Baadshaho Movie Review : सगळा मसाला, पण तरिही नाही चव!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 08:03 AM2017-09-01T08:03:54+5:302017-09-01T15:37:14+5:30

अ‍ॅक्शन, दमदार डायलॉग्स, राजकारणपासून तर एका नोकराचा प्रामाणिकपणा, रोमान्स असे सगळेच सिनेमात पाहायला मिळणार आहे.

Baadshaho Movie Review : सगळा मसाला, पण तरिही नाही चव! | Baadshaho Movie Review : सगळा मसाला, पण तरिही नाही चव!

Baadshaho Movie Review : सगळा मसाला, पण तरिही नाही चव!

googlenewsNext
Release Date: September 01,2017Language: हिंदी
Cast: अजय देवगन,विद्युत जाम्मवाल,ईशा गुप्ता,इमरान हाश्मी,संजय मिश्रा,इलियाना डिक्रूज
Producer: भूषण कुमार , मिलन लूथरियाDirector: मिलन लूथरिया
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
-
ान्हवी सामंत

मिलन लुथरिया दिग्दर्शित ‘बादशाहो’ आज चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. ‘कच्चे धागे’,‘चोरी चोरी’,‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ यानंतर मिलनचा अजय देवगणसोबतचा हा चौथा सिनेमा आहे.  चला तर, अजयचा हा चित्रपट कसा आहे, जाणून घेऊ यात...
‘जिंदगी के सिर्फ चार दिन और आज चौथा दिन...’, असे म्हणत भवानी सिंह ‘रिस्क वर रिस्क’ घेतो आणि  अ‍ॅक्शन, रोमान्स, थ्रील, डायलॉग्ज असा सगळा मसाला असलेला ‘बादशाहो’ पुढे पुढे सरकतो. अजय देवगण आणि इमरान हाश्मीच्या रोमॅन्टिक अदा, इलियाना डिक्रूजचा रॉयल अंदाज आणि सनी लिओनीच्या आयटम साँगने सजलेला ‘बादशाहो’ एक  ‘मसाला फिल्म’ आहे, असे प्रारंभीच सांगता येईल.
जयपूरची राजकुमारी गीतांजली देवी (इलियाना डिक्रूज) वडिल अर्थात महाराजाच्या स्वर्गवासानंतर  एकटीच राज्य कारभार सांभाळत असते. तिच्या वडिलांचा अगदी भरवशाचा माणूस भवानी सिंह (अजय देवगण) राज्यकारभार हाकण्यात तिची मदत करत असतो. तो  केवळ तिचा सुरक्षारक्षकच नसतो तर तिच्यावर जीवापाड प्रेम करत असतो. गीतांजलीही त्याच्यावर भाळलेली असते. दोघांचे हे प्रेम फुलत असतानाच देशात आणीबाणी लागू होते आणि राजे-महाराजांचा खजिना जप्त करण्याचे सत्र सुरु होते. गीतांजलीवर सूड उगवण्यासाठी राजकीय नेता संजीव तिचा खासगी खजिना जप्त करत तिला अटक घडवून आणतो. लाखो रूपयांचा हा खजिना वाचवण्यासाठी गीतांजली देवी भवानीची मदत घेते आणि दिल्लीला पोहोचण्याआधीच खजिना लुटण्याचा कट आखला जातो.
एकीकडे हा कट आखला जात असताना दुसरीकडे चित्रपटात सहर सिंह(विद्युत जामवाल)ची एन्ट्री होते. सरकारकडून खजिना दिल्लीला पोहोचवण्याची जबाबदारी आर्मी आॅफिसर सहर सिंहवर सोपवली जाते आणि मग सुरु होतो, या खजिन्याचा जयपूर ते दिल्लीला  थ्रीलिंग प्रवास. गीतांजलीच्या आदेशानुसार, भवानी दलिया(इमरान हाश्मी), गुरूजी (सौरभ मिश्रा) आणि संजना (इशा गुप्ता) या सगळ्यांना आपल्यासोबत घेतो. सहर सिंहच्या नाकाखालून खजिना पळवून नेण्याचा त्यांचा कट असतो. आता हा कट यशस्वी होतो की नाही? शेवटी खजिन्याचे काय होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहांत जावूनच ‘बादशाहो’  बघावा लागेल.
एकंदर ‘बादशाहो’बद्दल सांगायचे तर हा सिनेमा ‘टिपीकल’ मिलन लुथरिया टाईप फिल्म आहे. भव्यदिव्य पार्श्वभूमी, आकर्षक निसर्ग सौंदर्य, स्टाईलिश हिरो, जबरदस्त अ‍ॅक्शन आणि हलकी-फुलकी कॉमेडी असे सगळे या चित्रपटात आहे. मध्यांतरापूर्वी हा चित्रपट मनोरंजक वाटतो. पण मध्यांतरानंतर मात्र तो तुमच्या संयमाची जणू परीक्षाच पाहतो. दुसºया भागात चित्रपट अगदीच संथपणे पुढे सरकतो. गरजेपेक्षा अधिक ‘ढिशूम ढिशूम’ यापलीकडे या भागात काहीच होत नाही. अनपेक्षितपणे रंग बदलणा-या पात्रांमुळे दुस-या भागात चित्रपटाची पटकथा असा काही गुंता निर्माण करते की, क्लायमॅक्समध्ये कोण कुणावर गोळी झाडतोय, हेही कळत नाही.
राजकुमारीच्या भूमिकेत इलियानाचा रॉयल अंदाज एकदम आकर्षक आहे. इशा गुप्ताच्या वाट्याला फारसे काम नाहीय. पण तिच्या वाट्याला आलेल्या एकमेव दृश्यात तिने जीव ओतलायं. अजय देवगणची अ‍ॅक्शन आणि इमरानचा रोमॉन्स म्हणजे एक टफ हिरो अन् दुसरा रोमॅन्टिक हिरो, असे दोघेही एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतात.

 
 

Web Title: Baadshaho Movie Review : सगळा मसाला, पण तरिही नाही चव!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.