Munna Michael Movie review : ‘लॉजिक’ नसलेला ‘फार्म्युला ’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2017 09:07 AM2017-07-21T09:07:39+5:302023-08-08T19:28:38+5:30

बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ पुन्हा एकदा त्याच्या शार्प मुव्स आणि धमाकेदार अ‍ॅक्शनसह परतला आहे. टायगरचा ‘मुन्ना मायकल’ आज चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. तेव्हा हा चित्रपट कसा आहे, ते जाणून घेऊ यात...

Munna Michael Movie review: 'Logic' formula ' | Munna Michael Movie review : ‘लॉजिक’ नसलेला ‘फार्म्युला ’

Munna Michael Movie review : ‘लॉजिक’ नसलेला ‘फार्म्युला ’

Release Date: July 21,2017Language: हिंदी
Cast: टायगर श्रॉफ,नवाजुद्दीन सिद्दीकी,निधी अग्रवाल
Producer: विकी रजानीDirector: सब्बीर खान
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>- जान्हवी सामंत

बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ पुन्हा एकदा त्याच्या शार्प मुव्स आणि धमाकेदार अ‍ॅक्शनसह परतला आहे. टायगरचा ‘मुन्ना मायकल’ आज चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. रिअल लाईफमध्ये टायगर मायकल जॅक्सनचा प्रचंड मोठा चाहता आहे. रिल लाईफमध्ये म्हणजेच, ‘मुन्ना मायकल’मध्येही तो याच भूमिकेत पाहायला मिळतोय. टायगरशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी आणि निधी अग्रवाल यात लीड रोलमध्ये आहेत. नवाजुद्दीनने यात पहिल्यांदा डान्स करताना दिसतोय तर निधीचा हा पहिला चित्रपट आहे. तेव्हा हा चित्रपट कसा आहे, ते जाणून घेऊ यात...
डान्स, फाईट आणि रोमान्स असा ‘मुन्ना मायकल’चा एकदम सरळ आणि सोपा फार्म्युला आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कथा फार क्लिष्ट नाही, त्यात फार धक्कादायक वळणं नाहीत. म्हणूनच हा चित्रपट पाहताना ८०च्या  दशकातला मिथूनचा एखादा चित्रपट सुरु आहे, असा फिल येतो. या चित्रपटात विणलेल्या कथेतील सगळीच पात्रं निव्वळ डान्स करतात, चमचमणारे कपडे घालतात आणि डिस्को क्लबमध्ये फिरतात. म्हणायला चित्रपटाचा हिरो गरीब असतो. पण छान छान कपडे घालायला त्याच्याकडे पैसे असतात. डान्स करून त्यातून उभ्या राहणा-या पैशाने तो आपल्या आजारी वडिलांवर उपचार करत असतो.
कथा सुरु होते, मायकलपासून (रॉनित). मायकल हा बॉलिवूडचा एक कोरस डान्सर असतो. मायकल जॅक्सनचा  जबरदस्त चाहता असलेला मायकल हिरोच्या मागे डान्स करून पैसे कमवत असतो. पण वय वाढल्याचे कारण देत, एकेदिवशी त्याला कामावरून काढले जाते. त्या दिवशी दारूच्या नशेत बेभरवशाच्या फिल्म आणि डान्स जगाबद्दल विचार करत असतानाच मायकलला कचºयात फेकलेले आणि जीवाच्या आकांताने रडत असलेले बाळ दिसते. मायकल या बाळाला घरी घेऊन येतो आणि त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी घेतो. हे बाळ म्हणजे मुन्ना मायकल अर्थात टायगर श्रॉफ. मुन्ना सुद्धा आपल्या वडिलांसारखाच मायकल जॅक्सनचा आणि डान्सचा चाहता असतो. पण मायकलला मुन्नाचा हा नाद मान्य नसतो. स्वत:चे अनुभवावरून मुन्नाने डान्सऐवजी एखादी चांगली नोकरी करावी, असे त्याला वाटत असते. तो हे अनेकपरिने मुन्नाच्या गळी उतरविण्याचे प्रयत्न करतो. पण मुन्नासाठी डान्स हाच त्याचा प्राण असतो. मुंबईच्या क्लबमध्ये डान्स करून तो पैसे कमवतो. पण अचानक मुंबईचे क्लब त्याला प्रवेश नाकारतात. वडिल आजारी असतात. अशास्थितीत त्याच्या उपचारांसाठी पैसे जमवायला आणि किंग आॅफ पॉपचे स्वप्न पूर्ण करायच्या इराद्याने मुन्ना दिल्लीत पोहोचतो. याच दिल्लीत डान्सवरून राडा होतो आणि या राड्यात मुन्नाला भेटतो हरियाणवी डॉन महिन्द्रा(नवाजुद्दीन सिद्दीकी). महिन्द्रा एका मुलीवर लट्टू असतो आणि तिला इंप्रेस करायला त्याला डान्स शिकायचा असतो. मग काय, मुन्ना महिन्द्राचा डान्स गुरु बनतो. डान्स शिकवता शिकवता मुन्ना महिन्द्राचा जिगरी यार बनतो. मुलींच्या बाबतीत अतिशय लाजाळू असलेला महिन्द्रा त्याला आवडत असलेल्या मुलीला अर्थात डॉलीला (निधी अग्रवाल) पटवायला मुन्नाचीच मदत घेतो.   डॉलीला पण डान्समध्ये रूची असते. खूप मोठी रिअ‍ॅलिटी डान्स स्टार बनणे, हेच तिचे स्वप्न असते. महिन्द्रासाठी बोलणी करायला मुन्ना व डॉली भेटतात पण स्वत:च एकमेकांच्या प्रेमात पडतात. पुढे डॉनला चुकवून मुन्ना व डॉली हे दोघे कसे एकत्र येतात, हीच या चित्रपटाची कथा आहे.

मध्यांतरापर्यंत ही कथा अतिशय सुरस आहे. टायगर एक उत्कृष्ट डान्सर असल्याने यातील त्याची भूमिका जणू त्याच्यासाठीच निर्माण केली गेल्याचे, चित्रपट पाहताना जाणवत राहते. पण चित्रपटातील खरी गंमत नवाजच्या एन्ट्रीनंतरच सुरु होते. फारच खुंखार पण तेवढाच प्रेमळ असा गुंड साकारूनही प्रेक्षकांची सगळी सहानुभूती नवाजच्या वाट्याला येते. ही सहानुभूती केवळ नवाजच मिळवू शकतो. डान्सबद्दल अ की ढ माहित नसलेला नवाज, डान्स शिकतो. तेव्हाचा अवघडलेपणा त्याने जशाच्या तसा पडद्यावर दाखवला आहे. टायगरचा डान्स आणि नवाजने साकारलेला मऊ हृदयाचा गुंड भावतो. पण कथेत ‘लॉजिक’ नसल्याने ‘मुन्ना मायकल’ मात्र फारसा भावत नाही. मुन्नाच्या वडिलांना काय आजार असतो, हे शेवटपर्यंत कळत नाही. महिन्द्रा डॉलीवर इतका का मरतो? इतक्या मोठ्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये डॉली स्पर्धक म्हणून असते. पण तरिही महिन्द्राला तिचा थांगपत्ता लागत नाही? अशी सगळी प्रश्न डोक्याचा भुगा करतात. शेवटपर्यंत या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही. या प्रश्नांशिवाय ‘मुन्ना मायकल’मध्ये लीड अ‍ॅक्ट्रेस म्हणून निधी अग्रवालला का घेतले गेले असेल? याही प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. महिन्द्रासारखा गुंड आपले सर्वस्व ओवाळून टाकेल किंवा मुन्ना सारखा हँडसम तरूण तिच्या प्रेमात पडेल, अशी हिरोईन ती नाहीच. अतिशय सामान्य चेहरा, तितकाच सामान्य डान्स आणि तितकाच सुमार अभिनय यामुळे निधीला पाहणे कंटाळवाणे वाटते.

पुढे चित्रपटाचा दुसरा भागही कंटाळा आणतो.  अर्थात टायगर व नवाजची केमिस्ट्री, नवाजचा अल्लड डान्स आणि चित्रपटाचा टेम्पो व मूडला शोभणारे मीत ब्रदर्स, तनिष्क बागची, प्रणय, विशाल मिश्रा, जावेद मोहसीन  यांचे संगीत असे सगळे अनुभवायचे असेल तर हा चित्रपट बघायला हरकत नाही.

Web Title: Munna Michael Movie review: 'Logic' formula '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.