नातं तुटायला मुलांच्या 'या' सवयी ठरतात कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 06:50 PM2020-05-05T18:50:40+5:302020-05-05T18:56:01+5:30

अनेकांना आपल्या पार्टनरच्या अपसेट होण्याकडे किंवा रागावण्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते.

These habits can cause breakups in relationship myb | नातं तुटायला मुलांच्या 'या' सवयी ठरतात कारणीभूत

नातं तुटायला मुलांच्या 'या' सवयी ठरतात कारणीभूत

Next

रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तींना एकमेकांचे स्वभाव सांभाळून वागावं लागतं. अन्यथा  पार्टनरसोडून फक्त स्वतःचा विचार केल्यामुळे नातं तुटण्याची शक्यता असते. काही मुलांमध्ये अशा सवयी असतात. ज्या कधीही बदलत नाहीत. याच कारणांमुळे अनेकदा ब्रेकअप होतं. तुमचा विश्वास  पार्टनवर नसेल तर कधीही ब्रेकअप होऊ शकतं.  नकळतपणे केलेल्या अनेक चुकांमुळे पार्टनरला तुमच्या व्यतिरिक्त इतरांची गरज भासत असते.आज आम्ही तुम्हाला अशा काही सवयी सांगणार आहोत. या सवयी चांगलं असलेलं नातं तुटण्यासाठी कारणीभूत ठरतात.

इग्नोर करणं

Image result for COUPLES BREAK UP

अनेकांना आपल्या पार्टनरच्या अपसेट होण्याकडे किंवा रागावण्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते. कारण त्यांना असं वाटत असतं की मुलींचं अपसेट होणं हे रोजचंच आहे. पण असं नाही जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरकडे दुर्लक्ष करता त्यावेळी पार्टनरला खूप दुःख होतं. नेहमी तुम्ही तिला प्रेमाने अपसेट होण्याचं कारण विचारावं, समजून घ्याव अशा पार्टनरच्या अपेक्षा असतात. जर तुम्ही मानसिकदृष्या आधार देण्यासाठी आणि समजून घेण्यात कमी पडत असाल तुमचं कधीही ब्रेकअप होऊ शकतं. 

खोटं बोलणं

Related image

रिलेशनशिपमध्ये असताना  प्रत्येक गोष्टीसाठी  तुम्ही खोटं बोलत असाल तर जर तुमच्या वागण्याबोलण्यात फरक दिसून येतो. तेव्हा मुलींना खूप राग येतो. कारण जेव्हा तुम्ही तिच्याशी खोट बोलत असता त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे संशय घ्यायला सुरूवात होते. तुम्ही इतर मुलींशी संपर्कात असल्यामुळे पार्टनरशी खोटं बोलता असं सुद्धा वाटू शकतं.  एखादी गोष्ट लपवणं किंवा सतत खोट बोलणं नात तुटण्य़ाचं कारण ठरू शकतं. (हे पण वाचा-लॉकडाऊन संपल्यानंतर कपल्स सगळ्यात आधी काय करणार? 'असे' असतील लव बर्ड्सचे प्लॅन्स)

फ्लर्टिंग करणं

Related image(image credit- elitedaily.com)

फ्लर्टिंग करणं हा प्रकार सध्या खूप कॉमन झालेली दिसून येते. सोशल मीडियाचा वाढत्या वापरामुळे एकापेक्षा अधिक पार्टनर असणं हे सर्रास दिसून येतं. पण आपण ज्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहोत. त्या व्यक्तीचा तुमच्याबद्दल असलेला विश्वास तसंच त्या व्यक्तींच्या भावनांचा विचार करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. (हे पण वाचा-तुमचा पार्टनर लाईफ पार्टनर होण्यासाठी योग्य आहे का? असं ओळखा)

Web Title: These habits can cause breakups in relationship myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.