आपण जसा आहार घेतो किंवा जे खातो, तसेच आपले शरीर असते अशी म्हण अगदी खरी आहे. बदलत्या काळानुसार रोजची धावपळ वाढली, स्ट्रेस देखील वाढला.या अशा लाईफस्टाईल, प्रदूषणा आणि तणावामुळे चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा लवकर दिसू लागतात. वयाच्या मानाने अधिक म्हातारे दिसणे कोणालाच आवडत नाही. प्रत्येकालाच इच्छा असते की आपले खरे वय लगेच दिसून येऊ नये आणि त्वचेवर तारुण्याची चमक कायम राहावी. पण, यासाठी महागडी क्रिम्स किंवा ब्यूटी ट्रीटमेंट्सची गरज नाही! हळूहळू वाढत जाणारे वय थांबवता येत नसले, तरी त्याच्या खुणा कमी करणं आपल्या हातात असतं. आपल्याच स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत, जे आपल्याला आपल्या आहे त्या वयापेक्षा कमी दिसण्यास मदत करू शकतात( anti ageing superfoods).
रोजच्या आहारात काही खास पदार्थांचा समावेश करून, आपण केवळ आपल्या त्वचेचे आरोग्यच नाही, तर शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून देखील संरक्षण करू शकता. रोजच्या आहारातील काही नैसर्गिक पदार्थ त्वचेला आतून पोषण देतात, कोलेजनची कमतरता भरून काढतात आणि एजिंगची चिन्हं कमी दिसायला मदत करतात. त्वचा टवटवीत, उजळ आणि यंग दिसण्यासाठी रोजच्या आहारात काही खास अँटिऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन्स युक्त पदार्थांचा समावेश केला, तर वयापेक्षा कमी दिसणं अगदी नैसर्गिकरीत्या शक्य होतं. कोणते आहेत हे अँटी-एजिंग फूड्स जे तुमची त्वचा तरुण ठेवतात ते पाहूयात. आहारतज्ज्ञ मनप्रीत कालरा यांनी इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत, आहारात काही खास बदल केले तर चेहऱ्यावर दिसणाऱ्या एजिंगच्या खुणा (Anti ageing foods for glowing skin) कमी करता येतात याबद्दल विशेष माहिती सांगितली आहे.
चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा कमी करणारे पदार्थ कोणते ?
१. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पोषक तत्वांनीयुक्त अन्नपदार्थ कोलेजन उत्पादनास मदत करतात. यामुळे त्वचेतील हायड्रेशन सुधारते , ओलावा टिकून राहतो, त्वचेचे होणारे नुकसान दूर करण्यात मदत मिळते आणि त्वचेवर चमक टिकून राहते.
२. संत्री, टोमॅटो, पेरू आणि ढोबळी मिरची यांसारखे व्हिटॅमिन- 'सी' ने परिपूर्ण असलेले पदार्थ कोलेजन निर्मितीस आधार देतात आणि नुकसान झालेल्या त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करतात.
कोलेस्टेरॉल कमी करणारे रोजच्या आहारातलेच ७ पदार्थ, महिन्याभरात दिसेल फरक-टळेल धोका...
३. ब्लूबेरीज, पालक, डाळिंब, आणि द्राक्षे यांसारख्या अँटी - ऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. एजिंगची लक्षणे कमी करण्यासाठी अँटी-ऑक्सिडंट्सने युक्त आहार घेणे आवश्यक असते.
४. बदाम, सूर्यफूलाच्या बिया, पालक आणि एवोकॅडो यांसारखे व्हिटॅमिन - ई युक्त पदार्थ त्वचेला पोषण देतात आणि त्वचेला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून बचाव करतात.
५. एजिंगची गती कमी करण्यासाठी व्हिटॅमिन- 'ए' युक्त पदार्थ खा. गाजर, रताळे, आणि ढोबळी मिरची त्वचेला नवी ऊर्जा देतात, नुकसान झालेली त्वचा बरी करतात आणि त्वचेची लवचिकता सुधारण्याचे काम करतात.
हिवाळ्यात फक्त दूध हळद नको, तर दुधात मिसळा ‘हे’ २ थेंब - जुनाट कफ आणि सर्दीखोकल्यावर घरगुती उपाय...
६. डाळी, चणे, शेंगा, आणि ब्राऊन राईस यांसारख्या झिंक आणि सेलेनियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे कोलेजन उत्पादनामध्ये मदत मिळते आणि त्वचा निस्तेज होत नाही.
७. टोफू, पालक आणि तुळस यांसारखे ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स युक्त अन्नपदार्थ त्वचेला हायड्रेटेड ठेवतात आणि सूज कमी करतात.
८. काकडी, सोयाबीन, आणि ब्रोकोली यांसारख्या पदार्थांमुळे त्वचेत लूजपणा येत नाही आणि त्वचेचा नॅचरल ग्लो वाढतो.
Web Summary : Certain foods can help reduce aging signs. Vitamin C, antioxidants, Vitamin E, Vitamin A, zinc, selenium, and omega-3 fatty acids are crucial. These nutrients nourish skin, boost collagen, and maintain hydration for a youthful glow.
Web Summary : कुछ खाद्य पदार्थ बढ़ती उम्र के लक्षणों को कम करने में मदद कर सकते हैं। विटामिन सी, एंटीऑक्सिडेंट, विटामिन ई, विटामिन ए, जस्ता, सेलेनियम और ओमेगा -3 फैटी एसिड महत्वपूर्ण हैं। ये पोषक तत्व त्वचा को पोषण देते हैं, कोलेजन को बढ़ावा देते हैं, और युवा चमक के लिए जलयोजन बनाए रखते हैं।