Lokmat Sakhi >Beauty > प्राजक्ता माळी सांगतेय जबरदस्त वेटलॉस फंडा! म्हणते चुकीच्या लाईफस्टाईलमुळे गळाले केस...

प्राजक्ता माळी सांगतेय जबरदस्त वेटलॉस फंडा! म्हणते चुकीच्या लाईफस्टाईलमुळे गळाले केस...

अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणजे मराठी वर्तूळातलं एक ग्लॅमरस, ट्रेण्डी नाव. प्राजक्ताने नुकताच तिचा एक जबरदस्त वेटलॉस फंडा शेअर केला असून चुकीच्या लाईफ स्टाईलमुळे आरोग्याचे किती आणि कसे नुकसान होते, हे देखील तिने सांगितले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 05:45 PM2021-10-05T17:45:49+5:302021-10-05T19:20:16+5:30

अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणजे मराठी वर्तूळातलं एक ग्लॅमरस, ट्रेण्डी नाव. प्राजक्ताने नुकताच तिचा एक जबरदस्त वेटलॉस फंडा शेअर केला असून चुकीच्या लाईफ स्टाईलमुळे आरोग्याचे किती आणि कसे नुकसान होते, हे देखील तिने सांगितले आहे.

Actress Prajakta Mali shares her weight loss funda! Said she experiences hair fall due to wrong lifestyle ... | प्राजक्ता माळी सांगतेय जबरदस्त वेटलॉस फंडा! म्हणते चुकीच्या लाईफस्टाईलमुळे गळाले केस...

प्राजक्ता माळी सांगतेय जबरदस्त वेटलॉस फंडा! म्हणते चुकीच्या लाईफस्टाईलमुळे गळाले केस...

Highlightsकेस गळणे, चेहऱ्यावर सूज किंवा चब्बी चिक्स अशी समस्या अवेळी झोपण्याने निर्माण होते. रात्री १० ते ११ ही वेळ झोपण्यासाठी अतिशय योग्य आहे. शक्य झालं तर अजून लवकर झोपा, असंही तिनं सांगितलं. 

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असते. तिचे वेगवेगळे फोटो शूट, तिचे डान्सचे व्हिडियो तिच्या चाहत्यांना नेहमीच खूप आवडतात. प्राजक्ताने नुकताच तिचा एक व्हिडियो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये प्राजक्ताने वजन कमी करण्याच्या अफलातून टिप्स दिल्या आहेत. या सगळ्या गोष्टी ती रोज फॉलो करत होती. पण मध्यंतरी तिला हे सगळं करणं जमलं नाही. तिला तिची लाईफस्टाईल बदलावी लागली. पण या सगळ्या बेशिस्त कारभारामुळे वजन तर वाढलंच पण आयुष्यात पहिल्यांदा केस गळतीला सामोरं जावं लागलं असं देखील प्राजक्ताने सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ती तिच्या फिटनेस ट्रॅकवर परत आली असून तिचा फिटनेस फंडा तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

 

का बदलली प्राजक्ताची लाईफस्टाईल?
तुम्ही प्राजक्ताचे जर लेटेस्ट फोटो पाहिले, तर एक गोष्ट निश्चितच लक्षात येईल. ती म्हणजे तिचं वाढलेलं वजन. तिचं वजन का वाढलं हे सांगताना प्राजक्ता म्हणाली की तिने मागील ६ महिन्यांपासून व्यायाम पुर्णपणे बंद केला होता. तसंच खाण्यापिण्याची कोणतीही पथ्य तिने पाळली नव्हती. गोड, चिझी, जंकफूड, पॅक फुड असं सगळं सगळं तिने मागच्या ६ महिन्यात मनसोक्त खाल्लं. याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि तिचं वजन चक्क ५ ते ६ किलोने वाढलं. पण असा सगळा बेशिस्त कारभार होण्यासाठी प्राजक्ताकडे एक ठोस कारण होतं. प्राजक्ताने नुकतंच ज्या वेबसिरिजचं काम पुर्ण केलं, त्या वेबसिरिजसाठी तिला शक्य हाेईल तेवढं वजन वाढवायचं होतं. त्यामुळे व्यायाम न करता नुसतं खाणे असं प्राजक्ताचं त्या सहा महिन्यातलं रूटीन होतं. 

 

६ महिन्यांपूर्वी कशी होती प्राजक्ता?
प्राजक्ता म्हणते ६ महिन्यांपूर्वी मी अतिशय फिट होते. राेज दिड तास नियमितपणे अष्टांग योग करत होते. रात्री लवकर झोपत होते. डाएटचे काही नियम पाळत होते. त्यामुळे तेव्हा मी अतिशय फिट होते. त्यामुळे आता वेबसिरिजचं शूट संपल्यामुळे मी आता पुन्हा माझं आधीचं रूटीन पाळणार आहे आणि पुन्हा एकदा ५ ते ६ किलो वजन घटवून फिट होणार आहे, असं प्राजक्ता सांगते. जेव्हा तिने वजन वाढविण्यासाठी तिची शिस्तबद्ध असणारी लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याची सवय बदलली, तेव्हा तिला प्रचंड त्रास झाला. तिचं शरीर असा सगळा बदल स्विकारायला तयार नव्हतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराला सवय लावली तर आपोआपच ते तुम्हाला साथ देतं, तुम्ही फक्त प्रयत्न करा, असंही प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे. 

 

असा आहे प्राजक्ताचा वेटलॉस फंडा
१. रोज व्यायाम

फिट रहायचं असेल आणि वजन वाढू द्यायचं नसेल, तर नियमित योगा केलाच पाहिजे असं प्राजक्ता सांगते. त्यामुळे लवकरात लवकर नियमित व्यायामाला सुरूवात केली पाहिजे. सुरूवातीला अर्धा तास व्यायाम करा. त्यानंतर त्याचा वेळ वाढवत न्या. आठवड्यातून किमान ५ दिवस तरी घाम येईपर्यंत व्यायाम केला पाहिजे, असं ती सांगते.

२. साखर पुर्णपणे बंद
वजन कमी करण्यासाठी प्राजक्ताने सांगितलेला दुसरा नियम म्हणजे साखर असणारे सगळे गोड पदार्थ पुर्णपणे बंद करणं. जर काही गोड खायचंच असेल तर ते गुळाचं खा, असंही प्राजक्ता सांगते. 

 

३. रात्री वेळेत झोपणं
वेळेत झोपल्यामुळे वजन कसं काय कमी होणार असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण रात्री जर झोपण्याची वेळ पाळली तर आपल्या शरीरातील हार्मोनल सिस्टिम चांगली राहते. हार्मोन्सचं संतूलन राहतं. केस गळणे, चेहऱ्यावर सूज किंवा चब्बी चिक्स अशी समस्या अवेळी झोपण्याने निर्माण होते. मागील सहा महिन्यात मी झोपण्याची शिस्त पाळली नाही. तसंच खाण्या- पिण्याच्या सवयीही अतिशय चुकीच्या होत्या. त्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा मला केसगळतीचा त्रास होतो आहे, असंही प्राजक्ता सांगते. रात्री १० ते ११ ही वेळ झोपण्यासाठी अतिशय योग्य आहे. शक्य झालं तर अजून लवकर झोपा, असंही तिनं सांगितलं. 

 

४. नाश्तामध्ये घ्या रॉ फूड
नाश्त्यामध्ये जे काही खाल ते शिजवलेलं अन्न नसेल, याची काळजी घ्या. त्यामुळे ती देखील नाश्त्यात सगळं रॉ फूड घेणार आहे. नाश्ता कमी केल्यामुळे दुपारचं जेवण १२- १२: ३० च्या दरम्यान करणार,
तसंच जेवणात कोशिंबीर, ताक यांचा समावेश वाढवणार आणि भाताचं प्रमाण कमी करणार, असंही तिनं सांगितलं. 

५. जंक फूड बंद 
जंक फूड खाणं हे आरोग्यासाठी किती घातक आहे, हे मी नुकतंच अनुभवलं आहे. त्यामुळे जंक फूड पुर्णपणे बंद करणार असल्याचं प्राजक्तानं सांगितलं. जर वजन कमी करायचं असेल तर जंक फूड सोबतच कोल्ड्रिंक, पॅक फूड, मैदा असं काहीही खाऊ नका, असं प्राजक्ता म्हणते. 

 

६. व्यायाम केला म्हणजे झालं असं नाही
बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की सकाळी मी एक तास छान वर्कआऊट केलं आहे. त्यामुळे आता अख्खा दिवस मी काही केलं नाही, तरी चालेल... असा विचार जर तुमच्याही डोक्यात असेल तर तो काढून टाका. कारण सकाळी जरी तुम्ही व्यायाम केला तरी दिवसभर तुम्ही ॲक्टीव्ह असणं गरजेचं आहे. तुमच्या शरीराची योग्य हालचाल झाली पाहिजे. 

 

Web Title: Actress Prajakta Mali shares her weight loss funda! Said she experiences hair fall due to wrong lifestyle ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.