Phillauri REVIEW : एकदा बघायला हरकत नाही अनुष्का शर्माचे ‘भूत’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2017 07:32 AM2017-02-06T07:32:30+5:302017-03-24T14:32:29+5:30

यापूर्वी कधीही आणि आपण अनुष्काचा न पाहिलेला अंदाज फिल्लुरी सिनेमात पाहायला मिळणार आहे. नेहमी वेगवेगळ्या अंदाजात अनुष्काने रसिकांचे मनोरंजन केले आहे. आता ती चक्क भुताची भूमिका साकारत रसिकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

Phillauri REVIEW : एकदा बघायला हरकत नाही अनुष्का शर्माचे ‘भूत’!! | Phillauri REVIEW : एकदा बघायला हरकत नाही अनुष्का शर्माचे ‘भूत’!!

Phillauri REVIEW : एकदा बघायला हरकत नाही अनुष्का शर्माचे ‘भूत’!!

googlenewsNext
Release Date: March 24,2017Language: हिंदी
Cast: अनुष्का शर्मा, दिलजीत दोसांझ
Producer: अनुष्का शर्मा,कर्नेश शर्माDirector: अंशल लाल
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
ुष्का शर्मा हिची निर्मिती असलेला ‘फिल्लोरी’ हा सिनेमा आज रिलीज झाला. या चित्रपटात अनुष्का लीड रोलमध्ये आहे. एका भटकत्या आत्म्याच्या रूपात अनुष्का यात दिसतेय. चित्रपटाची कथा सुरु होते एनआरआय कनन(सूरज शर्मा) याच्यापासून. कनन अनुसोबत (मेहरीन पीरजादा) लग्न करण्यासाठी भारतात येतो. पण साखरपुड्यापूर्वी त्याला मंगळ दोष असल्याचे सगळ्यांना कळते. मग त्याच्या घरचे बळजबरीने त्याचे लग्न एका पिंपळाच्या झाडाशी लावून ते झाड कापून टाकतात. पण यानंतर कथेत खरा टिष्ट्वस्ट येतो. साखरपुड्याच्या दिवशी शशी (अनुष्का शर्मा)चे भूत कननच्या मागे लागते. पिंपळाशी लग्न करण्याच्या नादात त्याचे अन् शशी दोघांचेही लग्न होऊन बसते. शशीचे भूत केवळ कननलाच दिसते. आता हे भूत कननला का त्रास देते? त्याच्या लग्नात का अडचणी निर्माण करते? कनन या भूतापासून स्वत:ची कशी सुटका करून घेतो? हे सगळे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपटच बघायला हवा. 

 दिग्दर्शक अंशाई लाल यांचा हा पहिला डेब्यू आहे. त्यांचा पहिला प्रयत्न बºयाच अंशी यशस्वी झाला आहे.  पण चित्रपटाची संथपणे पुढे सरकरणारी कथा त्यांच्या या प्रयत्नांत बाधा ठरते. अतिशय संथ सुरुवात पहिल्याच हाफमध्ये कंटाळा आणते. त्यामुळेच चित्रपटाला थोडा वेग दिला असता तर हा चित्रपट अधिक देखणा झाला असता, असे वाटल्याशिवाय राहत नाही.

अभिनयाचे म्हणाल तर, ‘लाईफ आॅफ पाई’ फेम सूरज शर्माने या चित्रपटात जबरदस्त अभिनय केला आहे. प्रथमच भूताच्या रूपात दिसलेल्या अनुष्काचा अभिनयही चांगला आहे. दिलजीत दोसांज गायक आणि कवीच्या रूपात शोभला आहे. पण चित्रपटाचा खरा प्राण म्हणजे अनुष्काच आहे. तुम्ही अनुष्काचे चाहते असाल आणि अनुष्का व दोसांजच्या रूपात एका नव्या-कोºया जोडीचा आॅनस्क्रीन रोमान्स पाहण्यासाठी उत्सूक असाल तर हा चित्रपट पाहायला हरकत नाही. हलका-फुलका, डोक्याला ताप न देणारा कॉमेडी मसाला पाहण्याची तुमची इच्छा हा चित्रपट पूर्ण करू शकतो.

Web Title: Phillauri REVIEW : एकदा बघायला हरकत नाही अनुष्का शर्माचे ‘भूत’!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.