Qaidi Band Movie Review : ना घर का, ना घाट का!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 09:21 AM2017-08-25T09:21:59+5:302023-08-08T19:47:32+5:30

काही चित्रपट बनतातच का? असा प्रश्न अनेकदा आपल्या मनात येतो. ‘कैदी बँड’ या चित्रपटाबद्दल हाच प्रश्न विचारावा लागले. या चित्रपटाला ना हृदयस्पर्शी कथा आहे, ना लॉजिक आहे, ना ग्लॅमर.

Qaidi Band Movie Review: No Home, No Wheel !! | Qaidi Band Movie Review : ना घर का, ना घाट का!!

Qaidi Band Movie Review : ना घर का, ना घाट का!!

Release Date: August 25,2017Language: हिंदी
Cast: आदर जैन, आन्‍या सिंह, सचिन पिळगांवकर, प्रिंस परविंदर सिंह
Producer: आदित्य चोप्राDirector: हबीब फैसल
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
-ज
ान्हवी सामंत

काही चित्रपट बनतातच का? असा प्रश्न अनेकदा आपल्या मनात येतो. ‘कैदी बँड’ या चित्रपटाबद्दल हाच प्रश्न विचारावा लागले. या चित्रपटाला ना हृदयस्पर्शी कथा आहे, ना लॉजिक आहे, ना ग्लॅमर. प्रेक्षकांना भावेल असा कुठलाही मेलोड्राम यात नाही. ‘ना घर का, ना घाट का’ टाईप चित्रपट, असे एका वाक्यात या चित्रपटाचे वर्णन करता येईल. 

यशराज बॅनरचा हा चित्रपट भारतीय तुरूंगातील अंडरट्रायल कैद्यांचे जगणे आणि त्यांच्या समस्या दर्शवतो. सात युवा कच्च्या कैद्यांची ही कथा. अनेकजण लहान-सहान गुन्ह्यांसाठी ते तुरुंगात असतात. कॉल सेंटरचा कर्मचारी असणारा आणि वैमानिक बनण्याचे स्वप्न उराशी बाळणारा संजू (आदर जैन, राज कपूर यांचा नातू) आणि गायक होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारी  बिंदू (अन्या सिंह) हे दोघे या चित्रपटाचे मुख्य पात्र.  या दोघांशिवाय महागडे गिटार खरेदी करण्यासाठी पैसे चोरणारा मस्कीन (प्रिन्स परविंदर सिंह), ओगू (पीटीर मुक्सा मॅनिअल)हा नायझेरियन तरूण आणि दहशतवादी असल्याचा संशयावरून अटक करण्यात आलेला बीटेक-एमबीएचा विद्यार्थी रूफी (मिखैल यावलकर) तुरुंगात खितपड पडलेले असतात. मुंबईच्या एका तुरुंगात बंद असलेल्या या प्रत्येकाचे एक स्वप्न असते. तुरुंगातून आपण सुटू ही आशा त्यांना वाटत असली तरी देशाच्या कायदेशीर व्यस्थेतील अनेक त्रूटी त्यांच्या धैर्याची परीक्षा पाहणाºया ठरतात. याचदरम्यान जेलर धुलिया (सचिन पिळगावकर) या युवांना १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर सगळ्यांना एकत्र परफॉर्म करण्याची संधी देतो आणि हे सात जण या संधीचे सोने करण्यासाठी जीवाचे रान करतात. म्युझिक बँड बनवण्याचा निर्णय ते घेतात. आपण सर्वोत्तम सादरीकरण केले तर कदाचित आपली तुरुंगातून सुटका होईल, अशी आशा त्यांना असते. अखेर तो दिवस उजाळतो. कैच्च्या कैद्यांचा हा म्युझिक बँड आपल्या कलेचे सर्वोत्तम सादरीकरण करतो. मीडियासह अख्खा देश त्यांच्या या बँडची दखल घेतो. पण कौतुकापलिकडे त्यांच्या वाट्याला काहीच येत नाही. तुरुंगातून सुटका होण्याचे त्यांचे स्वप्न क्षणात मावळते. कारण सुटकेऐवजी या बँडमधील सगळेच   एका राजकीय कटाचे बळी पडतात. सुटकेची कुठलेही चिन्ह दिसत नसल्याने हे स्वप्नाळू तरूण तुरुंगातून पळून जाण्याची योजना आखतात. सात पैकी पाच जणांना बँडसाठी वाद्ये खरेदी करण्याच्यासाठी तुरुंगाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाते. पण यादरम्यान हे पाचही जण पळून जातात. ऐनकेन प्रकारे पोलिस त्यांना शोधून पुन्हा तुरुंगात डांबतात. पण  तोपर्यंत फासे पलटलेले असतात. कारण या युवा कैद्यांची कथा सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेली असते.

खरे तर एका बँडची कथा याअर्थाने या चित्रपटाचे म्युझिक दमदार असायला हवे होते. किंबहुना सर्वोत्तम म्युझिक हीच या चित्रपटाची मूळ गरज होती. पण दुदैवाने या कैदी बँडचे म्युझिक  पुरती निराशा करते. कैद्यांचा हा बँड लोकांवर जादू करतो, असे चित्रपटात दाखवले गेले असले तरी प्रत्यक्षात कर्णकर्कश आवाज आणि अर्थहिन बोल यापलीकडे यात काहीही दिसत नाही.  चित्रपटाची पटकथाही तितकीच निराश करते. पटकथा वास्तवाशी कुठेही मेळ खात नाही. तुरुंगातील कच्च्या कैद्यांच्या समस्या उजागर करण्याच्या नादात आणि चित्रपटातील पात्रांना प्रेक्षकांची सहानुभूती मिळवून देण्याच्या प्रयत्नात मुख्य कथाच भरकटत जाते. कच्च्या कैद्यांच्या समस्या दाखविण्याचे प्रामाणिक प्रयत्न असले तरी प्रत्यक्ष पडद्यावर हे प्रयत्न पूर्णत: फिके वाटतात. अभिनयाच्या बाबतीत सांगायचे तर,
  आदर जैन व अन्या सिंह दोघांचाही हा पहिला सिनेमा असूनही दोघांनी आपआपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. जेलरच्या भूमिकेत जीव नसला तरी सचिनने प्रशंसनीय काम केलेय. वाट्याला आलेला डार्क रोल त्याने प्रचंड ताकदीने उभा केला आहे. पण तरिही एकूणच कथेचा अभाव, अतिशय सुमार संगीत यामुळे हा चित्रपट कुठेही खिळवून ठेवत नाही. कदाचित त्याचमुळे प्रौढांना शिवाय युवांना कुणालाही तो अपिल होत नाही. म्हणूनच चित्रपटगृहांतून निघतात, काही चित्रपट बनतातच का?  हा प्रश्न हटकून आपल्या मनात येतो.

Web Title: Qaidi Band Movie Review: No Home, No Wheel !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.