मुली अनेकदा आपल्या कमी उंचीमुळे फार कमीपणा वाटत असतो. मुलींना असं वाटतं की, कमी उंचीमुळे सगळे त्यांची खिल्ली उडवतील आणि कोणालाच त्या आवडणार नाही. तुमचीही उंची कमी असेल आणि तुम्हीही असाच काहीसा विचार करत असाल तर तुम्ही अत्यंत चुकीचा विचार करत आहात. कारण अनेक मुंलाना आपल्यापेक्षा उंचीने कमी असणाऱ्या मुली आवडतात. असं आम्ही नाहीतर एका संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. एका संशोधनानुसार, मुलांना जास्त उंची असणाऱ्या मुलींपेक्षा कमी उंची असणाऱ्या मुली अत्यंत आवडतात. जाणून घेऊया काही अशी कारण, ज्यामुळे कमी हाइट असणाऱ्या मुलींवरून मुलं जीव ओवाळून टाकतात. 

क्यूटनेससोबतच केअरिंगही असतात या मुली

कमी उंची असणाऱ्या मुली जेवढ्या क्यूट असतात. तेवढ्याच आपल्या पार्टनरबाबत केअरिंगही असतात. तुम्ही जर टेन्शनमध्ये असाल तर तुमचा मूड ठिक करण्यासाठी त्या शक्य असतील तेवढे प्रयत्न करतात. त्यांच्या याच गुणामुळे मुलं त्यांच्यावर फिदा होतात. 

मदतीसोबतच प्रेमही करतात 

जर तुमची गर्लफ्रेंडची उंची कमी असेल तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. कोणत्याही परिस्थितीत या मुली तुमची साथ सोडणार नाहीत. तसेच त्या तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. तुमच्यातील नातं खुलवण्यासाठी त्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी करत असतात. हेच लहान क्षण तुमचं नातं मजबुत करण्यासाठी मदत करतात. 

मिठी जी थेट हृदयाच्या ठोक्यांपर्यंत पोहोचते

जेव्हा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला मिठी मारता. त्यावेळी ती तुमच्या हृदयाचे ठोके अगदी सहज ऐकू शकते. हा क्षण मुलांना फार आवडतो. 

आपल्या वयापेक्षा दिसतात लहान 

कमी उंची असणाऱ्या मुली नेहमी आपल्या वयापेक्षा लहान दिसतात. एवढचं नाहीतर लहान उंचीच्या मुली फार खर्चही करत नाहीत. असं सांगितलं जातं की, त्या आपल्या पार्टनरवर जीवापाड प्रेम करतात. 

हाय हिल्समुळे आकर्षक दिसते पर्सनॅलिटी 

कमी उंचीच्या मुलींकडे पुरूष आकर्षित होण्याचं आणखी एक कारण म्हणजे, ज्यावेळी या मुली हाय हिल्स वेअर करतात. त्यावेळी त्यांची पर्सनॅलिटी आणखी सुंदर दिसते. 

रोमॅन्टिक नेचर 

असं सांगितलं जातं की, पुरूषांना कमी हाइटच्या मुली यामुळे आवडतात की, त्या स्वभावाने अत्यंत रोमॅन्टिक असतात. तसेच आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी त्या अनेक उपाय करत असतात. 

खास असतात छोट्या उंचीच्या मुली 

आपल्या कमी उंचीमुळे त्या अनेकदा त्यांच्या पर्सनॅलिटीच्या इतर फिचर्सकडे दुर्लक्ष करतात. असं सांगितलं जातं की, सोजवळ आणि काइन्ड नेचर असण्यासोबतच कमी उंचीच्या महिला रोमॅन्टिकही असतात. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Web Title: Why boys like girls with low height

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.