‘सात उचक्के’ : शिव्यांचा भडिमार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2016 01:05 PM2016-10-17T13:05:40+5:302023-08-08T19:16:16+5:30

चित्रपटाचा कुठलाही संवाद शिव्यांशिवाय संपत नाही.

'Seven takhakke': Shivsay bombardment | ‘सात उचक्के’ : शिव्यांचा भडिमार

‘सात उचक्के’ : शिव्यांचा भडिमार

Release Date: October 14,2016Language: हिंदी
Cast: मनोज वाजपेयी, के के मेनन , विजय राज, अनुपम खेर, अन्नू कपूर, आदिती शर्मा
Producer: वेव्ह सिनेमा प्रोडक्शन कंपनीDirector: संजीव शर्मा
Duration: 2 तास 19 मि.Genre:
लोकमत रेटिंग्स
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
जान्हवी सामंत
 
संजीव शर्मा दिग्दर्शित ‘सात उचक्के’या चित्रपटाचे खरे आकर्षण म्हणजे मनोज वाजपेयी, के के मेनन आणि विजय राज हे तिन्ही मुरब्बी कलाकारांचे एकत्र येणे. जुन्या दिल्लीच्या गल्लीबोळात आकार घेणाऱ्या या चित्रपटात जुन्या दिल्लीतील शिव्यांचा भडिमार आहे. इतका की, चित्रपटाचा कुठलाही संवाद शिव्यांशिवाय संपत नाही. अनेक दृश्यांत ही असभ्य भाषा आणि शिव्या चित्रपटाच्या आनंदात बाधक ठरताना दिसतात. चित्रपटातील संवादातून हे सर्व अपशब्द आणि शिव्या काढल्या तर ‘सात उचक्के’ची लांबी अर्धी अधिक कमी झाली असती. पण याच शिव्या या चित्रपटाचा गावरान बाज राखतो, हेही प्रामाणिकपणे कबूल करायला हवे. मनोरुग्णालयातील बिच्ची (अनुपम खेर) या वेड्या माणसापासून सुरू झालेली कथा सात ‘उचक्क्यां’वर येऊन पोहोचते आणि सरतेशेवटी पुन्हा बिच्चीपर्यंत येऊन संपते. ‘सात उचक्के’ हा सात ‘उचक्क्यां’ची कहानी आहे, हे शीर्षकावरून कळतेच. हे सर्व  गुन्हेगारी विश्वातील ‘कच्चे लिंबू’. सराईत गुन्हेगार नाहीत पण निष्पापही नाहीत, या वर्गात मोडणारे. भोळ्याभाबड्या लोकांना भुलवून-फसवून, त्यांना लुबाडून पळ काढणे आणि यासाठी वेगवेगळ्या युक्त्या-क्लृप्त्या योजने हेच त्यांचे काम. पप्पी (मनोज वाजपेयी) हा या टोळीचा म्होरक्या. एक प्रेमळ ‘उचक्का’. त्याच्या डोक्यात पैसा कमावण्याच्या वेगवेगळ्या कल्पना जन्मास येतात आणि प्रत्येकवेळी त्या फसतात. पप्पीची एक सोना (अदिती शर्मा) नावाची प्रेयसी असते. ‘ब्युटी अ‍ॅण्ड ब्रेन’च्या जोरावर पुरुषांकडून काम काढून घेण्यात पटाईत असलेली सोना पप्पीला हवी असते. पण सोनाच्या आईच्या जावयाबद्दलच्या अपेक्षा काही वेगळ्याच असतात. सोनाच्या आईसमोर स्वत:ला श्रीमंत आणि यशस्वी सिद्ध करण्यासाठी पप्पी लुटमारीचा एका मोठा कट रचतो. हा कट असतो, एका हवेलीत अनेक वर्षांपासून दडवून ठेवलेला खजिना लुटण्याचा. या कटात पप्पी त्याच्यासोबतच्या सहाही ‘उचक्क्या’ना सामील करून घेतो. जग्गी (विजय राज) हा वकील त्यापैकीच एक. जग्गी आणि पप्पी खरे तर एकमेकांचे हाड वैरी असतात, पण तेवढीच त्यांना एकमेकांची गरजही असते. हा कट आखला जातो, पण तो पूर्ण करताना एकापाठोपाठ एक चुका होतात आणि कट फत्ते होण्याऐवजी सगळे ‘उचक्के’ त्यात चांगलेच गोवले जातात. काही मोजके संवाद आणि दिल्लीच्या चिंचोळ्या गल्लीबोळातील नेमके टिपलेले सौंदर्य यामुळे चित्रपटातील काही दृश्ये ताजी आणि विनोदी वाटतात. मनोज वाजपेयी, विजय राज आणि के के मेनन यांच्यातील उत्तम केमिस्ट्री या दृश्यांमध्ये नवे रंग भरतात. काही दृश्यांमधील या तिघांचीही वेगवेगळी शैली आपल्याला खूश करते. चित्रपटाचा प्रारंभ विनोदी आणि काहीसा ताजा वाटतो. पण कथा जशीजशी पुढे सरकते, तसा त्यातील तोच तोच पणा कंटाळवाणा व्हायला लागतो. हाच तोच तोच पणा चित्रपटाला रटाळ चित्रपटांच्या श्रेणीत घेऊन जातो.
संजीव शर्मा यांनी दिल्लीतील गल्लींचे सौंदर्य अप्रतिम पद्धतीने पडद्यावर दाखवलेय. चित्रपटातील काही विनोदी दृश्येही चांगली जमून आली आहेत. पण मध्यंतरानंतर चित्रपटाची लय सांभाळण्यात संजीव शर्मा अपयशी ठरलेत. त्यामुळे हा चित्रपट भरकटतो. चित्रपटाचा शेवट नाहक क्लिष्ट झाला आहे. एकंदर काय तर चित्रपट मजेशीर आहे. पण कदाचित डीव्हीडीवर!

Web Title: 'Seven takhakke': Shivsay bombardment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.