Pipsi Marathi review : लहानपण देगा देवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 05:05 PM2018-07-26T17:05:56+5:302023-08-08T20:09:54+5:30

मैथिली पटवर्धन, साहिल जोशी यांच्या पिप्सी या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

Pipsi Marathi review | Pipsi Marathi review : लहानपण देगा देवा

Pipsi Marathi review : लहानपण देगा देवा

Release Date: July 27,2018Language: मराठी
Cast: मैथिली पटवर्धन, साहिल जोशी, अजय जाधव, अतुल महाले, अभिलाषा पाटील, पूजा नायक
Producer: विधी कासलीवालDirector: रोहन देशपांडे
Duration: १ तास ३९ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

प्राजक्ता चिटणीस

लहानपण देगा देवा असे आपण नेहमीच ऐकतो... लहानपण हे खरंच सुंदर आणि निरागस असते. लहान मुलांचे विश्वच खूप वेगळे असते. लहान मुलांच्या निरागसतेवर हलक्याफुलक्या भाषेत भाष्य करणारा पिप्सी हा चित्रपट असून एक गोड कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळते.
लहान असताना आपल्याला परिकथेतील अनेक गोष्टी आपले वडिलधारे सांगत असतात. बालवयात या कथा ऐकताना या कथा आपल्याला खऱ्याखुऱ्याच वाटतात. एका राजाचा जीव पोपटात असतो ही कथा आपण लहानपणी अनेकवेळा ऐकली आहे... या कथेवर आपण त्यावेळी विश्वास देखील ठेवला होता. अशाच एका कथेवर विश्वास ठेवणाऱ्या चिमुरड्यांची कथा प्रेक्षकांना पिप्सी या चित्रपटात पाहायला मिळते. 
चानी (मैथिली पटवर्धन) आणि बाळू (साहिल जोशी) एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रीण असतात. चानीची आई प्रचंड आजारी असते. ती केवळ तीन महिनेच जगणार असे चानीला कळते. चानीला या गोष्टीचा चांगलाच धक्का बसतो. आईचा जीव वाचवण्यासाठी काहीही करायची तिची तयारी असते. त्याचदरम्यान माणसाचा जीव हा माश्यात असतो अशी एक कथा ती तिच्या गावात ऐकते. ही कथा ऐकल्यानंतर आपल्या आईचा जीव ज्या माश्यात आहे, तो मासा आपण शोधूया आणि तो पाळूया असे ती आणि बाळू ठरवते. ते हा मासा कसा शोधतात आणि हा मासा मिळाल्यानंतर तो सांभाळण्यासाठी ही मुले काय काय धडपड करतात? या माशाभोवतीच त्यांचे आयुष्य कसे फिरायला लागते? चानीच्या आईचे पुढे काय होते? अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना पिप्सी या चित्रपटात पाहायला मिळते.
लहान मुलांचे भावविश्व दिग्दर्शक रोहन देशपांडेने खूपच चांगल्याप्रकारे मांडले आहे. हा चित्रपट पाहाताना आपण देखील नकळपणे आपल्या बालवयातील आठवणीत गुंतून जातो. या चित्रपटातील चानी आणि साहिलची मैत्री मनाला चांगलीच भावते. त्या दोघांमध्ये असलेली निरागसता नक्कीच मन जिंकते. या चित्रपटातील संवाद देखील खूपच छान आहेत. चानीचे काही संवाद तर प्रेक्षकांच्या टाळ्या घेणार यात काही शंकाच नाही. मैथिली आणि साहिल या दोघांनी खूपच चांगला अभिनय केला आहे. चित्रपटाच्या टीमने या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी खूपच छान ठिकाणे निवडली आहेत. त्यामुळे हा चित्रपट पडद्यावर पाहायला खूपच छान वाटतो. तसेच प्रत्येक कलाकाराची रंगभूषा आणि वेशभूषा देखील मस्त जमून आली आहे. चित्रपटात अनेक गाणी असली तरी चित्रपटातील गाणी ओठावर रुळत नाहीत. 

Web Title: Pipsi Marathi review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.