Shubh lagna Savdhan Review : जुन्या कथेला नवा तडका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 05:04 PM2018-10-12T17:04:23+5:302018-10-12T17:42:09+5:30

हा चित्रपट पाहताना या चित्रपटाच्या दिगदर्शकावर हम आपके है कौन या चित्रपटाचा चांगलाच प्रभाव असल्याचे जाणवते. हम आपके है कौन प्रमाणेच लग्न, लग्न घरातील मंडळी, त्यांच्यातील मजा मस्ती सगळे काही आपल्याला पाहायला मिळते.

Shubh lagna Savdhan Review : जुन्या कथेला नवा तडका | Shubh lagna Savdhan Review : जुन्या कथेला नवा तडका

Shubh lagna Savdhan Review : जुन्या कथेला नवा तडका

googlenewsNext
Release Date: October 12,2018Language: मराठी
Cast: सुबोध भावे,श्रुती मराठे,रेवती लिमये,गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये
Producer: अभय शेवडेDirector: समीर रमेश सुर्वे
Duration: 2 तास 9Genre:
लोकमत रेटिंग्स

प्राजक्ता चिटणीस

लग्न संस्थेवर विश्वास नसलेला नायक अथवा नायिका, त्यांचे मत परिवर्तन करणारा त्यांचा जोडीदार अशा आशयाचे अनेक चित्रपट आजवर आपण बॉलीवूड मध्ये पाहिले आहेत. काहीसा याच विषयावर आधारित शुभ लग्न सावधान हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहताना या चित्रपटाच्या दिगदर्शकावर हम आपके है कौन या चित्रपटाचा चांगलाच प्रभाव असल्याचे जाणवते. हम आपके है कौन प्रमाणेच लग्न, लग्न घरातील मंडळी, त्यांच्यातील मजा मस्ती सगळे काही आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे हम आपके है कौन मधला पासिंग पिल्लो हा खेळ देखील या चित्रपटात आहे.

अनिकेत (सुबोध भावे) आणि ऋचा (श्रुती मराठे) यांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम असते. अनिकेत व्यवसायासाठी दुबईत राहत असतो. त्याचा लग्नसंस्थेवर विश्वास नसतो. ऋचावर त्याचे खूप प्रेम असले तरी तो तिच्याशी लग्न करायला तयार नसतो. ती त्याच्याशी या विषयावर अनेक वेळा बोलते. पण तो आपल्या मतावर ठाम असतो. त्याच दरम्यान ऋचाची मावस बहीण इरा (रेवती लिमये) चे लग्न ठरते. लग्नाच्या वातावरणात तरी अनिकेत त्याचा निर्णय बदलेल असे ऋचाला वाटत असते. इराच्या लग्नाच्या दरम्यान एका कामानिमित्त अनिकेत भारतात आलेला असतो. त्याचाच फायदा घेत ऋचा अनिकेतला इराच्या लग्नाला यायला लावते. या लग्नात काय होते? अनिकेत आपला निर्णय बदलतो की यामुळे अनिकेत आणि ऋचा मध्ये दुरावा निर्माण होतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शुभ लग्न सावधान हा चित्रपट पाहिल्यावरच मिळेल. 

शुभ लग्न सावधान या चित्रपटाच्या कथेत काहीही नावीन्य नाहीये. आजवर अनेक चित्रपटात वापरण्यात आलेला फॉर्म्युला या चित्रपटात देखील वापरण्यात आलेला आहे. या चित्रपटात मध्यंतरापर्यंत काही घडतेय असे वाटतच नाही. चित्रपट खूपच संथ वाटतो. तसेच चित्रपटात इतक्या साऱ्या जाहिराती करण्यात आल्या आहेत की आपण चित्रपट पाहतोय की जाहिरात हाच प्रश्न पडतो. मध्यंतरानंतर चित्रपट चांगली पकड घेतो. पण उत्तरार्धात चित्रपट खूपच ताणला गेला असल्याचे जाणवते. चित्रपटात अनेक उपकथा उगाचच टाकण्यात आल्या आहेत. तसेच एडिटिंग मध्ये देखील उणिवा जाणवतात. 

चित्रपटात खरी बाजी मारतात ते सुबोध भावे आणि श्रुती मराठे. त्या दोघांनीही खूप चांगला अभिनय केला आहे. त्या दोघांची केमिस्ट्री देखील मस्त जुळून आली आहे. चित्रपटाचे संवाद चांगले आहेत. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, रेवती लिमये यांनी देखील चांगले काम केले आहे. चित्रपटात लग्न, लग्नाच्या आधीची मजा मस्ती या सगळ्यात जास्त वेळ घालवला आहे. त्यापेक्षा अनिकेत आणि ऋचाच्या नात्यावर अधिक लक्ष केंद्रीत करणे गरजेचे होते असे चित्रपट पाहताना जाणवते. 

Web Title: Shubh lagna Savdhan Review : जुन्या कथेला नवा तडका

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.