Hate Story4 Movie Review : नुसताच ‘बोल्ड’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 07:59 AM2018-03-09T07:59:21+5:302023-08-08T19:16:16+5:30

विशाल पांड्या दिग्दर्शित ‘हेट स्टोरी’ शृंखलेचा चौथा चित्रपट ‘हेट स्टोरी4’ आज शुक्रवारी रिलीज झाला. ‘ए’ प्रमाणपत्रासह रिलीज झालेला हा चित्रपट उर्वशी रौतेलाच्या बोल्ड अदांमुळे आधीच चर्चेत आहे.

Hate Story4 Movie Review: Only 'Bold' !! | Hate Story4 Movie Review : नुसताच ‘बोल्ड’!!

Hate Story4 Movie Review : नुसताच ‘बोल्ड’!!

Release Date: March 09,2018Language: हिंदी
Cast: विवान भतेना, करण वाही, उर्वशी रौतेला, इहाना ढिल्लन, गुलशन ग्रोवर
Producer: भूषण कुमार, किशन कुमारDirector: विशाल पांड्या
Duration: २ तास १० मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>- जान्हवी सामंत

विशाल पांड्या दिग्दर्शित ‘हेट स्टोरी’ शृंखलेचा चौथा चित्रपट ‘हेट स्टोरी4’ आज शुक्रवारी रिलीज झाला. ‘ए’ प्रमाणपत्रासह रिलीज झालेला हा चित्रपट उर्वशी रौतेलाच्या बोल्ड अदांमुळे आधीच चर्चेत आहे. आता पडद्यावर  पे्रक्षकांच्या कसोटीवर तो किती खरा उतरलायं, ते जाणून घेऊ यात...

‘हेट स्टोरी4’ हा आधीच्या तीन भागांप्रमाणेच बोल्ड आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे पहिल्या दहा मिनिटांतच चार क्लोजअप ‘क्लीवेज शॉट्स’ यात पाहायला मिळतात.  मुळातच अंगप्रदर्शन करणारा चित्रपट असल्याचे ‘हेट स्टोरी4’कडून फार अपेक्षा करणे मूर्खपणा ठरेल, हे आम्ही आधीच स्पष्ट करू इच्छितो. (थोडक्यात सांगायचे तर, अंगप्रदर्शन आणि कुठलीही गरज नसताना दाखवलेले ‘क्लीवेज शॉट्स’ चालू आहेत तोपर्यंत कथेकडे किंवा त्यातल्या विचित्र प्रसंगांकडे लक्ष देण्याची गरजचं भासत नाही.)

कथा आहे आर्यन (विवान भतेना),त्याची पत्नी रिश्मा (इहाना ढिल्लन), विवानचा भाऊ राजवीर (करण वाही) आणि डान्स क्लब डान्सर व भावी मॉडेल ताशा (उर्वशी रौतेला) यांची.  राजवीर हा एक फॅशन फोटोग्राफर असतो. आर्यन राजवीर एक क्रिएटीव्ह एजन्सी चालवत असतात. एका कॉस्मेटिक ब्रॅण्डच्या कॅम्पेनसाठी यांना एका नव्या चेहºयाचा शोध असतो. अशात एका क्लबमध्ये राजवीरची नजर ताशावर पडते. ताशाच्या सौंदर्यावर तो असा काही भाळतो की, काहीच दिवसांत तिला हे कॅम्पेन मिळवून देतो. यादरम्यान ताशाला राजवीर आवडू लागतो. राजवीरही ताशाला इम्प्रेस करण्याच्या नवनव्या संधी शोधत असतो. पण याचदरम्यान राजवीरचा भाऊ विवान हाही ताशावर भाळतो. विवानला पैशाची कमतरता नसते. आपल्या भावाचे ताशावर प्रेम आहे, हे माहित असूनही एकदिवस संधी साधून विवान ताशाच्या ड्रिंकमधून नशेची गोळी देतो आणि नंतर तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवतो. ताशा शुद्धीवर येते तेव्हा राजवीरला हे कळले तर काय होईल, असे ती आर्यनला विचारले. तोपर्यंत रिश्माला या रात्रीबद्दल कळून चुकते. ती जाब विचारायला ताशाच्या घरी पोहोचते आणि या गरमागरमीत आर्यन रिश्माची हत्या करतो. यादरम्यान ताशाचा एक भूतकाळही समोर येतो. राजवीरला आर्यन आणि ताशाबद्दल कळते का? आर्यन रिश्माच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावतो? ताशा नक्की कोण असते? खरे तर असे काही विचार यादरम्यान आपल्या मनात यायला हवेत. पण ते येत नाही. कारण पहिल्या भागातचं चित्रपट इतका गुंतागुंतीचा बनतो की, हा गुंता सोडवता सोडवता कंटाळा येतो.  ‘हेटस्टोरी4’ एक सूडकथा असल्याने कुणीतरी कुणाचा बदला घेणार, हे तसेही कळून चुकलेले असते. पण ते कसे हे कळण्याआधीच कलाकारांचा सुमार अभिनय आणि कर्णकर्कश पार्श्वसंगीत यामुळे आपले डोके  ‘स्वीच आॅफ’ होते. मध्यांतरानंतर काहीतरी चांगले पाहायला मिळणार, असे वाटत असतानाच चित्रपट आणखी रटाळ होत जातो आणि पुढे वैताग आणणारा ठरतो. ताशा तर खरोखरीचं ‘हेट स्टोरी4’ ठरते.

संपूर्ण सिनेमात गुलशन ग्रोवर यांचा एक अपवाद सोडला तर एकाही कलाकाराचा अभिनय दिसून येत नाही. खरे ‘हेट स्टोरी’ फ्रेंचाइजीसारखे चित्रपट मुळातचं अभिनयासाठी बघितले जात नाहीत. पडद्यावरचे अंगप्रदर्शन बघण्यासाठीचं हे चित्रपट बघितले जातात. त्यामुळे कौटुंबिक पे्रक्षकांनी या चित्रपटाच्या वाट्याला न गेलेलेचं  बरे.  

Web Title: Hate Story4 Movie Review: Only 'Bold' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.