​ Aiyaary Movie Review: नो थ्रील, नो ड्रामा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 09:18 AM2018-02-16T09:18:22+5:302023-08-08T20:27:58+5:30

दिग्दर्शक नीरज पांडे यांचा ‘अय्यारी’ हा सिनेमा आज अखेर रिलीज झाला. तेव्हा जाणून घेऊ या , सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयीचा हा चित्रपट कसा आहे ते....

Aiyaary Movie Review: No Thrill, No Drama! | ​ Aiyaary Movie Review: नो थ्रील, नो ड्रामा!

​ Aiyaary Movie Review: नो थ्रील, नो ड्रामा!

Release Date: February 16,2018Language: हिंदी
Cast: रकुल प्रीत सिंह,सिद्धार्थ मल्होत्रा,पूजा चोपड़ा,मनोज वाजपेयी
Producer: फ्रायडे फिल्म वर्क्स, Pen India LimitedDirector: नीरज पांडे
Duration: २ तास ४० मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>- जान्हवी सामंत

दिग्दर्शक नीरज पांडे यांचा ‘अय्यारी’ हा सिनेमा आज अखेर रिलीज झाला.  ‘सोलो रिलीज’च्या प्रतीक्षेत या चित्रपटाची रिलीज डेट वारंवार पुढे ढकलण्यात आली. यानंतर चित्रपटाचा संवेदनशील विषय बघता, सेन्सॉर बोर्डाने तो संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीकडे पाठवला. या कमिटीने सुचवलेल्या दुरूस्तीनंतर अखेर ६५ कोटी रूपये बजेटचा हा चित्रपट रिलीज झाला. तेव्हा जाणून घेऊ या ,  सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयीचा हा चित्रपट कसा आहे ते....

‘अ वेन्सडे’, ‘बेबी’ आणि ‘स्पेशल 26’ या चित्रपटानंतर नीरज पांडे यांची एक वेगळी प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात तयार झाली आहे. नीरज पांडे आठवलेत की आठवतो तो एक  कडक थ्रीलर चित्रपट. या अपेक्षेवर ‘अय्यारी’ मात्र फिका ठरतो. लष्करातील हेरगिरी, शस्त्रास्त्र खरेदी व्यवहार, व्यवस्थेतील भ्रष्टाचार, गुप्त मोहिम असा सगळा  मसाला या चित्रपटात आहे. पण एवढे असूनही हा चित्रपट बेचव वाटतो. लष्करातील भ्रष्टाचार आणि तो निखंदून काढण्याचे प्रयत्न असा ‘अय्यारी’चा साधारण ‘प्लॉट’ आहे. अभय सिंग (मनोज वाजपेयी) एक प्रामाणिक लष्करी अधिकारी असतो. त्याच्यावर एका गुप्त मोहिमेची जबाबदारी सोपवली जाते. या गुप्त मोहिमेत सामील टीमला   निनावी पद्धतीने आपली मोहिम पूर्ण करायची असते. त्यामुळेच भारतीय लष्कराच्या नजरेत या टीमचे कुठेही अस्तित्व नसते. जय बक्षी (सिद्धार्थ मल्होत्रा) हा अभय सिंगच्या टीममधील एक सर्वात कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी असतो. अभय सिंग कैरोमध्ये मोहिमेवर असताना हाच जय बक्षी अचानक बेपत्ता होतो. त्याचे सेव्हिंग अकाऊंट रिकामे झालेले असते. काही गुप्त डाटा आणि गोपनीय फाईल्सही गायब असतात. यावरून जय जाणीवपूर्वक बेपत्ता झाल्याचा निष्कर्ष काढला जातो आणि लष्कराला गुप्त माहिती लीक होण्याची भीती सतावू लागले. त्यामुळे जयला ऐनकेन प्रकारे शोधून काढून त्याच्या जवळची माहिती नष्ट करण्याचे निर्देश लष्करप्रमुख अभय सिंगला देतात. अभय सिंग जयपर्यंत कसा पोहोचतो आणि लष्कराची अतिशय संवेदनशील माहिती शस्त्रास्त्र दलांलांपासून कशी वाचवतो, हा या चित्रपटाचा मुख्य विषय आहे. पण हा मुख्य विषय मांडतांनाच नेमकी गुंतागंूत झाली आहे. थ्रील आणि सस्पेन्स वाढवण्याच्या नादात  मुख्य विषय बराच गुंतागुंतीचा आणि ताणून धरल्याचे त्यामुळे वेळोवेळी जाणवते.

मनोज वाजपेयी, अनुपम खेर, नसीरूद्दीन शहा, अदील हुसैन अशी दिग्गजांची फौज असूनही चित्रपटाची कथा दिग्दर्शकाला फुलवता आलेली नाही. ही फुलवता न आलेली कथा हीच ‘अय्यारी’ची सर्वात मोठी उणीव आहे. कर्णकर्कश, वातावरणात ताण निर्माण करणारे संगीत  आणि सतत एकमेकांचा पाठलाग करणारे लोक एवढे दाखवून ‘थ्रील’ निर्माण करता येत नाही. प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारी कथा आणि  ‘थ्रील’ निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारी वळणे या चित्रपटात नाहीत. जय आणि सोनिया (रकुल प्रीत सिंह) या दोघांचा रोमॅन्टिक अँगल तसेच जय व अभयच्या ट्रेनिंगचे किस्सेही कंटाळा आणणारे आहेत. निश्चितपणे कथेला टिष्ट्वस्ट देणारे काही असते तर हा चित्रपट अधिक मनोरंजक झाला असतात. ‘स्पेशल 26’ आणि ‘बेबी’ सारखे ‘ड्राय ह्युमर’नेही हा चित्रपट थोडा सौम्य करता आला असता. अर्थात तरिही थ्रीलर चित्रपट आवडणारे हा चित्रपट बघू शकतात. इतरांनी टीव्ही येईपर्यंत प्रतीक्षा केली तरी चालेल.

Web Title: Aiyaary Movie Review: No Thrill, No Drama!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.