(Image credit : Разноблог)

'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' हे आपण सारेच जाणतो. पु.लंच्या 'व्यक्ती आणि वल्ली' पुस्तकातून याचा प्रत्यय आपल्या सर्वांनाच येत असतो. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती असतात. सर्वांच्या स्वभावामध्ये आपल्याला काहीना काही बदल दिसून येत असतात. एवढचं नाहीतर काही व्यक्ती अशाही असतात. ज्या परिस्थितीनुसार आपल्या स्वभावामध्ये बदल करतात. पण हे सर्वांना जमतं अस नाही. परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणं अनेकांना जमत नाही. अनेक व्यक्ती अशा असतात, ज्या अजिबात मागचा-पुडचा विचार न करता आपल्या मनातील गोष्टी इतरांना सांगतात. तर काही व्यक्ती आपल्या मनातील गोष्टी कोणलाच सांगत नाहीत.

आज आम्ही तुम्हाला अशा राशीच्या व्यक्तींबाबत सांगणार आहोत. ज्या स्वतःमध्ये कोणत्याही परिस्थितीनुसार बदल घडवून आणतात. एवढंच नाहीतर त्या आपलं दुःख कोणालाच सांगत नाहीत. तसेच मनातील गोष्टीही इतरांना सांगताना फार विचार करतात. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींचा यामध्ये समावेश होतो त्याबाबत... 

कर्क राशी 

कर्क राशीच्या व्यक्ती आपलं मन सहजासहजी कोणासमोर मोकळं करत नाहीत. त्या आपल्या मनातील गोष्टी, प्रॉब्लेम्स कोणाला सांगण्याऐवजी स्वतःच्या मनातच ठेवतात. या राशीच्या व्यक्ती फार सेन्सिटिव्ह आणि इमोशनल असतात. या राशीच्या व्यक्तींबाबत सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे, या ज्यांच्यावर प्रेम करतात, त्यांना कधीच संकटात किंवा दुःखात पाहू शकत नाहीत. कदाचित याच कारणामुळे आपल्या समस्या आणि दुःख ते कोणासोबत शेअर करत नाहीत. या व्यक्तींच्या मनातल्या गोष्टी ओळखणं अत्यंत आवघड असतं. कारण या व्यक्ती कितीही संकटात असल्या तरि त्यांच्या चेहऱ्यावर ते अजिबात जाणवू देत नाहीत. या राशीच्या व्यक्तींसाठी प्रत्येक नात्याचं वेगळं अस्तित्व आणि महत्त्व असतं. या प्रत्येक नातं जपायला आवडतं. 

कन्या राशी

कन्या राशीच्या व्यक्ती कधीच स्वतःला परिपूर्ण समजत नाहीत. कोणत्याही बाबतीत ते कधीच दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीवर आरोप लावत नाहीत. ते नेहमी स्वतःलाच दोषी समजतात. तुम्हाला वाटेल की, त्यांच्या या गुणामुळे त्यांना प्रत्येकवेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल. पण त्यांच्या या गुणांमुळे त्यांना अनेक फायदेही होतात. कारण आपल्यातील दुर्गुण शोधून ते दूर करण्यासाठी कन्या राशीच्या व्यक्ती सतत प्रयत्नशील असतात. आपल्या गोष्टी या व्यक्ती सहजासहजी कोणाला सांगत नाहीत. एवढचं नाहीतर हे आनंदी आहेत की, दुःखी आहेत याचा शोध तुम्ही त्यांना भेटल्यावरही लावू शकत नाहीत. तसेच आपल्यातील कमतरता दूर करण्याच्या प्रयत्नात ते फार विचारात जातात. तुम्ही त्यांना कितीही समजावलं तरिही ते लवकर समजून घेत नाहीत. 

वृश्चिक राशी

अनेक लोकांचा असा समज असतो की, त्यांचे प्रॉब्लेम्स कोणीही चटकन दूर करू शकत नाही. असाच काहीसा विचार करणाऱ्या व्यक्तींमध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा समावेश होतो. या राशीच्या व्यक्ती जास्त सोशल नसतात. या व्यक्तींना लोकांना भेटणं जास्त आवडत नाही. या व्यक्ती आपला आनंद कोणाशीही शेअर करत नाहीत. या स्वतःला आपल्यापर्यंतंच मर्यादित ठेवतात. 

कुंभ राशी 

आपलं दुःख कितीही मोठं असलं तरिही ते कोणालाही न दाखवणं या राशीच्या व्यक्तींना अगदी उत्तम प्रकारे येतं. कुंभ राशीच्या व्यक्ती कोणतीही परिस्थिती गंभीरपणे हाताळतात. एवढचं नाहीतर या व्यक्ती अत्यंत सावधपणे आपल्या समस्यांचं निवारण करतात. त्या कधीही आपल्या भावनांचा दिखावा करत नाहीत. 

टिप : वरील सर्व गोष्टी या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. 


Web Title: These zodiac sign people never share their feelings to others
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.