Ishqeria Movie Review:  मेंदूचा भूगा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 06:17 PM2018-09-21T18:17:57+5:302023-08-08T19:47:32+5:30

इश्किरिया हा प्रेरणा वाधवान लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट २१ सप्टेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला. रिचा चड्ढा आणि नील नितीन मुकेश यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एक रोमॅन्टिक ड्रामा आहे.

Ishqeria Movie Review | Ishqeria Movie Review:  मेंदूचा भूगा

Ishqeria Movie Review:  मेंदूचा भूगा

Release Date: August 21,2018Language: हिंदी
Cast:  रिचा चड्ढा, नील नितीन मुकेश, राज बब्बर, गुरबानी जज
Producer: इंदीवर भाटिया, पूजा वर्मा, प्रेरणा वाधवान, रवी वाधवानDirector: प्रेरणा वाधवान
Duration: 1 तास 58 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

 - श्वेता पांडे

इश्किरिया हा प्रेरणा वाधवान लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट २१ सप्टेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला. रिचा चड्ढा आणि नील नितीन मुकेश यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एक रोमॅन्टिक ड्रामा आहे.
 एक मुलगी कुहू (रिचा चड्ढा )  कॉलेजात प्रवेश घेते़ त्याच कॉलेजात राघव डालमिया (नील नितीन मुकेश) नावाचा एक तरूण आहे.  शिक्षणाबद्दल प्रचंड गंभीर असलेला राघव आपल्या वडिलांचा तितकाच प्रचंड तिरस्कार करत असतो. पहिल्याच नजरेत कुहू राघवच्या प्रेमात पडते आणि त्याला स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी बरेच प्रयत्न करते. तिचे प्रयत्न यशस्वीही होतात. पण एकदिवस अचानक राघव बोस्टनला निघून जातो. यानंतर सात वर्षांनी तो पुन्हा परत येतो आणि राघव व कुहूचा पुन्हा सामना होतो. पण यावेळी राघवसोबत त्याची मंगेतर असते. यानंतर चित्रपटात इतकी अनपेक्षित वळणे येतात की, ती पाहतांना डोके गांगरते.
  हा चित्रपट २०१२ मध्येच तयार झाला होता. पण चारवर्षांनंतर तो प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कथेपासून तर सगळेच मेंदूचा प्रचंड भूगा करणारे आहे. इतका की, बदाम खाण्याची गरज भासावी.  म्हणायला ही लव्हस्टोरी आहे. पण सस्पेन्स निर्माण करण्याच्या प्रयत्नात जे काही प्रेक्षकांच्या पुढे वाढले जाते, ते पाहण्यासारखे तर अजिबात नाही. यातील एकही मुख्य कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बाहेर पडला नाही, त्यावरूच चित्रपटाचा अंदाज यावा.

 
 

Web Title: Ishqeria Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.