनंही तू खूप छान दिसत आहे अशी कमेंट केली आहे. 

बाळंतपणात केस का गळतात?

बाळाच्या जन्मानंतर आईच्या आयुष्यात बर्‍याच शारिरीक आणि मानसिक बदल घडतात. केस गळणे ही त्यांच्यातील एक सामान्य समस्या आहे. हे गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर शरीरात होणार्‍या हार्मोनल बदलांमुळे होते. एकदा बाळाचा जन्म झाल्यावर संप्रेरक पातळी कमी होते आणि आईचे केस नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणात गळतात.  मुलाच्या जन्मानंतर कधीही हा त्रास सुरू  होऊ शकतो आणि वर्षभर तसाच राहतो. 

गळणारे  केस कमी करायचे उपाय

जास्त उष्णता किंवा जास्त प्रमाणात ब्रशचा वापर करून आपले केसांची स्टाईल करणे टाळा. यामुळे केस अधिक पडतात. 

ओल्या केसांवर जास्तवेळा फणी फिरवू नका.

स्प्लिट एंड्सपासून बचावासाठी नियमित २-३ महिन्यांनी केस ट्रिम करत  राहा. त्यामुळे केस पातळ होत नाहीत. 

डिलिव्हरीनंतर आहारात फळं, भाज्या, प्रोटीन्सचा समावेश करा. 

व्हिटामीनच्या गोळ्या अन्य  गोळ्याचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करा. त्यामुळे शरीर चांगले राहण्यास मदत होते.
 

Web Title: Anushka sharma haircut : Anushka sharma is suffering from post baby hair fall appreciate a good haircut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.