What's Up Lagna Movie Review : साचेबंद पठडीतील What’s up लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 12:37 PM2018-03-15T12:37:51+5:302018-03-16T12:06:25+5:30

लग्नानंतर संसारात होणाऱ्या कुरबुरींवर आजवर अनेक चित्रपट आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्याचप्रमाणे हा चित्रपट लग्नसंबधावर भाष्य करतो हे वेगळे सांगायला नको. करियर आणि संसार यामध्ये कोणत्या गोष्टीला अधिक महत्त्व द्यायचे या द्विधा मनस्थितीत आजची पिढी अडकलेली आहे. हाच धागा पकडत दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी चित्रपटाची कथा मांडली आहे.

What's Up Lagna Movie Review : साचेबंद पठडीतील What’s up लग्न | What's Up Lagna Movie Review : साचेबंद पठडीतील What’s up लग्न

What's Up Lagna Movie Review : साचेबंद पठडीतील What’s up लग्न

googlenewsNext
Release Date: March 16,2018Language: मराठी
Cast: वैभव तत्त्ववादी, प्रार्थना बेहरे, विक्रम गोखले, वंदना गुप्ते, इला भाटे
Producer: जाई जोशीDirector: विश्वास जोशी
Duration: २ तास १५ मि.Genre:
लोकमत रेटिंग्स
ong>प्राजक्ता चिटणीस 

What’s up लग्न या चित्रपटाच्या विषयावरूनच हा चित्रपट आजच्या पिढीच्या लग्नसंबंधावर भाष्य करतो हे आपल्या लगेचच लक्षात येते. लग्नानंतर संसारात होणाऱ्या कुरबुरींवर आजवर अनेक चित्रपट आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्याचप्रमाणे हा चित्रपट लग्नसंबधावर भाष्य करतो हे वेगळे सांगायला नको. करियर आणि संसार यामध्ये कोणत्या गोष्टीला अधिक महत्त्व द्यायचे या द्विधा मनस्थितीत आजची पिढी अडकलेली आहे. हाच धागा पकडत दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी चित्रपटाची कथा मांडली आहे.
What’s up लग्न या चित्रपटात आकाश (वैभव तत्त्ववादी) हा आयटी क्षेत्रातील मुलगा असून तो करियरच्या मागे धावत असतो तर अनन्या (प्रार्थना बेहरे) ही एक अभिनेत्री असते. नाशिकला जात असताना शेअर टॅक्सीत त्या दोघांची ओळख होते आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. काहीच दिवसांत ते लग्न करण्याचा निर्णय देखील घेतात. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोडप्याचा संसार अतिशय सुखाचा होणार असेच सगळ्यांना वाटत असते. पण लग्न झाल्यानंतर आकाशच्या कामाची वेळ बदलते तर अनन्याला एका मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळते. त्यामुळे त्या दोघांना एकमेकांना वेळ देणे देखील अशक्य होते आणि त्यामुळे त्यांच्यात भांडणं होऊ लागतात. लग्नाला काहीच महिने झाले असता त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय काय होते हे प्रेक्षकांना What’s up लग्न या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
What’s up लग्न या चित्रपटातील आकाश आणि अनन्या हे जोडपे आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करत असल्याने या चित्रपटाची कथा आजच्या पिढीला आपलीशी वाटते. आजची पिढी पैशाच्या मागे धावताना नात्यांना महत्त्व देत नाही. यामुळे घटस्फोटाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करियर आणि नात्यामध्ये समतोल राखणे गरजेचे आहे हा महत्त्वाचा संदेश हा चित्रपट आजच्या पिढीला देतो. प्रार्थना आणि वैभवने आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. या चित्रपटात त्यांची केमिस्ट्री मस्त जमून आली आहे. विक्रम गोखले, वंदना गुप्ते, इला भाटे यांनी देखील चांगले काम केले आहे. विद्याधर जोशी यांनी या चित्रपटात अनन्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. त्यांची भूमिका चांगलीच लक्षात राहाते. चित्रपट मध्यांतरानंतर उगाचच ताणला गेला आहे असे जाणवते. तसेच चित्रपटाचे संकलन अधिक चांगल्याप्रकारे होऊ शकले असते. चित्रपटाची गाणी चांगली असली तरी ती तितकीशी ओठावर रुळत नाहीत. 
प्रेमप्रकरण, लग्न आणि लग्नानंतर होणारी भांडणे हा विषय अनेक चित्रपटात आजवर हाताळण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याला या चित्रपटात नवीन काही पाहायला मिळत नाही. चित्रपट पाहाताना तोचतोचपणा जाणवत असला तरीही चित्रपटाचे सादरीकरण आणि कलाकारांचा अभिनय यामुळे हा चित्रपट एकदा पाहाण्यास हरकत नाही.

Web Title: What's Up Lagna Movie Review : साचेबंद पठडीतील What’s up लग्न

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.